Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कंबर दुखते, हाडं ठिसूळ झाली? रोज ८ पैकी १ गोष्ट खा! हाडं राहतील ठणठणीत

कंबर दुखते, हाडं ठिसूळ झाली? रोज ८ पैकी १ गोष्ट खा! हाडं राहतील ठणठणीत

Top 8 Calcium-Rich Foods (Many Are Nondairy) : कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होऊ नये म्हणून दूध व्यतिरिक्त ८ गोष्टी खा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2024 02:29 PM2024-04-19T14:29:14+5:302024-04-19T15:52:19+5:30

Top 8 Calcium-Rich Foods (Many Are Nondairy) : कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होऊ नये म्हणून दूध व्यतिरिक्त ८ गोष्टी खा..

Top 8 Calcium-Rich Foods (Many Are Nondairy) | कंबर दुखते, हाडं ठिसूळ झाली? रोज ८ पैकी १ गोष्ट खा! हाडं राहतील ठणठणीत

कंबर दुखते, हाडं ठिसूळ झाली? रोज ८ पैकी १ गोष्ट खा! हाडं राहतील ठणठणीत

हाडं शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. हाडांशिवाय शरीराची कल्पनाही करता येत नाही (Calcium Rich Foods). आपले संपूर्ण शरीर हाडांच्या संरचनेवर अवलंबून असते. पण वय वाढलं की, हाडं ठिसूळ किंवा कमकुवत होतात. ज्यामुळे तिशीनंतर गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठ दुखण्याची समस्या वाढते (Healthy Foods). हाडांना बळकटी मिळावी म्हणून शरीराला आवश्यक पोषक घटकांची गरज असते.

हाडं कॅल्शियम, फॉस्फेट आणि इतर खनिजे साठवतात. जेव्हा शरीर आणि हाडांना याची गरज असते, तेव्हा ते रिलीज करतात. त्यामुळे आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. पण कोणत्या पदार्थात कॅल्शियम असतात?कॅल्शियमच्या कमतरतेवर मात कशी करावी? असा प्रश्न निर्माण होतो. शरीराला कॅल्शियम मिळावे म्हणून, आपण दुधाव्यतिरिक्त ८ गोष्टी खाऊ शकता(Top 8 Calcium-Rich Foods-Many Are Nondairy).

हाडांसाठी कॅल्शियम का गरजेचं आहे?

मजबूत हाडांसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. हृदय, स्नायू आणि मज्जातंतूंच्या योग्य कार्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. यासोबत शरीराला व्हिटॅमिन डीची देखील गरज भासते. यामुळे कॅन्सर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यापासून बचाव होतो.

इडली दडस-डोसे तव्याला चिकटतात? पिठात घाला एक पान; इडली-डोसे होतील परफेक्ट

कोणत्या पदार्थांमध्ये  कॅल्शियम जास्त असते?

हार्वर्ड या वेबसाईटनुसार, 'कॅल्शियम केवळ दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्येच नाही तर, इतर अनेक पदार्थांमध्येही आढळते. फळे, पालेभाज्या, शेंगा, काजू यासह इतर भाज्यांमध्ये कॅल्शियम असते.'

- दुग्धजन्य पदार्थ

- कॅल्शियम-फॉर्टिफाइड ऑरेंज ज्यूस

- टोफू

- बदाम

- पालेभाज्या

- टोमॅटो

- अंजीर

- सोयाबीन

कोणत्या वयोगटाला किती कॅल्शियमची गरज असते?

उन्हाळ्यात फक्त नुसते दही खाऊ नका, त्यात मिसळा १० पैकी १ गोष्ट, पोट-वजनही होईल कमी

- १९ ते ५० वयोगटातील महिलांना दररोज १००० मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज असते.

- ५१ प्लस महिलांनी दररोज १२०० मिलीग्रॅम कॅल्शियमयुक्त पदार्थ खावे.

- १९ ते ७० वयोगटातील पुरुषांना १००० मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज असते.

- ७१ प्लस वयोगटातील पुरुषांनी १२०० मिलीग्रॅम कॅल्शियमयुक्त पदार्थ खावे.

- गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी दररोज १००० मिलीग्राम कॅल्शियमयुक्त पदार्थ खावे. 

Web Title: Top 8 Calcium-Rich Foods (Many Are Nondairy)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.