कोणताही पदार्थ झटपट गरम करायचा असेल तर आता मायक्रोवेव्ह कसा पटकन कामाला येतो. काही घरांमध्ये तर पोळी, भाजी, वरण, भात असं सगळंच ताटलीत वाटून घेतात आणि ती ताटलीच मायक्रोवेव्हमध्ये ठेवून अन्न गरम करून घेतात. यामुळे कष्टही कमी होतात आणि वेळही वाचतो. पण असं करणं आरोग्याच्या दृष्टीने किती धोकादायक ठरू शकतं, याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली ही विशेष माहिती एकदा वाचायलाच हवी. कारण दुधापासून भाजीपर्यंत सरसकट सगळेच पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम करणं म्हणजे कॅन्सरला आमंत्रण देणारं ठरू शकतं (Use Of Microwave Can Cause Cancer). त्यामुळे कोणत्या पदार्थांसाठी मायक्रोवेव्हचा वापर करावा आणि कोणत्या पदार्थांसाठी टाळावा, हे एकदा जाणून घ्या....(Side effects of using microwave)
२ प्रकारचे पदार्थ गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरू नये
आहारतज्ज्ञ सांगतात की ज्या पदार्थांमध्ये प्रोटीन्स खूप जास्त असतात असे प्रोटीनयुक्त पदार्थ किंवा हाय प्रोटीन पदार्थ गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह मुळीच वापरू नये.
खा ५ भाज्या, शुगर कायम राहील नियंत्रणात
कारण तसे पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्याने त्यातल्या अन्नघटकांचे कम्पोझिशन बिघडते आणि ते तुमच्या शरीरात कॅन्सर निर्माण करणारे घटक तयार करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
तसेच जे पदार्थ ओलसर आहेत, असे कोणतेही पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये कधीही गरम करू नयेत.
ज्यांच्या ब्लड रिलेशनमध्ये कॅन्सरचे रुग्ण आहेत, त्यांनी मायक्रोवेव्हचा वापर टाळायलाच पाहिजे.
कोणत्या पदार्थांसाठी मायक्रोवेव्ह वापरावा?
जे पदार्थ कोरडे आहेत फक्त अशा पदार्थांसाठीच मायक्रोवेव्ह वापरावा.
जे पदार्थ ओलसर असतात, ते आधी रुम टेम्परेचरवर येऊ द्यावेत आणि त्यानंतर गॅसवर ठेवूनच गरम करावेत.