Join us   

Vaginal Health : 'या' कारणांमुळे उद्भवतात प्रायव्हेट पार्ट्समध्ये त्रासदायक पुळ्या; कारणं, उपाय समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 6:13 PM

Vaginal Health : योनिमार्गातील फोड, योनीजवळ पू किंवा जळजळीसह वाढलेल्या पुळ्या असतात. हे मुरुम योनीच्या बाहेरील बाजूस, मांडीवर विकसित होऊ शकतात.

व्हजायनल एरियामध्ये लहान पुळी आली तरी खूप वेदना जाणवतात. याला व्हजायनल बॉल्स म्हअतात. प्रायव्हेट पार्ट्सची त्वचा संवेदनशील असते.  यामुळे इंफेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. बॅक्टेरियांची वाढ झाल्यनं रोमछिद्र सुजतात आणि बारीक दाण्यांप्रमाणे पुळ्या येतात. पिंपल्ससारख्या दिसत असलेल्या पुळ्यांचे रुपांतर गाठीत होते. व्हजायनल बॉल्सपासून सुटका मिळवण्याचे उपाय पाहूया. (What is vaginal boils how to get rid of it)

व्हजायनल बॉइल्स म्हणजे काय?

ओन्ली माय हेल्थच्या रिपोर्टनुसार योनिमार्गातील फोड, योनीजवळ पू किंवा जळजळीसह वाढलेल्या पुळ्या असतात. हे मुरुम योनीच्या बाहेरील बाजूस, मांडीवर विकसित होऊ शकतात. हे बॅक्टेरियांच्या संसर्गामुळे होऊ शकते. या पिंपल्समधून कधी कधी पिवळा स्त्राव होऊ शकतो. हे मुरुम सिस्टच्या स्वरूपात देखील विकसित होऊ शकतात. हे पिंपल्स एक ते दोन आठवडे टिकतात. त्याची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधणे फार महत्वाचे आहे.

व्हजानल बॉल्सची कारणं

१) त्वचेवर कोणत्याही  कट या इंफेक्शन झाल्यास

२) व्हजायन पार्ट्स अस्वच्छ असणं  यामुळे पुळ्या येऊ शकतात. 

३) हेअर फॉलिकल्समध्ये इन्फेक्शन झाल्यानं पू येऊ शकतो. 

४) जास्त घट्ट कपडे घातल्यानं इन्फेक्टेड स्किनवर इरिटेशन होऊ शकतं. 

५) सिस्टमुळे अशा पुळ्या येऊ शकतात.  

उपाय

१) मुरुम बरे होईपर्यंत सैल अंडरवेअर आणि कपडे घाला. व्यायामानंतर स्वच्छ आणि कोरडे अंतर्वस्त्र घाला.

२) मुरुमांवर स्वच्छ, उबदार, ओले वॉशक्लोथ ठेवा आणि 10 ते 15 मिनिटे तसंच राहू द्या. दिवसातून तीन ते चार वेळा ही क्रिया पुन्हा करा. असे केल्याने संसर्ग कमी होऊ शकतो.

३) मुरुम फुटल्यास, प्रभावित क्षेत्र  पाण्यानं स्वच्छ करा. दररोज स्वच्छ धुतलेले कपडे घाला.

४) पिंपल्समध्ये जास्त वेदना होत असल्यास पेनकिलर वापरा. हे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करेल.

५) जास्तीत जास्त पाणी प्या.

टॅग्स : महिलाआरोग्यहेल्थ टिप्स