Join us   

रोज रात्री हळदीचं दूध पिता? ५ त्रास असतील तर चुकूनही पिऊ नका हळदीचं दूध, आजारी पडाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 4:18 PM

Turmeric Milk Benefits (Haldiche dhudh koni piu naye) : आहारतज्ज्ञांच्यामते ब्लड प्रेशर कमी असलेल्या रुग्णांनी जास्त प्रमणात हळदीचे दूध पिऊ नये.

हळदीच्या दूधाला गोल्डन मिल्क (Golden Milk) असंही म्हटलं जातं. हिवाळ्याच्या दिवसांत हळदीच्या दूधाचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते.  हळदीचे दूध प्यायल्याने  सर्दी खोकला यांसारखे आजारही उद्भवत नाहीत.(Turmeric Milk Benefits) हळदीचे दूध प्यायल्याने अनेक फायदे मिळतात. दुधात प्रोटिन्स आणि लिनोलिक आणि ओमेगा-३ फॅटी एसिड्स असातत जे चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. (Who Should Avoid Turmeric Milk)

दूधात कॅल्शियम, व्हिटामीन डी, व्हिटामीन बी-१२, पोटॅशियम, फोस्फरेस आणि सेलेनियम भरपूर असते. यात व्हिटामीन ए, जिंक, मॅग्नेशियम, व्हिटामीन बी१२ असते. हळदीचे दूध प्यायल्याने त्वचेची चमक दुप्पटीने वाढते, पचनक्रिया चांगली राहते. हळदीतील करक्यूमिन प्लाक साफ करण्यास मदत करते. करक्यूमिन कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासही मदत करते. (Turmeric Side Effects) पण काही स्थितीत हळजीचं दूध पिणं टाळलेलंच बरं कारण यामुळे तब्येतीच्या इतर समस्या वाढू शकतात.  (5 Reasons You Should Not Drink Turmeric Milk)

हळदीचे दूध कोणी पिऊ नये? (Who Should Not Drink Turmeric Milk)

आहारतज्ज्ञांच्यामते ब्लड प्रेशर कमी असलेल्या रुग्णांनी जास्त प्रमणात हळदीचे दूध पिऊ नये.  कारण यामुळे ब्लड प्रेशर अधिकच कमी होऊ शकते. हळदीतील करक्यूमिन नावाचे केमिकल डायबिटीक रुग्णांमध्ये ब्लड शुगर लेव्हल कमी करू शकते अशावेळी हळदीचे दूध पिणं टाळा.

१) मेडिकल न्यूज टु डे च्या रिपोर्टनुसार ज्या लोकांना पोटाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी  हळद घातलेल्या दुधाचे सेवन करू नये. हळद शरीराला उष्णता प्रदान करते. यामुळे पोटाचे त्रास उद्भवू शकतात. कारण हळदीतील  करक्यूमिन एक्टिव्ह कंम्पाऊंड असून  यामुळे अतिसाराचा त्रास होऊ शकतो.

केस वर काळे आतून पांढरे झाले? शहनाज सांगतात किचनमधल्या ३ वस्तू लावा; काळे-शायनी होतील केस

२) शरीरात स्टोन असेल तर हळदीचे दूध पिऊ नये. गोल ब्लॅडर आणि लव्हरशी संबंधित समस्यांचा सामना करत असलेल्यांनी या दूधाचे सेवन करू नये. अन्यथा त्रास वाढू शकतो. 

३) ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे. अनिमियाचा त्रास असल्यास हळदीच्या दुधाचे सेवन करू नये. हळदीचे दूध प्यायल्याने  रक्त तयार होण्याच्या प्रक्रियेवरही काही प्रमाणात परिणाम होतो.

शरीराला आतून पोकळ बनवते व्हिटामीन-D ची कमतरता; 5 पदार्थ खा, उन्हात न जाताच व्हिटामीन मिळेल

४) गरजेपेक्षा जास्त हळदीचे सेवन करणं शरीरातील एलर्जिक रिएक्शन्सचं कारण ठरू शकतं. रॅशेस, श्वास घ्यायला त्रास होणं अशा समस्या उद्भवू शकतात.

५) प्रेग्नंसीत अनेक गोष्टी खाण्यापिण्यात मनाई असते. प्रेग्नंसीत काहीही खाण्याआधी किंवा पाणी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तुम्ही नियमित हळदीच्या दुधाचे सेवन करत असाल तर डॉक्टरांच्या सल्ला घेऊन त्यानंतर ही सवय  सुरू ठेवा.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल