आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात (Bad Cholesterol). एक म्हणजे गुड ज्याला आपण एचडीएल कोलेस्टेरॉल म्हणतो. तर दुसरे म्हणजे बॅड कोलेस्टेरॉल ज्याला एलडीएल कोलेस्टेरॉल म्हणतात (Health Benefits). जेव्हा शरीरात खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, तेव्हा हृदयविकाराचा झटका, ब्लॉकेज, स्ट्रोक आणि कोरोनरी आर्टरी डिसीजसारख्या अनेक गंभीर समस्यांचा धोका वाढतो (Health Care).
अशा स्थितीत शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. यासह एका घरगुती उपायाला देखील फॉलो करून पाहा. यामुळे बॅड कोलेस्टेरॉलटची पातळी कमी होईल(Turmeric for cholesterol: Effects and other health benefits).
हळदीचे पाणी प्यायल्याने बॅड कोलेस्टोरॉल कमी होते?
द हेल्थ साईट. कॉमच्या मते, शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी हळदीच्या पाण्याचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. हे पाणी रक्त शुद्ध करते. शिवाय शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे हृदय देखील निरोगी राहते.
याव्यतिरिक्त, ते ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करण्यास आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास देखील मदत करते. यामध्ये असलेले गुणधर्म रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
हळदीचे पाणी कसे तयार करायचे?
हळदीचे पाणी करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात दोन चिमुटभर हळद घालून मिक्स करा. आता हे पाणी दररोज प्या. नियमित सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत होते.
हळदीचे पाणी पिण्याचे इतर आरोग्यदायी फायदे
- हळदीचे पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे. त्यातील दाहक-विरोधी गुणधर्म संधिवात, हृदयविकार आणि विशिष्ट कर्करोग यांसारख्या जुनाट आजारांचा धोका कमी करण्यास मदत करते.
- अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण हळद रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. दररोज हळदीचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते. ज्यामुळे ऋतू बदलांमुळे होणारे आजार कमी होऊ शकतात.
- हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे अपचन, गॅसेस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही.
- हळदीचे पाणी त्वचेसाठी फायदेशीर ठरते. हळदीमध्ये असलेले शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स स्किनसाठी फायदेशीर ठरतात. ज्यामुळे मुरुमांचे डाग कमी होऊन, चेहऱ्यावर नवी चमक येते.