डावा किंवा उजवा डोळा फडफडला की आपल्याकडे जुनी माणसं त्यावरून वेगवेगळे अंदाज काढतात. अमूक डोळा फडफडला तर ते शुभ किंवा दुसरा डोळा फडफडला तर ते अशुभ असं समजणारे बरेच लोक आहेत. पण अर्थातच या गोष्टींमध्ये अजिबातच तथ्य नसून त्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. क्वचित कधीतरी महिना- दोन महिन्यातून एकदा डोळा फडफडण्याचा (Twitching or blinking eye) त्रास होत असेल, तर ते काही फार गंभीर स्वरुपाचं नाही. पण वारंवार म्हणजे अगदी रोजच असा त्रास होत असेल, तर त्याकडे मात्र मुळीच दुर्लक्ष करू नका. तब्येतीमध्ये होणाऱ्या काही बदलांचा तो परिणाम असू शकतो. त्यामुळे या समस्येवर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे, कधीही उत्तम.
डोळा वारंवार फडफडण्याची ही असू शकतात कारणं...
१. पोषक तत्वांची कमतरता
नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी फिनबर्ग स्कूल ऑफ मेडिसीन येथील प्राध्यापक लिझा एम. काेहेन यांच्या अभ्यासानुसार मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे हा त्रास होऊ शकतो.
अभिनेत्री जुही परमारचं ब्यूटी सिक्रेट, सुंदर त्वचेसाठी जुही सांगते एक सोपा घरगुती उपाय
याशिवाय व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी, फॉस्फेट यामुळेही हा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे आहारात अशी पोषणमुल्ये देणाऱ्या पदार्थांचा समावेश करून बघावा.
२. खूप थकवा
सतत खूप काम झाल्याने थकवा आला असेल, तरीही डोळा फडफडण्याचा त्रास जाणवू शकतो.
जवसाचे आइस क्यूब कधी वापरलेत का? हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी खास उपाय, त्वचा होईल कोमल- नितळ
खूप जास्त शारिरीक कष्ट करत असाल किंवा खूप व्यायाम आणि त्या तुलनेत झोप कमी, असं असेल तरीही हा त्रास होतो. त्यामुळे एखादा दिवस पुर्ण विश्रांती आणि भरपूर झोप घेऊन बघा.
३. कम्प्यूटर व्हिजन सिंड्रोम
स्क्रिनचा सतत ८- १० तास सलग वापर होत असेल आणि तो ही एकटक तर डोळ्यांना अशक्तपणा जाणवून असा त्रास होऊ शकतो. तुमच्या बाबतीत हे कारण असेल तर तर अर्ध्या तासांनी २० ते ३० सेकंदांचा ब्रेक घेऊन डोळ्यांची उघडझाप करा. नजर स्क्रिनपासून दूर करा.