Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शरीराला आतून पोकळ बनवते व्हिटामीन B-१२ ची कमतरता; रोज ५ पदार्थ खा, B-१२ वाढेल

शरीराला आतून पोकळ बनवते व्हिटामीन B-१२ ची कमतरता; रोज ५ पदार्थ खा, B-१२ वाढेल

Top 5 Foods For Vitamin B-12 : ज्वारी, बाजरी, गहू ही धान्य पोषक तत्वांचा चांगला स्त्रोत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 07:28 AM2024-01-05T07:28:03+5:302024-01-05T15:11:58+5:30

Top 5 Foods For Vitamin B-12 : ज्वारी, बाजरी, गहू ही धान्य पोषक तत्वांचा चांगला स्त्रोत आहे.

Top 5 Foods For Vitamin B-12 : Eat 5 foods daily For Increase Vitamin B-12 | शरीराला आतून पोकळ बनवते व्हिटामीन B-१२ ची कमतरता; रोज ५ पदार्थ खा, B-१२ वाढेल

शरीराला आतून पोकळ बनवते व्हिटामीन B-१२ ची कमतरता; रोज ५ पदार्थ खा, B-१२ वाढेल

आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी प्रोटीन्स आणि कॅल्शियमची आवश्यकता असते (Health Tips) त्याचप्रमाणे व्हिटामीन बी-१२ ची सुद्धा आवश्यकता असते. व्हिटामीन बी १२ शरीरातील अनेक पोषक घटकांची कमरता  भरून काढतो. (Eat 5 foods daily For Increase Vitamin B-12) यामुळे रेड ब्लड सेल्स तयार होण्यास मदत होते.  शरीरात व्हिटामीन्सची कमतरता भासली तर कमकुवतपणा येणं थकवा,  चक्कर येणं श्वास  घ्यायला  त्रास होणं, त्वचा पिवळी पडणं, भूक न लागणं, गॅस, एसिडीटी यांसारख्या समस्या उद्भवतात.  याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. (Food That Are High in Vitamin B-12)

मेडिकल न्यूज टु डेच्या रिपोर्टनुसार  ब्रेनचे फंक्शन व्यवस्थित होणं, लाल रक्तपेशींची संख्या वाढवणं, शरीरासाठी आवश्यक उर्जा तयार करणं यासाठी व्हिटामीन बी १२ आवश्यक आहे.  व्हिटामीन बी-१२  जास्त प्रमाणात असल्यास शरीरात ऑक्सिजनचा संचारही व्यवस्थित होतो. याच्या अभावामळे एनिमिया होऊ शकतो. हेल्थ लाईन च्या रिपोर्टनुसार डेअरी प्रोडक्ट्स हा व्हिटामीन्स मिळवण्याचा चांगला स्त्रोत आहे. याशिवाय दही हा व्हेजिटेरिययन्ससाठी उत्तम पर्याय आहे. 

व्हिटामीन B-12 मिळवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा? (What to Eat For Vitamin B-12)

दही-

फार्म इजी. कॉमच्या माहितीनुसार १ कप दह्यातून जवळपास  २८ टक्के व्हिटामीन बी-१२ मिळते. अभ्यासानुसार दही खाणं हा व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भरून काढण्याचा उत्तम मार्ग आहे.  शरीरातील मांसपेशी आणि हाडांना पोषण देण्यासाठी तसंच हाडांच्या मजबूतीसाठी रोजच्या आहारात एक वाटी दह्याचा समावेश करा. 

न्युट्रिशनल यीस्ट

फोर्टिफाईड यीस्टमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामीन बी-१२ असते.  यीस्ट पदार्थाला चव देण्याचे काम करते. १ चमचा फोर्टिफाईड यीस्टमध्ये २.४ Mcg व्हिटामीन बी-१२ असते. 

व्हिटामीन बी-१२ रिच ब्रोकोली

ब्रोकोली त्यातील पोषक तत्वांसाठी ओळखली जाते.  ब्रोक्रोलीत शरीरासाठी आवश्यक असणारे व्हिटामीन्स आणि मिनरल्स असतात. याशिवाय कॅल्शियमही असते. हिवाळ्यात ब्रोकोलीचा आहारात समावेश केल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होईल.

स्मरणशक्ती वाढवायची तर रोज खा ५ गोष्टी, मेंदू होईल तेजतर्रार-एनर्जी वाढेल चौपट

ड्राय फ्रुट्स

नियमित ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने व्हिटामीन बी-१२ ची कमतरता जाणवत नाही. बदामाचे अधिकाधिक सेवन करा. यात मिनरल्स, व्हिटामीन्स, आयर्न आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. याव्यतिरिक्त सफरचंद, टोमॅटो, केळी असे स्प्राऊ्टससु्दधा व्हिटामीन बी १२ चा चांगला स्त्रोत आहेत. 

ज्वारी, बाजरी इतर धान्य

ज्वारी, बाजरी, गहू ही धान्य पोषक तत्वांचा चांगला स्त्रोत आहे. यात व्हिटामीन्सचे प्रमाण भरपूर असते. यात प्रोटीन्स, फायबर्सस आणि हेल्दी फॅट्स असतात. ज्यामुळे थकवा येत नाही आणि तुमचे शरीरही  निरोगी राहते.

Web Title: Top 5 Foods For Vitamin B-12 : Eat 5 foods daily For Increase Vitamin B-12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.