Join us   

Turmeric Milk Benefits : ...म्हणून रोज हळद दूध पिऊनही अंगाला लागत नाही; तब्येत चांगली ठेवण्यासाठी 'असं' बनवा हळदीचं दूध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 12:02 PM

Turmeric Milk Benefits : हळदीचं दूध, जे सोनेरी दूध म्हणून प्रसिद्ध आहे, शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

हिवाळा सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो पण आरोग्याच्या समस्याही त्याच तीव्रतेनं उद्भवतात. बहुतेक लोकांना खोकला आणि शिंकांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळा येताच आजारी पडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होणे. व्यस्त जीवनशैलीत लोक त्यांच्या शरीराकडे आवश्यक लक्ष देऊ शकत नाहीत. अशा वेळी थोडा वेळ काढून रोज हळदीचे दूध पिण्याची सवय लावल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. (Best way to make turmeric milk) पण हळदीचं दूध पिण्याची योग्य पद्धत माहीत असेल तर त्याचा पुरेपूर फायदा मिळण्यास मदत होऊ शकते. (Why you should drink haldi milk every day in this weather)

गोल्डन दूध

हळदीचं दूध, जे सोनेरी दूध म्हणून प्रसिद्ध आहे, शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. कोरोना महामारीच्या काळातही हळदीच्या दुधाबद्दल बरीच चर्चा झाली होती, जी अनेक अर्थांनी खरी आहे. हळदीचे दूध हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रामबाण उपाय असल्याचेही सांगितले जाते.

शरीर निरोगी राहतं

हळदीचे दूध तुमचे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. याचे रोज सेवन केल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. हे शरीराला रोगांशी लढण्याची ताकद तर देतेच पण हिवाळ्यातील सर्वोत्तम पेय देखील आहे.

साथीच्या रोगांशी लढण्यासाठी प्रभावी

सर्व देशांच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोनाशी लढण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना साथीचा रोग होतो तेव्हा त्यांचे शरीर लवकर बरे होऊ शकत नाही आणि इतर अनेक समस्या दिसू लागतात. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे.

हळद दूध बनवताना या गोष्टींची काळजी घ्या

सहसा लोक दुधात हळद मिसळून हळदीचे दूध बनवतात आणि ते पितात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही हा उपाय प्रभावी आहे, परंतु जर तो अधिक चांगल्या पद्धतीने बनवला गेला तर ते अधिक फायदेशीर ठरेल. हळदीचे दूध बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. योग्य पद्धतीने तयार केल्यास त्याचा पुरेपूर फायदा होईल ज्यामुळे शरीराला अधिक शक्ती मिळेल. 

हळदीचे दूध बनवताना त्यात काळी मिरी घालायला विसरू नका. काळी मिरी न घातल्याने त्याचा पूर्ण फायदा होत नाही. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते. जेव्हा पिपरिन म्हणजेच काळी मिरी सोबत घेतली जाते तेव्हाच मानवी शरीर ते स्वीकारते. काळी मिरी आणि हळद यांचे मिश्रण असलेले सप्लिमेंट्स बाजारात सहज उपलब्ध आहेत.

असं बनवा हळद दूध

हळदीचे दूध बनवण्यासाठी अर्धा कप कोमट दुधात एक चतुर्थांश चमचे हळद आणि चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळावी. जर तुम्ही साखर न घालता हे दूध प्यायलात तर तब्येत चांगली  राहण्यास मदत होईल.  जर तुम्ही गोड पदार्थांशिवाय हळदीचे दूध पिऊ शकत नसाल तर तुम्ही त्यात गूळ घालू शकता. किंवा त्यात साखरही मिसळू शकता. हळदीच्या दुधात गोडवा येण्यासाठी फक्त गूळ वापरला जावा असा प्रयत्न असावा. कारण हिवाळ्यात गुळाचे सेवन करणे देखील फायदेशीर मानले जाते.

कच्ची हळद अधिक प्रभावी

हळदीच्या दुधात कच्ची हळद वापरल्यास ते आणखी प्रभावी होईल. गॅसवर दूध गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यात हळद टाका, आल्यासारखे चोळून घ्या. चव आवडत नसली तरी रोज सेवन करत राहा, कालांतराने त्याची चव चांगली येऊ लागते आणि तुम्हाला त्याची सवय होईल. चवीसाठी तुम्ही त्यात वेलचीही घालू शकता.

हळदीच्या दुधाच्या सेवनाने शरीराला कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, बी2, बी12, व्हिटॅमिन डी, झिंक, पोटॅशियम, फॉस्फरस आणि अनेक आवश्यक सूक्ष्म पोषक घटक मिळतात. हळदीतील दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे, शरीराची रिकव्हरी प्रक्रिया वेगवान होते. हळदीमध्ये कॅन्सर विरोधी गुणधर्म असल्याच्याही काही अहवालात समोर आले आहे. यासोबतच सांधेदुखीच्या रुग्णांनाही आराम मिळतो.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्न