Join us   

कोण म्हणतं व्हेज जेवणात प्रोटीन नसतं? सगळ्यात जास्त प्रोटिन्स कशात असतात, समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 12:05 PM

Top Vegetarian Protein Sources : शाकाहारी लोकांकडे प्रोटीन्सचे असे स्त्रोत आहेत जे मांसाहारापेक्षाही प्रभावी आहेत.

शरीर निरोगी राहण्यासाठी शरीराला प्रोटीन्सची आवश्यकता असते. कारण यामुळे मांसपेशींच्या विकासास मदत होते. म्हणूनच शरीर टोन्ड होण्यासाठी प्रोटीन्स खाण्याचा सल्ला दिला जातो. (Best Vegetarian and Vegan Protein Sources) पण काहीजणांना असं वाटतं की फक्त नॉनव्हेज पदार्थांमध्ये प्रोटीन्स असतात. चिकन, अंडी, यांसारखे पदार्थ न खाताही तुम्ही शरीरातले प्रोटीन्सचे प्रमाण वाढवू शकता. (Veg protein sources)

शाकाहारी लोकांकडे प्रोटीन्सचे असे स्त्रोत आहेत जे मांसाहारापेक्षाही प्रभावी आहेत. पोषणाबद्दल बोलायचं झालं तर सोयाबीनमध्ये ६ अंड्यांइतकं प्रोटीन असते जे एका व्यक्तीसाठी पुरेसं असतं. सोयाबीन खाल्ल्यानंतर शरीराला बरेच फायदे मिळतात. (Top Vegetarian Protein Sources) फूड डाटा सेंट्रलनुसार एका मोठ्या अंड्यामध्ये ६ ग्राम प्रोटीन असते. पण १०० ग्राम सोयाबीनमध्ये 36.5 ग्राम प्रोटीन  असते.  समान प्रमाणचा विचार केल्यास सोयाबीनमध्ये जवळपास तिप्पट अधिक प्रोटीन असते. 

हेल्दी कार्ब्स

प्रोटीन्सप्रमाणे कार्ब्ससुद्धा एक मॅक्रो न्युटिएंट्स आहे.  अंड्यात कार्ब्स नगण्य असतात. पण सोयाबीनमध्ये हेल्दी कार्ब्स असतात. यामुळे एनर्जीसह मसल्स वाढवण्यासही मदत होते. प्रोटीन्स आणि कार्ब्स पचवण्यासाठी पोटाला बरीच मेहनत घ्यावी लागते. ज्यामुळे अपचन, गॅस आणि ब्लोटींग होऊ शकते. पोट आणि पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी फायबर्सची आवश्यकता असते. सोयाबीनमध्ये  भरपूर  फायबर्स असतात. 

हाडं कमकुवत होण्याचं सगळ्यात मोठं कारण कॅल्शियमची  कमतरता हे आहे. पण सोयाबीन खाल्ल्यानं हाडं मजबूत राहण्यास मदत होते कारण यात कॅल्शियमचे प्रमाणही जास्त असते. कॅन्सरचा धोका कमी होतो. इतर मिनरल्स शरीराला मिळतात. हेल्दी फॅट्स मिळतात आणि शरीर डायड्रेट राहते, यात फॉलेट्सही असतात.

पनीर

पनीर हा सुद्धा शाकाहारींसाठी प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहे. 100 ग्रॅम पनीरमध्ये 11.12 ग्रॅम प्रोटीन आढळते. यामुळेच जिममध्ये जाणाऱ्यांनी त्यांच्या आहारात पनीरचा समावेश केला पाहिजे. व्यक्तीने त्याच्या वजनानुसार दररोज 1 ग्रॅम प्रोटीन / एकूण वजन घेतले पाहिजे. जर तुमचे वजन 60 किलो असेल तर तुम्ही दररोज किमान 60 ग्रॅम प्रथिनांचे सेवन केले पाहिजे.  

काबुली चणे

काळ्या  चण्यांच्या तुलनेत काबुली चण्यांमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन्स असतात. १०० ग्राम काळ्या चण्यात १५ ग्राम प्रोटीन असते आणि १०० ग्राम पांढऱ्या चण्यांमध्ये  १९ ग्राम प्रोटीन्स मिळतात. हे दोन्ही तुमच्या तब्येतीसाठी फायदेशीर ठरतात पण काबुली चणे काळ्या चण्यांपेक्षा जास्त हेल्दी असतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सलाइफस्टाइल