स्तनपान हे बाळासाठी सर्वोत्तम मानले जाते. आईच्या दुधातून बाळाला सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळतात. पण स्तनपान किंवा इतर अनेक कारणांमुळे स्तनाग्र दुखतात. अनेकदा ठणकही लागतो. स्तनाग्रातून रक्तस्राव होण्याचा त्रासही काही नवीन मातांना होतो. स्तनदा मातांना ही समस्या अधिक त्रासदायक ठरू शकते. हा त्रास कशानं होतो आणि त्यावर काय उपचार उपलब्ध असतात ते पाहू. अमेरिकन प्रेगनन्सी डॉट ओआरजी नावाच्या साइटवर यासंदर्भात तपशील माहिती मिळू शकते. नवमातांना पडणाऱ्या त्यापैकीच काही निवडक प्रश्नांची ही उत्तरं (Understanding Nipple Pain Causes of Nipple Pain4 Reasons For Nipple Pain, and Ways to Treat Them)
ब्रेस्टफिडींग दरम्यान स्तनांमध्ये का जाणवतात?
स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये सर्वात जास्त आढळणारी समस्या म्हणजे स्तनाग्र दुखणे. बाळ अंगावर प्यायला लागले की सुरुवातीला ओढले गेल्यानं निपल्स दुखू शकतात. मात्र किरकोळ त्रार न होता सतत वेदना होत राहिल्यास, त्याबद्दल आपल्या डॉक्टरांचा सल्ला लवकरात लवकर घ्यायला हवा. उशीर झाल्यास रक्तस्त्राव किंवा निप्पलमध्ये फोड येऊ शकतात. इतर कारणांमुळेही महिलांना स्तनांवर फोड येणं, दुधाच्या गाठी दुखणं किंवा टणक होणं असा त्रास होऊ शकतो. प्रसूतीच्या सुरुवातीच्या दिवसात ही समस्या अनेक महिलांमध्ये उद्भवू शकते. निपल्स कोरडे पडणं, त्यांना भेगा जाणं असाही त्रास होतो. आई आणि बाळाच्यादृष्टीनंही हा त्रास बरा नव्हे.
चुकीच्या पद्धतीने ब्रेस्टफीडिंग करणं
लॅचिंग तंत्र आणि ब्रेस्ट फिडींग करण्याची स्थिती योग्य आहे की नाही याची खात्री करणे आईसाठी खूप महत्वाचे आहे. जसजशी मुलं मोठी होतात तसतशी ते दूध पिण्यासाठी वेगवेगळ्या पोझिशन्सचा अवलंब करतात. यामुळे, जर बाळाची दूध ओढण्याची पोझिशन चुकीची असेल तर,स्तन दुखू शकतात आणि जखम देखील होऊ शकते.
निपल्स भोवती जळजळ
कधीकधी मातांना त्यांच्या निपल्सभोवती जळजळ जाणवते. याशिवाय, जर बाळाचे दात आले तर तुम्हाला स्तनाग्र दुखापत होऊ शकते. काही वेळा दूध पिताना बाळाचे दात त्वचेला लागतात त्यामुळे दुखापत होऊ शकते. तसेच, लाळ आणि एन्झाईम्सच्या जास्त उत्पादनामुळे स्तनाग्रांमध्ये जळजळ होऊ शकते.
निपल्समध्ये ब्लॉकेज
दुधाच्या गाठी आणि स्तनदाह यांसारख्या परिस्थितीमुळे स्तनाग्र दुखणे किंवा वेदना होऊ शकतात. ही स्थिती सहसा एक किंवा दोन्ही निपलमध्ये दिसून येते. निपलमध्ये अडथळे आल्याने तुम्हाला दुखणे किंवा वेदना होऊ शकतात.
व्हजायनल लूजनेस किंवा योनीतील सैलपणा हा आजार आहे का? तज्ज्ञ सांगतात, समज-गैरसमज आणि धोके
हॉर्मोनल बदल
मासिक पाळीच्या आधी किंवा त्या दरम्यानही निपल्समध्ये वेदना होऊ शकतात. गर्भधारणेदरम्यान निपल्स दुखणे आणि जळजळ देखील होऊ शकते. काही वेळा दुखापतीमुळे त्यात जखमी होण्याची भीती असते. कधी कधी अचानक स्तनाग्रांना भेगा पडल्या किंवा दोन्ही बाजूंना वेदना जाणवल्या तरी फोड किंवा जखमा होण्याची भीती असते. हा त्रास यीस्ट संसर्गामुळे असू शकतो.
उपाय काय?
१) बाळाला दूध पाजल्यानंतर आपले स्तनाग्र स्वच्छ धुवा आणि ते नीट कोरडे करा जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या संसर्गाची भीती राहणार नाही.
२) कोमट पाण्याने शेकल्यास स्तनाग्र दुखणे बरे होण्यास मदत होते. यामुळे जखमेत साचलेला पू बाहेर येऊ शकतो.
३) जर एका स्तनामध्ये जखम असेल तर तुम्ही बाळाला दुसऱ्या स्तनातून दूध पाजावे जेणेकरून जखम लवकर बरी होईल.
४) लवकरात लवकर डॉक्टरचा सल्ला घ्यावा. घरगुती अघोरी उपाय करू नयेत.