डायबिटीस ही आता अतिशय सामान्य गोष्ट झाली असून घरोघरी अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. हा आजार नसून ती जीवनशैलीविषयक एक महत्त्वाची समस्या आहे भारत हा डायबिटीसच्या रुग्णांमध्ये आघाडीवर असलेला देश आहे. चुकीची आहारपद्धती, व्यायामाचा अभाव, वाढते ताणतणाव आणि जीवनशैलीतील इतर गोष्टी यांमुळे डायबिटीसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. समाजाच्या सर्व स्तरात सर्व वयोगटात वेगाने वाढणारा डायबिटीस भविष्यातील अनेक आजारांचे महत्त्वाचे कारण ठरत आहे (Top 5 Foods to Control Sugar level Diabetes).
याबाबत वेळीच योग्य ती काळजी न घेतल्यास शरीरात बऱ्याच गुंतागुंती निर्माण होतात आणि मग यकृत, किडणी, हृदय यांच्या तक्रारी किंवा इतरही काही समस्या वाढत जातात. डायबिटीस नियंत्रणात ठेवायचा तर आहार, व्यायाम, औषधोपचार आणि ताणतणाव या गोष्टींवर प्रामुख्याने नियंत्रण ठेवायला हवे. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. यातही आहाराची भूमिका महत्त्वाची असून आरोग्य उत्तम ठेवायचे तर आहारात प्रोटीन, कर्बोदके, जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात असायला हवीत. तसेच साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ती फळे आणि पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा.
१. राजमा
राजमाचा ग्लायसेमिक इंडेक्स ३० पेक्षा कमी असतो. याशिवाय राजमा हा प्रोटीनचाही उत्तम स्त्रोत असतो. याशिवाय राजमामध्ये लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन्स याशिवाय फायबर चांगल्या प्रमाणात असते.
२. छोले
छोल्यांनी गॅसेस होतात म्हणून आपण अनेकदा छोले खाणे टाळतो. मात्र छोल्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर चांगल्या प्रमाणात असते. छोले हाडं, डोकं आणि हृदय यांसाठी फायदेशीर असल्याने सॅलेड किंवा भाजीच्या स्वरुपात आपण हे आहारात घेऊ शकतो.
३. चेरी
चेरी आपण साधारणपणे केक किंवा डेझर्टवरच खातो. पण हे फळ एरवीही खायला हवे. जीआय कमी असल्याने आणि व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंटस यांचा उत्तम स्त्रोत असल्याने चेरी खाणे आरोग्यासाठी चांगले असते. डायबिटीसबरोबरच त्वचा आणि केसांसाठीही चेरी उपयुक्त ठरते.
४. संत्री
वजन कमी करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संत्री फायदेशीर असतात. पिक्साबे व्हिटॅमिन सी यामुळे संत्री डायबिटीस असलेल्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. कमी कॅलरी आणि जास्त अँटीऑक्सिडंटस असल्याने संत्री उपयुक्त असतात.
५. सफरचंद
कमी जीआय असलेले फळ असल्याने रुग्णांसाठी ते फायद्याचे असते. सफरचंदामुळे हाडं, दात, हिरड्या आणि पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते. खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि हृदयाचे स्वास्थ्य जपण्यासाठी सफरंद खाणे फायद्याचे ठरते.