Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Vaginal health : प्रायव्हेट पार्ट्सचा त्रास म्हणजे अवघड जागेचं दुखणं; 'या' ६ टिप्सनी 'व्हज्यायनल हेल्थ'ची घ्या काळजी

Vaginal health : प्रायव्हेट पार्ट्सचा त्रास म्हणजे अवघड जागेचं दुखणं; 'या' ६ टिप्सनी 'व्हज्यायनल हेल्थ'ची घ्या काळजी

Vaginal health : योनीमार्ग स्वच्छ नसल्यास वास येणे, जळजळ होणे किंवा खाज येणे आणि संसर्ग होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे भविष्यात अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 01:13 PM2021-11-15T13:13:43+5:302021-11-15T13:22:29+5:30

Vaginal health : योनीमार्ग स्वच्छ नसल्यास वास येणे, जळजळ होणे किंवा खाज येणे आणि संसर्ग होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे भविष्यात अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

Vaginal health : Vaginal hygiene tips every woman should know | Vaginal health : प्रायव्हेट पार्ट्सचा त्रास म्हणजे अवघड जागेचं दुखणं; 'या' ६ टिप्सनी 'व्हज्यायनल हेल्थ'ची घ्या काळजी

Vaginal health : प्रायव्हेट पार्ट्सचा त्रास म्हणजे अवघड जागेचं दुखणं; 'या' ६ टिप्सनी 'व्हज्यायनल हेल्थ'ची घ्या काळजी

महिलांच्या आरोग्याशी संबंधित सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची योनी मार्गाची स्वच्छता. (Women's Health) शरीर पूर्णपणे निरोगी ठेवण्यासाठी योनीमार्ग निरोगी असणे खूप गरजेचे आहे. आता हळूहळू माहितीच्या वाढत्या व्याप्तीमुळे आणि देशातील महिलांच्या जागरूकतेमुळे योनिमार्गाच्या स्वच्छतेबद्दल काही प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे. योनी आणि प्रजनन मार्ग निरोगी ठेवण्यासाठी, महिलांचे गुप्तांग स्वच्छ आणि निरोगी असणे सर्वात महत्वाचे आहे. (Private Parts Hygine) 

असे केल्याने तुम्ही संसर्गाची समस्या देखील टाळू शकता. योनीमार्ग स्वच्छ नसल्यास वास येणे, जळजळ होणे किंवा खाज येणे आणि संसर्ग होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे भविष्यात अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. या आहेत योनीमार्गाच्या स्वच्छतेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी. (how to take care of private parts)

वजायनल  स्वच्छता कशी ठेवावी?  (7 Tips to Keep Your Vagina Happy And Healthy)

योनीचे pH लेव्हल सहसा 3.8-4.5 दरम्यान असते. याला अम्लीय पीएच म्हणतात ज्यामध्ये फायदेशीर जीवाणू देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. हे जिवाणू संसर्ग दूर करण्याचेही काम करतात. योनिमार्गातून स्त्राव बाहेर पडतो, ज्यामुळे काहीवेळा संसर्ग योनीमध्ये पसरतो किंवा दुर्गंधी, वेदना, जळजळ किंवा पुरळ येण्याची समस्या असू शकते.  या समस्यांचे कारण अस्वच्छ योनी हे मानलं जातं. प्रत्येक स्त्रीने त्वरित त्याकडे लक्ष दिले पाहिजे. योनी किंवा योनीमार्गातील कोणत्याही प्रकारची समस्या तुमच्या प्रजनन क्षमता आणि योनीच्या आरोग्यावर परिणाम करू शकते.

पन्नाशीत बिझनेस सुरू करून श्रीमंतांच्या पंक्तीत बसल्या; नायर ताईंचा बिझनेस सुरू करणाऱ्या महिलांना सल्ला

योनी हा स्त्रियांच्या सर्वात संवेदनशील अवयवांपैकी एक आहे. त्यामुळे त्याकडे थोडेसा निष्काळजीपणाही महिलांना जड जाऊ शकतो. योनीमार्गाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने महिलांना नंतर अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. महिलांनी दररोज आंघोळ करण्याइतकंच त्यांच्या योनीमार्गाच्या आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. योनीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक स्त्रीने या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. (Health Issues Specific to Women’s Health)

१) दररोज योनी पूर्णपणे स्वच्छ करा. शरीरातील बदल आणि हार्मोनल बदलांमुळे तुम्हाला मासिक पाळी आणि योनीतून स्त्राव होण्याची समस्या येते, त्यामुळे तुम्ही तुमच्या योनीची चांगली काळजी घेतली पाहिजे. नियमित स्वच्छता करून  संसर्ग टाळू शकता.

२)  योनीचा आतील भाग सतत धुवू नका. योनीमार्ग किंवा योनीमार्गाचा बाहेरील भाग नियमितपणे धुवावा, स्वच्छ करावा पण योनीमार्गाचा आतील भाग सतत धुवू नये. त्यामुळे पीएच संतुलन बिघडण्याची शक्यता असते.

३) योनीची त्वचा अतिशय मऊ आणि संवेदनशील असते, त्यामुळे स्वच्छ  करताना हातमोजे किंवा स्पंज इत्यादी वापरू नका.

४) योनीमार्गात कोरडेपणा  देखील महिलांना त्रासदायक ठरू शकते. वास्तविक, इस्ट्रोजेनची पातळी आणि तणाव कमी झाल्यामुळे हे होते. हे टाळण्यासाठी अंडरगारमेंट्स नियमित बदलत राहा.

५) योनिमार्गातील द्रवपदार्थ किंवा स्त्राव इत्यादींमुळे तुमचे अंतर्वस्त्र काही वेळा ओले होऊ शकते. तुम्ही ते नेहमी ओले होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत. ओले अंतर्वस्त्र कधीही वापरू नका.

झरझर वजन कमी होण्यासह डायबिटीसही कंट्रोलमध्ये राहिल; फक्त जेवल्यानंतर १ काम करा

६) प्युबिक हेअरर्स शेव करण्याऐवजी कात्री किंवा ट्रिमरच्या साहाय्यानं ट्रिम करून घ्या . शेविंग नुकसान पोहोचवू शकतं. त्वचेवर जळजळ होऊ शकते. याशिवाय चुकीचा कट झाल्यानंतर अनेक समस्या येतात. 

७) मासिक पाळी दरम्यान, तुम्हाला दुर्गंधी येऊ शकते किंवा तुमच्या योनीच्या वासात बदल होऊ शकतो. पण यातही, जर तुम्ही नियमित साफसफाईचे नियम पाळले तर काही समस्या उद्भवणार नाही.  तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या टिप्स फॉलो करा आणि योनीच्या आरोग्याची काळजी घ्या.

Web Title: Vaginal health : Vaginal hygiene tips every woman should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.