Join us   

प्रोटीन-व्हिटामीन्सचा सुपरडोस आहेत शेवग्याच्या शेंगा; थंडीत रोज खा, वजनही होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 9:37 AM

Top Heath Benefits of Moringa : डायबिटीक रुग्णांसाठीही शेवग्याच्या शेंगा एखाद्या वरदानाप्रमाणे आहेत. नियमित शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात.

सांबार असो किंवा डाळ शेवग्याच्या शेंगा घातल्याशिवाय  अपूर्णच आहे. सांबारमुळे फक्त जेवणाची चव वाढत नाही तर तब्येतीलाही बरेच फायदे मिळतात. (Science Based Health Benefits Of Moringa) आयुर्वेदात शेवग्याच्या शेंगांचे अनेक फायदे सांगितले  आहेत. फक्त शेंगाच नाही तर  शेवग्याची पानंही तितकीच फायदेशीर ठरतात. डायबिटीक रुग्णांसाठीही शेवग्याच्या शेंगा एखाद्या वरदानाप्रमाणे आहेत. नियमित शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने  तब्येतीला बरेच फायदे मिळतात.(Moringa Eating Benefits)

मेडिकल न्यूज टु डे च्या रिपोर्टनुसार शेवग्याच्या शेंगा त्वचा आणि केसांनाही पोषण देतात. हाय ब्लड प्रेशरचा त्रासही नियंत्रणात येतो. याशिवाय किडनी स्टोनसारख्या गंभीर आजारापासूनही बचाव होतो. यात कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, पोटॅशियम यांसारखी पोषक तत्व असतात. शेवग्याच्या शेंगांचे फायदे समजून घेऊ. (Top Heath Benefits of Moringa) आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनीही शेवग्याच्या शेंगा खाण्याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

  शेवग्यात कोणती पोषक तत्व असतात?

शेवग्यात व्हिटामीन ए, बी, सी, डी कॅल्शियम, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॉस्फरेस, पोटॅशियम, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर, सोडियम,  जिंक, सेलेनियम यांसारखी पोषक तत्व असतात. शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्याने त्यातील बरीच पोषक तत्व शरीराला मिळतात.

पोट सुटलंय, पूर्ण फिगर बेढब झालीये? जेवणाआधी 'ही' पानं चावून खा-चरबी होईल कमी

इम्यूनिटी वाढते

इम्यून पॉवर  वाढवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा अमृतासमान कार्य करतात. याच्या सेवनाने गंभीर आजारांपासूनही बचाव  होतो. डाळ, भाजी किंवा सांबारमध्ये तुम्ही याचा समावेश करू शकता. जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने आजारांपासून बचाव होण्यास मदत होईल. 

गॅसेसचा त्रास कमी होतो 

शेवग्याच्या शेंगांमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे बराचवेळ पोट राहतं.  शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्याने आतड्यांचे त्रासही दूर होतात आणि पचनासंबंधित समस्या उद्भवत नाहीत. गॅस, कॉन्स्टिपेशनची समस्या कमी होतात.

रोज गळून केस शेपटीसारखे बारीक झाले? राईच्या तेलात हा पदार्थ घालून लावा; घनदाट होतील केस

हाडं मजबूत राहतात

वाढत्या वयात हाडं कमकुवत व्हायला सुरूवात होते. हाडांच्या मजबूतीसाठी शेवग्याच्या शेंगा महत्वाच्या ठरतात.  फॉस्फरेस,  जिंक, मिनरल्स असतात त्यामुळे हाडं आणि सांधे मजबूत राहण्यास मदत होते. 

डायबिटीस

डायबिटीसग्रस्त लोकांसाठी शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात. यात इंसुलिनसारखे प्रोटीन असते. ज्यामुळे ब्लॅडर डिटॉक्स होते आणि शरीरातील शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये राहते.  यात ग्लायकोसाईड क्रिप्टे क्लोरोजेनिक एसिड असते.  यामुळे डायबिटीजचा प्रभाव कमी होतो. तर तुमची ब्लड शुगर लेव्हल हाय होत असेल तर आहारात शेवग्याच्या शेंगाचा समावेश करा.

टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सअन्न