बिघडलेली जीवनशैलीमुळे कोलेस्टेरॉलची समस्या वाढत चालली आहे. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ही समस्या उद्भवते. पण या समस्येमुळे गंभीर आजारांचा धोकाही वाढतो, हे तितकंच खरं (Health Tips). यामुळे हृदयविकाराचा झटका, डायबिटिज, रक्तप्रवाहात ब्लॉकेज किंवा पक्षाघाताचा देखील धोका वाढतो (Bad Cholesterol).
पण रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करणारं उच्च कोलेस्टेरॉल वाढतो कसा? याची लक्षणं शरीराच्या कोणत्या भागात दिसून येतात?(Unusual symptoms of high cholesterol seen in feet and legs).
यासंदर्भात, आयएचबीअएस हॉस्पिटलमधील डॉ. इमरान अहमद सांगतात, 'जेव्हा शरीरात कोलेस्टेरॉलची समस्या वाढते. तेव्हा शरीर धोक्याचे संकेत देत असते. यामुळे आपले शरीर गंभीर आजारांना बळी पडते. जेव्हा शरीरात उच्च कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, तेव्हा विचित्र लक्षणे आपल्या पायात दिसू लागतात. अशावेळी डॉक्टरांशी संपर्क साधून लिपिड प्रोफाइल टेस्ट करून घ्यावी.'
वजन कमी होईल म्हणून साखरेऐवजी गुळ खाता? तज्ज्ञ सांगतात वाढेल झपाट्याने वजन आणि..
बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यावर पायात दिसतात अशी लक्षणं
पाय सुन्न पडणे
बॅड कोलेस्टेरॉलमुळे रक्त प्रवाहात अडचण निर्माण होते. जेव्हा बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, तेव्हा पायांच्या रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होते. ज्यामुळे पाय सुन्न पडते.
पाय थंड पडणे
जेव्हा धमन्यांमध्ये बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढत जाते, तेव्हा पायांमध्ये रक्ताची कमतरता भासते. ज्यामुळे कधीकधी आपले पाय थंड होऊ लागतात. शिवाय पायांची हालचाल करण्यात अडचण निर्माण होते.
पाय दुखणे
ब्लॉकेजमुळे जेव्हा रक्तप्रवाह नीट होत नाही, तेव्हा ऑक्सिजनही आपल्या पायापर्यंत नीट पोहोचू शकत नाही. अशावेळी पायात तीव्र वेदना होणे स्वाभाविक आहे.
जिम-डाएट करूनही वजन घटत नाही? मग कोमट पाण्यात मिसळा एक रस-मिळतील फायदेच फायदे
पायांच्या त्वचेच्या आणि नखांच्या रंगात बदल
जर आपल्या पायांच्या त्वचेच्या किंवा नखांच्या रंगात बदल होताना दिसत असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे एक मुख्य वाढत्या कोलेस्ट्रॉलचे लक्षण आहे. असे घडल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
वारंवार गोळे येणे
जेव्हा बॅड कोलेस्टेरॉलची समस्या वाढते, तेव्हा पायांमध्ये वारंवार गोळा येण्याची समस्या वाढते. ही समस्या आपल्याला चालताना किंवा व्यायाम करताना उद्भवते. मुख्य म्हणजे पायांमध्ये गोळे कधीही येऊ शकतात. जर आपल्या पायांमध्ये वारंवार गोळे येत असतील तर, त्याकडे दुर्लक्ष करू नका.