Join us   

रात्रीच्या जेवणात काय खायचं काय टाळायचं? उत्तम तब्येतीसाठी आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 2:58 PM

Top Ayurveda Diet Tips : रात्रीचं जेवण हलकं असायला हवं याशिवाय हेल्दीसुद्धा असायला हवं. आयुर्वेदानुसार रात्रीचे जेवण कसं  असावं ते पाहूया.

चांगला आहार मन आणि शरीर दोन्हींसाठी फायदेशीर  असतो.  हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते ब्रेकफास्ट दिवसभरातील सगळ्यात महत्वपूर्ण जेवणांपैकी एक आहे. याचा अर्थ असा नाही की लंच किंवा डिनर कमी महत्वाचा आहे. संध्याकाळी ७ नंतर काहीही खाल्ल्यानंतर वजन वाढतं. असा अनेकांचा समज आहे (Consuming anything post 7 pm may result in weight gain) रात्रीचं जेवण हलकं असायला हवं याशिवाय हेल्दीसुद्धा असायला हवं. आयुर्वेदानुसार रात्रीचे जेवण कसं  असावं ते पाहूया. (Top Ayurveda Diet Tips)

१) रात्रीच्या जेवणात प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा समावेश असावा. लो फॅट प्रोटीन्स डाळी, भाज्या यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. रात्री पोटीन्सयुक्त पदार्थ खाल्ल्यानं  पचनक्रिया व्यवस्थित राहते. 

२) रात्रीच्या जेवणात कमी कार्बयुक्त आहार असावा. याचे कारण कार्बोहायड्रेट पचणे कठीण आहे. कमी कार्बयुक्त आहार लवकर पचतो आणि तुम्हाला चांगली झोप येते. त्यामुळे आहारात पनीर, टोफू, मसूर, शेंगा, लो फॅट चिकन खा.

३) संध्याकाळी ७ नंतर मीठ कमी खा. हे काही लोकांसाठी कठीण असू शकते, परंतु ते खूप महत्वाचे आहे. विशेषत: रात्रीच्यावेळी खारट,  गोड पदार्थ खाल्यानं तुमचं वजन, फॅट्स वाढू शकतात. 

४) रात्री दही खाणे टाळावे. होय, जर तुम्हाला दही खायला खूप आवडत असेल आणि तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही रात्री दही खाऊ नये. आयुर्वेदानुसार दही क्रोध दोष वाढवते. कारण दह्यामध्ये आंबट आणि गोड दोन्ही गुणधर्म असतात. यामुळे असंतुलन निर्माण होते ज्यामुळे नाक बंद होण्यासारख्या समस्या वाढू शकतात आणि रात्री झोपेवर परिणाम होतो.

टॅग्स : अन्नहेल्थ टिप्सआरोग्य