कोलेस्टेरॉलची समस्या सध्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रत्येक वयोगटातील लोकं या समस्येपासून त्रस्त आहे. एलडीएल कोलेस्टेरॉलमुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हृदयाच्या संबंधित आजार वाढतात. एलडीएल कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा चिकट पदार्थ असतो. जो चरबीयुक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे नसांमध्ये जमा होतो. यामुळे, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकते. आपल्याला जर एलडीएल कोलेस्टेरॉल नियंत्रणात आणायचं असेल तर, आहारात आळशी आणि दालचिनीचा समावेश करा.
यासंदर्भात आहारतज्ज्ञ आयुषी यादव सांगतात, ''उच्च कोलेस्टेरॉलची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, बिघडलेली जीवनशैली व जंक फूडचे अतिसेवन. एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारात अळशीच्या व दालचिनीचा समावेश करू शकता'(Two Natural Remedies To Control High Cholesterol ).
ब्लॅक कॉफी प्यायल्याने खरंच वजन कमी होते? ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य पद्धत कोणती?
अळशीच्या बियांचे करा सेवन
अळशीच्या बिया पौष्टीक तत्वांचा खजीना आहे. या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पौष्टीक घटक आढळतात. याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. व गुड कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फ्लॅक्ससीड उपयुक्त ठरते. याची पावडर आपण सकाळी कोमट पाण्यात मिसळून पिऊ शकता. किंवा सॅलडमध्ये मिक्स करून खाऊ शकता.
स्त्रियांचं वजन भराभर आणि खूप का वाढतं? ७ कारणं, वाढत्या वजनासह आजारांचा धोका टाळा
दालचिनीचे करा सेवन
हाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आपण आहारात दालचिनीचा समावेश करा. दालचिनीमध्ये आढळणारे सिनामल्डीहाइड आणि सिनामिक ॲसिड, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. १. ५ ग्रॅम दालचिनी पावडर खाल्ल्याने एलडीएल कोलेस्टेरॉल, यासह ट्रायग्लिसराइडची पातळी कमी होऊ शकते. यासाठी आपण सकाळी कोमट पाण्यात चिमुटभर दालचिनी पावडर मिसळून पिऊ शकता. किंवा भाजी आणि सॅलडमध्ये घालून खा.