डायबिटीस ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. अगदी लहान वयापासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांना डायबिटीसने घेरलेले असते. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असले तर आरोग्याच्या गुंतागुंत वाढत जातात. असे होऊ नये यासाठी वेळीच निदान आणि उपचार झाले तर डायबिटीस आटोक्यात राहण्यास मदत होते. आपल्याला डायबिटीस आहे हे अनेकांना लक्षातच येत नाही. मग अचानक कधी टेस्ट केल्याच तर ही समस्या लक्षात येते, नाहीतर कित्येक महिने, वर्ष आपल्याला डायबिटीस आहे हे लक्षातही येत नाही (Unusual Symptoms of Diabetes in Women).
सतत भूक लागणे, वजन वाढणे आणि कमी होणे अशी काही सामान्य लक्षणे दिसल्यास व्यक्तीला डायबिटीस असण्याची शक्यता आहे असे आपण म्हणतो, पण इतकीच डायबिटीसची लक्षणे नसून त्यापलिकडेही काही लक्षणे असतात. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशन यांनी नुकतीच याबाबत काही माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये त्यांनी काही सामान्य वाटणारी लक्षणे डायबिटीससारख्या समस्येचे मूळ असू शकतात असं म्हटलं आहे.
१. व्हजायलन किंवा UTI इन्फेक्शन
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशननुसार महिलांमध्ये पुरुषांपेक्षा डायबिटीसची लक्षणे वेगळी असतात. डायबिटीस झालेल्या महिलांना काही वेळा व्हजायनल फंगल इन्फेक्शन झाले असण्याची शक्यता असते. यामुळे आग होणे, खाज येणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
२. हृदयाशी निगडीत समस्या
डायबिटीस झालेल्या महिलांना पुरुषांपेक्षा हृदयाच्या समस्या तीन ते चार पट जास्त असण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयाशी संबंधित काही त्रास झाला तर तो अंगावर न काढता लगेचच डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
३. मासिक पाळीशी निगडीत समस्या
डायबिटीस असणाऱ्या महिलांना मासिक पाळी अनियमित येणे, मूल न होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच शारीरिक संबंधांमध्ये रस नसणे, योनी कोरडी पडणे अशा समस्याही निर्माण होतात.
डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी
१. युरीन इन्फेक्शन टाळण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे
२. आतले कपडे सुती कापडाचे असावेत.
३. मूत्राशय पूर्ण भरेपर्यंत वाट न पाहता दर काही वेळाने लघवीला जाऊन येणे
४. फायबर जास्त असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
५. जास्तीत जास्त भाज्या खाणे, प्रोटीनचा आहारात समावेश करणे, आहारातील फॅटसचे प्रमाण कमी करणे या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.
६. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दारु, प्रोसेस्ड फूड आणि गोड पदार्थ यांपासून शक्य तितके दूर राहण्याचा प्रयत्न करावा.