Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रक्तात वाढलेलं युरीक ॲसिड कंट्रोलमध्ये ठेवतात स्वयंपाकघरातले ४ पदार्थ; तब्येत राहील ठणठणीत

रक्तात वाढलेलं युरीक ॲसिड कंट्रोलमध्ये ठेवतात स्वयंपाकघरातले ४ पदार्थ; तब्येत राहील ठणठणीत

Uric Acid Control Tips : युरिक ॲसिड वाढलं की अनेक दुखणी त्रास द्यायला लागतात. अशावेळी आहार कसा सांभाळायचा?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 08:56 AM2022-08-04T08:56:00+5:302022-08-04T11:59:15+5:30

Uric Acid Control Tips : युरिक ॲसिड वाढलं की अनेक दुखणी त्रास द्यायला लागतात. अशावेळी आहार कसा सांभाळायचा?

Uric Acid Control Tips :Research suggests these 4 things are home remedies for uric acid helps to control | रक्तात वाढलेलं युरीक ॲसिड कंट्रोलमध्ये ठेवतात स्वयंपाकघरातले ४ पदार्थ; तब्येत राहील ठणठणीत

रक्तात वाढलेलं युरीक ॲसिड कंट्रोलमध्ये ठेवतात स्वयंपाकघरातले ४ पदार्थ; तब्येत राहील ठणठणीत

रक्तातील युरिक अ‍ॅसिडच्या वाढीला हायपरयुरिसेमिया म्हणतात. आजच्या काळात, हा आजार लोकांमध्ये खूप सामान्य आहे.  मेयो क्लिनिकच्या  रिपोर्टनुसार बहुतेक वेळा जेव्हा तुमची मूत्रपिंडे युरिक अ‍ॅसिड कार्यक्षमतेने काढून टाकू शकत नाहीत तेव्हा युरिक अ‍ॅ सिडची पातळी वाढते. (home remedies for uric acid ) जास्त वजन असणे, मधुमेह असणे, लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ घेणे आणि जास्त अल्कोहोल पिणे यामुळे शरीरातील युरिक अॅसिडची पातळी वाढल्याने अनेक आजारांचा धोकाही वाढतो. (Research suggests these 4 things are home remedies for uric acid helps to control)

या आजारांमध्ये प्रामुख्याने गाउट, हृदयविकार, किडनीशी संबंधित समस्यांचा समावेश होतो.  पुरुषांमध्ये 3.4-7.0 मिलीग्राम पर्यंत युरिक अ‍ॅसिड, महिलांमध्ये 2.4-6.0 मिलीग्रामपर्यंत युरीक अ‍ॅसिड असल्यास  धोका नाही. जर तुमच्या शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढले असेल तर तुम्ही काही उपायांनी त्यावर नियंत्रण मिळवू शकता.

१) ऍपल सायडर व्हिनेगर हे एक नैसर्गिक क्लींजर आणि डिटॉक्सिफायर आहे जे शरीरातून युरिक अ‍ॅसिड काढून टाकण्याचे काम करते. यामध्ये असलेले गुणधर्म युरिक अ‍ॅसिड काढण्याचे काम करतात. 1 चमचे ऍपल  सायडर व्हिनेगर एका ग्लास पाण्यात विरघळवा. आता हे द्रावण दिवसातून 2-3 वेळा प्या.  युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात येईपर्यंत हे करत राहा.

रोज सकाळी चालायला जायच्या आधी आणि नंतर काय खाल? खा योग्य, तरच चालून व्हाल फिट

२) एका अभ्यासानुसार, लिंबू तुमच्या शरीरात अल्कलाइनचा प्रभाव वाढवून युरिक अ‍ॅसिड कमी करण्याचे काम करते. यासोबतच यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी यूरिक अॅसिडची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करू शकते. एका ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस पिळून घ्या. त्यानंतर सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. आठवडाभर सेवन केल्यावर त्याचा परिणाम लगेच दिसून येतो.

३) एनसीबीआयच्या मते, ऑलिव्ह ऑईल युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी काम करू शकते. वास्तविक, व्हिटॅमिन ई व्यतिरिक्त, व्हिटॅमिन के, लोह, ओमेगा 3, फॅटी अ‍ॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स त्यात आढळतात, जे युरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत करतात. भाज्या शिजवण्यासाठी तूप किंवा इतर खाद्यतेलाऐवजी ऑलिव्ह ऑईल वापरा.

 पुरूषांची प्रजनन क्षमता वाढवतात हे ५ पदार्थ; फर्टिलिटी वाढून लैंगिक आजार राहतील दूर

४) युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करण्यासाठी बेकिंग सोडा खूप फायदेशीर आहे. युरिक अ‍ॅसिड ते कमी करण्यासोबतच गाउटचा त्रास दूर करण्याचेही काम करते. सोडा अल्कधर्मी पातळी राखतो ज्यामुळे युरिक अ‍ॅसिड विरघळते. एक ग्लास पाण्यात एक किंवा अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळा आणि दिवसातून दर 2-4 तासांनी प्या. असे सतत दोन आठवडे केल्याने फायदा दिसू लागतो.

Web Title: Uric Acid Control Tips :Research suggests these 4 things are home remedies for uric acid helps to control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.