आपल्या स्तनांना आधार, आकार देण्यासाठी ब्रेसियर डिझाइन केलेल्या आहेत. सहसा असे दिसून येते की अनेक स्त्रिया चुकीच्या आकाराची, क्वालिटी चांगली नसलेल्या, स्वस्तातील ब्रा घालतात. जेव्हा बहुतेक स्त्रियांना त्यांच्या आकाराबद्दल अचूक माहिती नसते, तेव्हा ते बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या ब्रामधून स्वत:साठी योग्य ब्रा निवडू शकत नाहीत. ब्रा दिवसभर अंगावर असते त्यामुले ती जितकी आरामदायक असेल तितकं चांगलं.
सध्या पुशअप्स ब्रा पासून स्पोर्ट्स ब्रा वगैरे महिलांसाठी बाजारात सहज उपलब्ध आहेत. बहुतेक ब्रा आपल्या स्तनांना आधार देण्यासाठी आणि फॅशनसाठी डिझाइन केल्या आहेत. परंतु योग्य माहिती न घेता ब्रा खरेदी करणे किंवा नियमितपणे वापरणे आपल्यासाठी हानिकारक असू शकते. आम्ही अशा काही ब्रा प्रकारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा वापर शरीरासाठी योग्य ठरत नाही.
जीरो सपोर्ट ब्रा
चांगला सपोर्ट असलेली ब्रा मान आणि पाठदुखीपासून आराम मिळवून देईल. पण जर तुमचे स्तन जड असतील आणि तुम्ही सपोर्टिव्ह ब्रा वापरली नाही तर स्नायूंना ईजा पोहोचू शकते. अशा ब्रामध्ये तुम्हाला आरामदायक फिल येणार नाही. ज्यामुळे मसल्स पेनच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
चुकीच्या आकाराची ब्रा
आपण नेहमी प्रत्येक प्रकारच्या ब्रामध्ये आकार तपासावा. तुमची ब्रा नीट बसली पाहिजे, अन्यथा तुम्हाला त्वचेच्या विविध एलर्जीज किंवा आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. उदाहरणार्थ, जर ब्रा तुमच्यासाठी खूप मोठी असेल तर कपडे आणि तुमची त्वचा यांच्यातील घर्षणामुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते. म्हणून ते टाळा. जर तुमची ब्रा तुमच्यासाठी खूप लहान असेल आणि तुम्हाला खूप घट्ट बसत असेल तर ती तुमच्या त्वचेला त्रास देऊ शकते. त्याचा तुमच्या रक्ताभिसरणावरही विपरित परिणाम होऊ शकतो.
स्टिकी ब्रा
दररोज स्टिकी ब्रा वापरणे ही चांगलं नाही. ग्लू असल्यानं ही ब्रा आपल्या स्तनांना चिकटते. त्यामुळे आपली त्वचा वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांच्या संपर्कात येऊ नये. शिवाय, ही एक ब्रा अशी आहे जी तुमच्या त्वचेला श्वास घेण्याची संधी देत नाही. कारण यात स्तनांना हवा लागण्यासाठी मोकळी जागा नसते.
प्लास्टिक ब्रा
गेल्या काही दिवसांमध्ये प्लास्टिकच्या ब्रा चा ट्रेंडही खूप वाढला आहे. हे अतिशय फॅशनेबल मानले जातात. जर आपण सर्वात वाईट ब्रा प्रकारांबद्दल बोललो तर त्या प्लास्टिकच्या ब्रा आहेत कारण ते केवळ अस्वस्थच करत नाहीत तर हालचाल केल्यानंतर या ब्रा चा आवाजही येतो. जे तुम्हाला नक्कीच आवडणार नाही. या ब्रामुळे तुम्हाला त्वचेवर खाज सुटणे आणि पुरळ उठण्याची समस्या येऊ शकते.