Join us   

लघवीचा रंग बदलला, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा! तज्ज्ञ सांगतात, लघवीचा रंग आणि आजारांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2023 6:59 PM

Urine Color: What It Says About Your Health लघवी कोणत्या रंगाची होते यावर पण तब्येतीचं बरं वाईट कळू शकतं, त्यामुळे तातडीने डॉक्टरांना भेटा

शरीरातील अवयव योग्यरित्या कार्य करत आहे की नाही, याबाबत अनेकदा आपले शरीर संकेत देत असते. डॉक्टर जिभेचा बदलता रंग, अथवा लघवीच्या रंगामधून आपला आजार ओळखण्याचा प्रयत्न करतात. लघवीच्या बदलत्या रंगानुसार आपल्या शरीरात काय गडबड सुरु आहे याची माहिती मिळते. किडनी, मधुमेह, युरिन इन्फेक्शन या गंभीर आजाराच्या निगडीत माहिती देखील लघवीच्या तपासणीतून मिळते. असे बरेच लोक असतील, ज्यांनी आयुष्यात कधी ना कधी पॅथॉलॉजिकल युरिन टेस्ट केली असेल. यामध्ये लघवीची वेगवेगळ्या प्रकारे चाचणी करून रोग शोधला जातो.

यासंदर्भात हरजिंदगी या वेबसाईटने मयूर विहार क्लिनिकचे डॉ. श्रीनिवासन यांच्याशी बातचीत केली, त्यांच्या म्हणण्यानुसार, ''सामान्यत: लघवीचा रंग हलका पिवळा असतो, पण जर तुम्हाला त्यात काही बदल दिसत असेल तर, लगेच डॉक्टरांना दाखवा. त्याबद्दल सांगा कारण, ही बाब आरोग्याच्या समस्या दर्शवते''(Urine Color: What It Says About Your Health).

फिकट पिवळा

हलक्या पिवळ्या रंगाची लघवी सामान्य आहे. हा रंग दर्शवतो की, तुमची तब्येत निरोगी आहे. व तुम्ही स्वतःला चांगले हायड्रेट ठेवत आहात. उत्तम आरोग्यासाठी ही सवय जपा. वेळेवर पाणी पीत रहा.

उन्हाळ्यात जुलाब, युरिन इनफेक्शनचा तर त्रास वाढला नाही? तुमचं पाणी शुद्ध आहे का..

पिवळा रंग

लघवीचा रंग पिवळा असेल तर, याचा अर्थ आपण पुरेसे पाणी पीत नाही. शरीरात जास्त घाम येणे किंवा कमी हायड्रेशनमुळे लघवीचा रंग पिवळा होतो. ही समस्या कमी करण्यासाठी अधिक प्रमाणावर पाणी प्या. तरी देखील रंगामध्ये बदल घडत नसेल तर, डॉक्टरांशी संपर्क साधा.

गडद पिवळसर रंग

काही औषधांमुळे लघवीचा रंग पिवळा होतो. परंतु, हा रंग काही दिवसानंतरही बदलला नाही तर, लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा कारण ते यकृताशी संबंधित आजार दर्शवते.

तरुण जोडप्यांमध्ये वाढते आहे वंध्यत्वाची समस्या, ५ गोष्टी बाळ हवे तर लक्षात ठेवा..

नारंगी रंग

लघवीतील नारंगी रंग बर्‍याचदा काही औषधांच्या सेवनामुळे, किंवा नैसर्गिक लिंबूवर्गीय फळांच्या सेवनामुळे होतो. हा रंग शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे दर्शवते. अशा परिस्थितीत जंक फूडऐवजी सकस आहाराचे सेवन करा, व पुरेसे पाणी पीत राहा. यासोबतच अशी फळे खा ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. पण तरीही जर लघवीचा रंग केशरी दिसत असेल तर, लगेच डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

लाल किंवा गुलाबी रंग

लघवी लाल होणे हे लघवीत रक्त असण्याचे लक्षण आहे. कधीकधी बीट किंवा ब्लॅकबेरी खाल्ल्याने देखील लघवी गुलाबी रंगाची दिसते. जर ही समस्या वारंवार उद्भवत असेल तर, आपल्याला यूरीन ट्रेक्‍टमध्ये इन्फेक्शन असल्याचे संकेत दर्शवते. किडनी स्टोन किंवा जास्त व्यायाम केल्यामुळे लाल रक्तपेशी तुटतात, त्यामुळेही लघवी गुलाबी किंवा लाल रंगाची दिसू शकते.

पांढऱ्या रंगाची लघवी

लघवीचा रंग पांढरा होत असेल तर, युरिन मार्गावर इन्फेक्शन किंवा किडनी स्टोनमध्ये बॅक्टेरियाचे प्रमाण वाढल्याचे लक्षण आहे. अशा स्थितीत डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स