हळदीचा वापर आपण अनेक वर्षांपासून करत आलो आहे. ही एक औषधी वनस्पती आहे. याचा वापर पदार्थासह इतर औषधी व उपचारांसाठी केला जातो. हळदीला आयुर्वेदात हरिद्रा म्हणतात. हळदमध्ये अनेक महत्वाचे घटक आढळतात. त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे 'कर्क्युमिन'.
हळद अँटिबायोटिक, एनाल्जेसिक, अँटिऑक्सिडेंट, अँटिइंफ्लेमेटरी, अँटीकार्सिनोजेनिक आणि अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते. याचा वापर फक्त पदार्थात नसून, आरोग्यासाठी देखील केला जातो. यासंदर्भात, आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी हळद खाण्याचे आश्चर्यकारक फायदे सांगितले आहेत(Turmeric: Benefits and nutrition, Ayurveda Dr Told Mix These 5 Foods With Turmeric To Beat Health Issues).
हळदीचा आरोग्यासाठी होणारा सर्वात मोठा फायदा
हळदीचा वापर फक्त जेवणाची रंगत किंवा चव वाढवण्यासाठी होत नसून, इतर आरोग्याच्या निगडीत समस्या सोडवण्यासाठी देखील होतो. हळद इतर रोगांपासून बचाव करतो. व उत्तम आरोग्य राखण्यासाठी मदत करते.
थायरॉईडमुळे वजन वाढत चाललंय? प्या मसूर डाळीचे पौष्टिक सूप, बघा वजनात घट
हळदीचे आरोग्यदायी फायदे
जखमेच्या उपचारासाठी मदत
यकृत स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त(फॅटी लिव्हरसाठी सर्वोत्तम)
भूक वाढवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत.
अन्नपदार्थांतील प्रथिने शोषण्यास मदत.
शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करते, व रक्तवाहिन्यांची लवचिकता सुधारते.
हळद कशासोबत कशी खाणार?
फॅटी लिव्हर असेल तर लिंबू हळद एकत्र खा.
तूप आणि मधासोबत हळद घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते
वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेच्या समस्या सोडवण्यासाठी गरम पाण्यासोबत हळदीचे सेवन करा.
कांदा खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात येते का? संशोधन सांगते..
खोकला - सर्दी, संधिवात, जखम भरणे आणि कॅल्शियमची कमतरता, यासाठी दुधासोबत हळद घेणे हा चांगला उपाय आहे.
मधुमेहासाठी आवळासोबत हळद घ्या.
विविध आजार टाळण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी हळदीचा स्वयंपाकात वापर करा.
त्वचा आणि केसांच्या समस्यांवर हळद रामबाण उपाय
त्वचेवरील समस्या सोडवण्यासाठी हळदचा वापर केला जातो. एक्जिमा, सोरायसिस आणि बुरशीजन्य संसर्ग यासारख्या त्वचेच्या आजारांवर हळद उपयुक्त ठरेल. मुरुमांपासून ते सुरकुत्यापर्यंत सर्व त्वचेच्या आजारांवर ते उपयुक्त आहे. हळदीचा वापर चेहऱ्यावरील केस कमी करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.