Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Underwear Hygien : आतल्या कपड्यांच्या अस्वच्छतेमुळे महिलांना होतात गंभीर आजार, लक्षात ठेवा कपडे धुण्याचे 5 नियम

Underwear Hygien : आतल्या कपड्यांच्या अस्वच्छतेमुळे महिलांना होतात गंभीर आजार, लक्षात ठेवा कपडे धुण्याचे 5 नियम

Tips For Washing Undergarments : उत्तम आरोग्य आणि स्वच्छता यांसाठी काही गोष्टींची काळजी आवर्जून घ्यायला हवी, आतले कपडे धुताना न चुकता लक्षात ठेवा या गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 04:49 PM2022-05-20T16:49:52+5:302022-05-20T16:56:00+5:30

Tips For Washing Undergarments : उत्तम आरोग्य आणि स्वच्छता यांसाठी काही गोष्टींची काळजी आवर्जून घ्यायला हवी, आतले कपडे धुताना न चुकता लक्षात ठेवा या गोष्टी

Underwear Hygien: Unhygienic Underwear Causes Women To Get Serious Illnesses, Remember 5 Rules Of Laundry | Underwear Hygien : आतल्या कपड्यांच्या अस्वच्छतेमुळे महिलांना होतात गंभीर आजार, लक्षात ठेवा कपडे धुण्याचे 5 नियम

Underwear Hygien : आतल्या कपड्यांच्या अस्वच्छतेमुळे महिलांना होतात गंभीर आजार, लक्षात ठेवा कपडे धुण्याचे 5 नियम

Highlightsत्र हलक्या उन्हात आतले कपडे वाळत घातल्यास हवा आणि ऊन यांमुळे ते चांगले वाळतात आणि स्वच्छ कोरडे होतात. आजारांना आमंत्रण देण्यापेक्षा स्वच्छतेच्या बाबतीत थोडी काळजी घेतली तर आरोग्याच्या तक्रारींना आपण दूर ठेवू शकतो.

कपडे धुणे हे काम आता बहुतांश घरात मशीनच करते. अगदीच नाही तर आपल्याकडे कपडे धुवायला मावशी येतात. मात्र हाताने कपडे धुणे ही संकल्पना आता काहीशी मागे पडील. असे असले तरी आपले आतले कपडे आपल्याला रोजच्या रोज धुवावेच लागतात. साधारणपणे आपण वयात आलो की आई आपल्याला पॅंटी आणि ब्रेसियर धुवायला शिकवते आणि मग पुढे कायमसाठी आंघोळीच्या वेळी आपणच आपले आतले कपडे धुतो. आतले कपडे स्वच्छ असणे अतिशय गरजेचे असते. याचे कारण म्हणजे आपली योनी आणि खालचा भाग हा अतिशय सेन्सिटीव्ह असल्याने याठिकाणी लवकर एखादे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अशावेळी आपले कपडे स्वच्छ नसतील तर आरोग्या्च्या तक्रारी उद्भवू शकतात. उन्हाळ्यात घामाने आणि पावसाळ्यात पाण्याने किंवा कपडे ओले राहिल्याने इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते (Tips For Washing Undergarments). अशावेळी स्वच्छ कोरडे कपडे घालणे आवश्यक असून आतले कपडे धुताना कोणती काळजी घ्यावी याविषयी...

(Image : Google)
(Image : Google)

१. गार पाण्याने आतले कपडे धुण्याने त्यावरील बॅक्टेरीया निघून जात नाहीत. बहुतांश वेळा आपण सगळे गार पाण्यानेच कपडे धुतो मात्र त्यामुळे आपल्याला संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे आतले कपडे शक्यतो गरम पाण्याने धुवायला हवेत. 

२. काही वेळा आपण घाईघाईत इतर कपड्यांसोबत आतले कपडे मशीनला लावतो. मात्र इतर कपड्यांची घाण आपल्या आतल्या कपड्यांना लागल्याने त्यामुळे त्वचेचे संसर्ग होण्याची शक्यता असते. तसेच आतल्या कपड्यांवर असणारे बॅक्टेरीयाही इतर कपड्यांना लागू शकतात. म्हणून आतले कपडे हे इतर कपड्यांसोबत न धुता ते वेगळेच धुवायला हवेत. 

३. आपल्याला अनेकदा प्रायव्हेट पार्टच्य़ा आजुबाजूला खाज येते, फोड येतात किंवा आग, जळजळ होते. अशावेळी आपल्या आतल्य़ा कपड्यांवरील पिवळे डाग किंवा इतर अस्वच्छता यांकडे दुर्लक्ष करु नका. अशाप्रकारची अस्वच्छता आपल्या तब्येतीसाठी घातक ठरु शकते. त्यामुळे आतल्या कपड्यावरील डाग साबण, वॉशिंग पावडर आणि गरम पाण्याने काढण्याचा प्रयत्न करा. 

(Image : Google)
(Image : Google)

४. पिरीयडच्या वेळी आतले कपडे किमान १० मिनीटे डिटर्जंट पावडरमध्ये भिजत ठेवावेत. त्यानंतर ते ब्रशने स्वच्छ घासून धुवावेत. म्हणजे त्यातून कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याचा धोका राहणार नाही. 

५. अनेकदा आतले कपडे आपण बाथरुममध्ये किंवा आतल्या बाजूला वाळत घालतो. हे कपडे दमट जागेत वाळत घातल्याने योग्य पद्धतीने वाळतातच असे नाही. काही वेळा ते कुबट राहतात आणि त्यांना वासही येऊ शकतो. मात्र हलक्या उन्हात आतले कपडे वाळत घातल्यास हवा आणि ऊन यांमुळे ते चांगले वाळतात आणि स्वच्छ कोरडे होतात. 

Web Title: Underwear Hygien: Unhygienic Underwear Causes Women To Get Serious Illnesses, Remember 5 Rules Of Laundry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.