Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > थोडं काम केलं की थकवा जाणवतो? किचनमधले 5 पदार्थ रोज खा-हाडांना येईल ताकद-राहाल फिट

थोडं काम केलं की थकवा जाणवतो? किचनमधले 5 पदार्थ रोज खा-हाडांना येईल ताकद-राहाल फिट

Top Foods For Women's Health : आजकाल सर्वांनाच गुडघेदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागते. याचं मुख्य कारण असते सांधेदुखी,

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 10:01 AM2024-07-02T10:01:42+5:302024-07-02T10:03:55+5:30

Top Foods For Women's Health : आजकाल सर्वांनाच गुडघेदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागते. याचं मुख्य कारण असते सांधेदुखी,

Top Foods For Women's Health : How To Get Rid Of Joint Pain With These Anti Inflammatory Foods | थोडं काम केलं की थकवा जाणवतो? किचनमधले 5 पदार्थ रोज खा-हाडांना येईल ताकद-राहाल फिट

थोडं काम केलं की थकवा जाणवतो? किचनमधले 5 पदार्थ रोज खा-हाडांना येईल ताकद-राहाल फिट

रोजच्या कामामुळे थकवा येणं, अशक्तपणा, अंगदुखी  हे त्रास सर्वांनाच जाणवतात. तब्येतीच्या या समस्या उद्भवू  नयेत यासाठी वेळीच काही उपाय करायला हवेत. आजकाल सर्वांनाच गुडघेदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागते. याचं मुख्य कारण असते सांधेदुखी, कोणत्याही आजारात वयाबरोबरच इतर वेदनाही उद्भवतात. (Foods For Good Health) वाढत्या वयात उद्भवणाऱ्या वेदनांचे कारण ठरतात. ज्यामुळे सूज आणि जळजळही जाणवते. अशी एकही व्यक्ती नाही जिला या वेदना उद्भवत नाहीत.  वेदनांबरोबरच सांधेदुखी सूज किंवा जळजळीची समस्या उद्भवते. (How To Get Rid Of Joint Pain With These Anti Inflammatory Foods)

मेथीच्या बियांचे सेवन करा

सांधेदुखीच्या वेदना दूर करण्यासाठी तुम्ही मेथीच्या बियांचे सेवन करू सकता. कारण यात सॅपोनिन आणि डायोसजेनिन यांसारखे बायोएक्विह कंम्पाऊंड असतात. ज्यामुळे सांधेदुखीच्या वेदना दूर होण्यास मदत होते. मेथीमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. (Ref) डायबिटीस  कंट्रोल होण्यास मदत होते, हे एक चांगले ब्रेन फूड आहे, कॅन्सरपासूनही बचाव होतो. मेस्ट्रुअल क्रॅम्प्सही उद्भवत नाहीत, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

वॉकिंग की रनिंग-पोटाची चरबी घटवण्यासाठी काय करायचं? व्यायामासाठी योग्य वेळ कोणती, पाहा 

आवळा

सांधेदुखीची समस्या उद्भवत असेल तर तुम्ही आवळ्याचे सेवन करू शकता. आवळा व्हिटामीन सी चा चांगला स्त्रोत आहे. आवळा एंटीऑक्सिडेंट्सप्रमाणे काम करतो. व्हिटामीन सी मध्ये सूज कमी करणारे गुण असतात. म्हणूनच आपल्या आहारात आवळ्याचा समावेश करायला हवा.

तुळस चावून खा

जर तुम्हाला सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळवायचा असेल तर तुळस हा एक चांगला पर्याय आहे. औषधी गुणांनी परिपूर्ण तुळशीत एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात आणि एंटीऑक्सिडेंट्स असतात. यात फायटोकेमिक्लस असतात ज्यामुळे सांधेदुखीच्या वेदना कमी होण्यास  मदत होते.

तीळ

सांधेदुखीच्या वेदनांपासून बचाव करण्यासाठी तिळाच्या बिया फायदेशीर ठरतात. या बियांमध्ये लिगनेन आणि व्हिटामीन्स असतात. ज्यामुळे जॉईंट्स टिश्यू ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेचपासून बचाव होतो. ज्यामुळे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत होते. 

रोज भात खाल्ल्याने डायबिटीस वाढतं का? तज्ज्ञ सांगतात या पद्धतीने भात खा, वजन-शुगर वाढणार नाही

दालचिनी

तुम्ही आपल्या आहारात  दालचिनीचा समावेश करू शकता. सांधेदुखीच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी दालचिनी उत्तम ठरते. सायंस डायरेक्टमध्ये पब्लिश केलेल्या रिपोर्टनुसार यातील एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण शरीरातील सूज कमी करण्यासाठी मदत करतात. 

Web Title: Top Foods For Women's Health : How To Get Rid Of Joint Pain With These Anti Inflammatory Foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.