Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Urination After Eating : जेवल्यानंतर लगेचच लघवीला जाता? ६ आजाराचं कारण ठरू शकते ही सवय

Urination After Eating : जेवल्यानंतर लगेचच लघवीला जाता? ६ आजाराचं कारण ठरू शकते ही सवय

Urination After Eating : तुम्ही जेवढे पाणी प्याल त्यानुसार लघवी करणे ठीक आहे, पण जर तुम्हाला जास्त लघवी होत असेल किंवा जेवल्यानंतर लगेच लघवी होत असेल तर हे काही अंतर्गत आजाराचे लक्षण असू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 11:47 AM2022-02-08T11:47:27+5:302022-02-08T13:07:42+5:30

Urination After Eating : तुम्ही जेवढे पाणी प्याल त्यानुसार लघवी करणे ठीक आहे, पण जर तुम्हाला जास्त लघवी होत असेल किंवा जेवल्यानंतर लगेच लघवी होत असेल तर हे काही अंतर्गत आजाराचे लक्षण असू शकते.

Urination After Eating : Pee after eating here 6 possible reasons and disease you are peeing after meal or frequent urination | Urination After Eating : जेवल्यानंतर लगेचच लघवीला जाता? ६ आजाराचं कारण ठरू शकते ही सवय

Urination After Eating : जेवल्यानंतर लगेचच लघवीला जाता? ६ आजाराचं कारण ठरू शकते ही सवय

लघवी शरीरातील कचरा तर काढून टाकतेच पण तुमच्या आरोग्याबाबतही बरेच काही सांगते. शरीरात वाढणारे अनेक रोग लघवीचा रंग आणि वासावरून ओळखता येतात. हेच कारण आहे की अंतर्गत रोग तपासण्यासाठी डॉक्टर लघवी तपासणीची शिफारस करतात. दिवसातून किती वेळा लघवी करावी? (frequent urine infection) या प्रश्नाच्या उत्तरात, क्लीव्हलँड क्लिनिकचा असा विश्वास आहे की दिवसातून चार ते आठ वेळा लघवी करणे हे पूर्णपणे सामान्य आहे. यापेक्षा जास्त लघवी करण्यासाठी तुम्ही बाथरूममध्ये जात असाल तर तुम्ही सावध व्हा. (Pee after eating here 6 possible reasons and disease you are peeing after meal or frequent urination)

तुम्ही जेवढे पाणी प्याल त्यानुसार लघवी करणे ठीक आहे, पण जर तुम्हाला जास्त लघवी होत असेल किंवा जेवल्यानंतर लगेच लघवी होत असेल तर हे काही अंतर्गत आजाराचे लक्षण असू शकते. ज्याकडे दुर्लक्ष करू नये. वारंवार लघवी होणे हे मूत्रपिंडाच्या आजारापासून ते जास्त द्रव पिण्यापर्यंत अनेक वेगवेगळ्या समस्यांचे लक्षण असू शकते. (frequent urine infection)

तज्ज्ञांच्या मते एखाद्याला वारंवार लघवी होत असेल किंवा काही खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर लगेचच टॉयलेटला जावे लागत असेल तर हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. याशिवाय तुम्हाला लघवीसोबत ताप येणे, लघवीवर नियंत्रण न राहणे, ओटीपोटात दुखणे किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर ते युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) चे लक्षण असू शकते.

डायबिटीस

सामान्यपणे वारंवार लघवी होणे हे टाइप 1 आणि टाइप 2 डायबिटीसचे प्रारंभिक लक्षण असू शकते. कारण शरीर लघवीद्वारे ग्लुकोजपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करते. अशा परिस्थितीत तुम्ही संध्याकाळी जास्त पाणी आणि कॅफिनचे सेवन टाळावे.

व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये पार्टनरला द्या स्वस्तात मस्त गिफ्ट; 500 रूपयांत गिफ्ट करता येतील या वस्तू

प्रोस्टेट

एक वाढलेली प्रोस्टेट मूत्रमार्गावर दाबू शकते (शरीराबाहेर मूत्र वाहून नेणारी नळी). यामुळे लघवीचा प्रवाह रोखला जाऊ शकतो. यामुळे मूत्राशयाची भिंत खराब होऊ शकते. थोड्या प्रमाणात लघवी असतानाही मूत्राशय आकुंचन पावू लागतो, ज्यामुळे वारंवार लघवी होते.

इंटरस्टिशियल सिस्टाइटीस

इंटरस्टिशियल सिस्टिटिस ही एक गंभीर स्थिती आहे ज्यामुळे मूत्राशय आणि पेल्विक पार्टमध्ये वेदना होऊ शकते. या अवस्थेत लघवी करण्याची इच्छा असते पण लघवी सहज बाहेर येत नाही.

स्ट्रोक संबंधित आजार

काहीवेळा मूत्राशयाला पुरवठा करणाऱ्या मज्जातंतूंना झालेल्या नुकसानामुळे मूत्राशयाच्या कार्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे वारंवार आणि अचानक लघवी करण्याची इच्छा होते. ही एक गंभीर स्थिती आहे ज्यास त्वरित आणि योग्य उपचारांची आवश्यकता आहे.

 वाढलेली शुगर लेव्हल झटपट कमी करतील ६ पदार्थ; इन्शुलिन इंजेक्शनची गरजही होईल कमी

हाइपरलकसीमिया

याचा अर्थ तुमच्या रक्तातील कॅल्शियमची पातळी सामान्यपेक्षा जास्त आहे. हायपरकॅल्सेमिया बहुतेकदा मानेच्या चार लहान ग्रंथींपैकी एकाच्या अतिक्रियाशीलतेमुळे (पॅराथायरॉइड ग्रंथी) किंवा कर्करोगामुळे होतो. हायपरक्लेसेमियाची लक्षणे सौम्य ते गंभीर अशी असतात. त्यामध्ये वाढलेली तहान आणि लघवी, ओटीपोटात दुखणे, मळमळ, हाडे दुखणे, स्नायू कमकुवतपणा, गोंधळ आणि थकवा यांचा समावेश असू शकतो.

पेल्विक फ्लोर डिसॉर्डर

ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये पेल्विक स्नायू कमकुवत होतात. हे स्नायू मूत्राशय आणि पुनरुत्पादक अवयवांना आधार देतात. बद्धकोष्ठता, मलावरोध, वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे इ. याची विविध कारणे असू शकतात, जसे की बाळंतपण, ज्यामुळे ओटीपोटाचा भाग खराब होऊ शकतो किंवा वृद्धत्व ज्यामुळे मूत्राशयाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात.
 

Web Title: Urination After Eating : Pee after eating here 6 possible reasons and disease you are peeing after meal or frequent urination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.