Join us   

कडीपत्ता भाजीतून काढून फेकता? कढीपत्ता ठरतो ६ आजारांवर गुणकारी उपाय, न चुकता खाल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2023 11:48 AM

Use of Curry Leaves for Beauty And Health Issues : आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही उपयुक्त कडीपत्ता नेमका वापरायचा कसा याविषयी...

रोजच्या आहारात आपण मसाल्याच्या अनेक पदार्थांचा वापर करत असतो. पदार्थांना स्वाद आणि चव येण्यासाठी आपण मिरी, लवंग, वेलदोडे, तमालपत्र, दालचिनी असं काही ना काही वापरतो. इतकंच नाही तर आलं, लसूण, कांदा, कडीपत्ता यांसारख्या ओल्या मसाल्याचाही आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापर करतो. कडीपत्ता हा तर अनेक पदार्थांना फोडणी देताना आवर्जून वापरला जाणारा घटक. यामुळे पदार्थाचा स्वाद तर वाढतोच पण त्याची पौष्टीकता वाढायलाही मदत होते. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असलेला हा कडीपत्ता खाल्ल्याने केस आणि त्वचेच्या सौंदर्याशी निगडीत समस्या दूर होण्यास मदत होते. इतकेच नाही तर मायग्रेन, डोकेदुखी, डायबिटीस, थायरॉईड, तोंडाचा अल्सर, वजन कमी करणे, हार्मोन्सचे असंतुलन अशा विविध समस्यांवर कडीपत्ता उपयुक्त ठरतो. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यांनी कडीपत्त्याचे काही महत्त्वपूर्ण उपयोग आणि त्याचा वापर करण्याची पद्धत सांगितली आहे(Use of Curry Leaves for Beauty And Health Issues). 

कडीपत्त्याचा आहारात कसा समावेश करावा? 

एकतर कडीपत्त्याची पाने चावून खावीत. नाहीतर ग्लासभर पाण्यात कडीपत्ता ५ ते ७ मिनीटे चांगला उकळून मग त्याचे पाणी कोमट झाल्यावर प्यावे. यामुळे कडीपत्त्याचा सगळा अर्क आपल्याला मिळण्यास मदत होते. 

(Image : Google)

केसांच्या तक्रारीसाठी 

कडीपत्त्याचा हेअर पॅक, कडीपत्त्याचे तेल यांसारख्या गोष्टींचा वापर केल्यास केस गळणे कमी होण्यास मदत होते. तसेच केस पांढरे झाले असतील तरी कडीपत्त्याच्या पानांचा चांगला फायदा होतो. केसांतील उवा-लिखा घालवण्यासाठीही कडीपत्त्याची पेस्ट ताकात मिसळून लावल्यास ही समस्या दूर होते. 

मळमळ होत असेल तर..

६ कडीपत्त्याची पाने स्वच्छ धुवा आणि वाळवा. त्यानंतर अर्धा चमचा तूपामध्ये ही पाने चांगली परतून घ्या आणि चावून खा. 

जुलाब असेल तर 

कडीपत्त्याची साधारण ३० पाने घेऊन ती मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. त्यामध्ये ताक घालून हे मिश्रण प्यायल्यास जुलाबाची समस्या कमी होण्यास मदत होते. 

डायबिटीस 

कडीपत्त्याची चटणी करुन ती पोळी किंवा इतर कशासोबत खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. 

तोंडाचा अल्सर

कडीपत्त्याची पावडर करुन ती मधात मिक्स करावी. ही पेस्ट तोंडात ज्याठिकाणी अल्सर आहे त्याठिकाणी लावावी. २ ते ३ दिवस हा उपाय केल्यास याचा अतिशय चांगला उपयोग होतो.

तोंडाचा वास

तोंडाला वास येत असेल तर माऊथ फ्रेशनर म्हणून कडीपत्ता उत्तम काम करतो. कडीपत्त्याची ५ पाने घेऊन ती ५ मिनीटे चावावीत. त्यानंतर पाण्याने गुळण्या कराव्यात. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्स