Join us   

सतत लघवी लागते? आग- जळजळ होते? ४ घरगुती उपाय, डॉक्टरांचाही सल्ला आवश्यक कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2022 3:13 PM

Urine Problem वारंवार लघवीला लागणे हे गंभीर आजाराचे लक्षण असूच शकते...

लघवीला सतत जावे लागणे ही समस्या आहे की आजाराचे लक्षण? लघवी करताना जळजळ होणे ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या इन्फेक्शनमुळे होऊ शकते. जळजळ होण्याबरोबरच,  ओटीपोटात दुखणे यासारख्या समस्या उद्भवतात. याव्यतिरिक्त, जे लोक पुरेसे पाणी पीत नाहीत त्यांना देखील लघवीमध्ये जळजळ होते. काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब केल्यास लघवीत जळजळ कमी होऊ शकते. डॉक्टरांचा सल्ला ही घ्या..

पुरेसे पाणी पिणे

लघवीमध्ये जळजळ होण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, आपण प्रथम पुरेसे पाणी पिणे सुरू केले पाहिजे. ज्यात आपण लिंबू पाणी अथवा पुदिन्याचा अर्क वापरू शकता. प्रत्येक व्यक्तीने दररोज 8 मोठे ग्लास किंवा तीन लिटर पाणी प्यावे. जेणेकरून हे संक्रमण वाढण्यापासून रोखण्यास मदत करेल.

फळांचा रस उपयुक्त

हंगामी फळांचा रस प्या. यासोबतच हिरव्या भाज्यांचे अधिकाधिक सेवन करा. फळांचे रस आणि हिरव्या भाज्या, शरीरातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करेल. यासह पाण्याची पातळी राखण्यासाठी काम करतील.

नारळ पाणी

लघवीशी संबंधित काही समस्या असल्यास नारळाच्या पाण्याचे नियमित सेवन करावे. नारळ पाणी हे अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा नैसर्गिक स्रोत आहे. यासोबतच शरीराला हायड्रेट ठेवण्याचे कामही करते. नारळाचे पाणी नियमित प्यायल्यास लघवीत जळजळ होत नाही. 

दही

दररोज छोटी वाटी दही खा. दह्यामधील नैसर्गिक प्रतिजैविकं शरीरात असलेल्या हानिकारक जिवाणूंचा नाश करण्यास मदत करतात. हे पचनसंस्था आणि मूत्रपिंडदेखील निरोगी ठेवतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल