Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > महिलांना व्हेरिकोज व्हेन्सचा प्रचंड त्रास का होतो? पायांवरची काळी-निळी लक्षणं काय सांगतात..

महिलांना व्हेरिकोज व्हेन्सचा प्रचंड त्रास का होतो? पायांवरची काळी-निळी लक्षणं काय सांगतात..

Varicose Veins Problem In Women : महिलांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षाही जास्त आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2023 04:31 PM2023-06-02T16:31:39+5:302023-06-03T00:40:07+5:30

Varicose Veins Problem In Women : महिलांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षाही जास्त आहे.

Varicose Veins Problem In Women : Why do women suffer from varicose veins? What do the black-blue symptoms on the legs mean? | महिलांना व्हेरिकोज व्हेन्सचा प्रचंड त्रास का होतो? पायांवरची काळी-निळी लक्षणं काय सांगतात..

महिलांना व्हेरिकोज व्हेन्सचा प्रचंड त्रास का होतो? पायांवरची काळी-निळी लक्षणं काय सांगतात..

डॉ. जतीन 

व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास स्त्रियांना फार छळतो. स्त्रियांमध्ये हॉर्मोनल बदलांमुळे हा त्रास जास्त प्रमाणात होत असतो. मासिक पाळी येण्याआधी होणारे हॉर्मोनल बदल, गरोदरपणात शरीराचे वाढणारे वजन आणि होणारे हॉर्मोनल बदल, पाळी जात असताना होणारे हॉर्मोनल बदल, बर्थ कंट्रोलची औषधे, मेनोपॉज नंतर काही जणांनी घेतलेली हार्मोन्सची औषधे, हार्मोन्स नसांची पटल(वाॅल्स) काही प्रमाणात प्रवर्तित(फुगीर) करण्यास कारणीभूत ठरतात यामुळे स्त्रियांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो ( Varicose Veins Problem In Women).

खूप साध्या आणि सरळ शब्दांमध्ये सांगायचं तर व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय तर अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठी, त्या नसांमध्ये होतात  म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स होय. याच व्हेरिकोज व्हेन्स ला मराठीत अपस्फित नीला असं म्हणतात. आपल्या पायावर निळ्या जांभळ्या रंगाच्या नसा दिसायला लागल्या की त्याकडे दुर्लक्ष करू नये कारण त्या असतात व्हेरिकोज व्हेन्स, शरीरात अशुद्ध रक्त वाहून नेण्यासाठी नसा किंवा शीरा असतात, या नसांमध्ये कुठल्या अमुक अमुक कारणामुळे जर रक्त जमा झाले आणि त्या फुगीर झाल्या तर या त्रासाला व्हेरिकोज व्हेन्स असे म्हणतात. या वाहिन्या पायाच्या पृष्ठभागावर ठळकपणे दिसू लागल्या तर याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

व्हेरिकोज व्हेन्सची कारणे काय?

१. जास्त वेळ उभं राहणे किंवा जास्त वेळ बसणे

उभं राहणे ही गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात होणारी क्रिया आहे, यासाठी रक्ताला या शक्तीच्या विरोधात प्रवाहित व्हावे लागते, हे असे एकप्रवाही वाहत राहण्यासाठी, ह्या रक्तवाहिन्यांमध्ये एकतर्फी वाल्व असतात, हे पटल रक्त प्रवाह मागे वाहण्यापासून रोखते, ज्यावेळी हे पटल कार्यरत नसते त्यावेळी हे रक्त एकाच ठिकाणी साठते आणि व्हेरिकोज व्हेन्स चा त्रास उद्भवतो.

(Image : Google)
(Image : Google)

२. लठ्ठपणा

वाढलेल्या वजनामुळे पायावर अधिक ताण निर्माण होतो त्यामुळे व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होतो, वाढलेलं मेद नसांवर बाहेरून अधिक दबाव टाकत असते, आणि त्यामुळेच या नसांचे नुकसान होत असते, या नसा नाजूक असल्यामुळे हा दबाव सहन न होऊन त्या पाण्यासारख्या भागांमधून हृदयाकडे रक्तपुरवठा करण्यास अपयशी ठरतात. अशा प्रकारे लठ्ठपणाचा व्हेरिकोज व्हेन्स वर परिणाम होत असतो .

३. गरोदरपणात वाढलेल्या वजनामुळे

गरोदरपणात बाळाचे आणि त्यामुळेच आईचे वजन वाढत असते, अशावेळी जास्त वेळ बसून राहू नये किया जास्त वेळ उभे ही राहू नये, पाय दुमडून जास्त वेळ बसू नये, हा व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास प्रसूती नतंर काही दिवसातच निघून जातो, पण तरीही गरोदरपणात दिवसभरात ८-१० ग्लास पाणी प्यावे, दिवसभरात हलकासा व्यायाम करावा, व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असल्यास कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स किंवा मॅटर्निटी टाईट्सचा वापर करावा.

४. आनुवंशिकता

जर कुटुंबात कोणाला व्हेरिकोज व्हेन्स असेल तर ते आपल्यातही उद्भवू शकते. म्हणून नियमित व्यायाम, संतुलित आहार हे सगळं चालू ठेवावे.

५. उंच टाचांच्या चपला, हाय हिल्सचा वापर

उंच टाचांच्या चपला मुळे आपली नैसर्गिक चाल बदलते, म्हणजेच आपलं पूर्ण शरीराचं वजन पायाचा अंगठा आणि पायाच्या वरच्या भागावर जास्त असते, ज्यामुळे पोटरीचा भाग जास्त प्रमाणात आखडून असतो, आपण ज्यावेळी नॉर्मल चालतो तेव्हा पाय आणि पोटरी चा संतुलनांतून रक्तपुरवठा पोटरीचा भागाच्या साहाय्याने हृदयाकडे होत असतो, हे रक्त कुठेही थांबत नाही किंवा साठून राहत नाही, परंतु ज्यावेळी पायाचा खालचा भाग काम न करता जमिनीचा संपर्कात नसतो त्यामुळे अशा प्रकारची पंपिंग होत नाही, पोटरीचा भाग आकुंचित राहिल्यामुळे, आखडून असल्यामुळे रक्त वर जाण्यास मज्जाव निर्माण होतो व त्यामुळे व्हेरिकोज व्हेन्स चा त्रास सुरु होतो.

६. अती मीठ असलेले अन्न पदार्थ सेवन करणे

मीठामध्ये सोडियम असते, ज्यामुळे वॉटर रिटेंशन होते, म्हणजेच शरीरातील टिशूज मध्ये पाणी साचून राहते, ज्यामुळे रक्ताची घनता वाढते आणि हेच कारण असते ब्लड प्रेशर वाढण्याचे, त्यामुळे नसांचा आकार वाढू शकतो, बरेचदा हे टिशूज मध्ये साठलेले पाणी पायाचा खालचा भागात व्हेरिकोज व्हेन्सचे कारण ठरते.

७. नियमित व्यायाम न करणे किंवा व्यायामाची कमतरता

नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरातील प्रत्येक भागाला रक्त पुरवठा होतो, शरीरातील कुठल्याच भागात रक्त साठून राहत नाही. स्थूलता येत नाही, आणि व्हेरिकोज व्हेन्स त्रास तर मुळीच होत नाही.

व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणे

१. उभं राहिल्यावर पाय दुखायला लागणे.

२. शिरांमध्ये रक्त साचून गाठी तयार होणे व शिरा असलेल्या ठिकाणी सूज येणे.

३. शिरा सुजल्यामुळे खाज येणे, पाय दुखणे पायावर सूज येणे.

४. शिरा पृष्ठभागावर दिसणे, या शिरा निळ्या जांभळ्या पायाच्या त्वचेवर दिसून येतात.

५. पाय किंवा घोट्याला सूज येणे.

६. शिरांचा सभोवताली त्वचा घट्ट व कडक जाणवणे.

व्हेरिकोज व्हेन्सवर उपाय

१. धूम्रपान आणि मद्यपान करु नये.

(Image : Google)
(Image : Google)

२. झोपताना पायाखाली उशी घेऊन झोपणे जेणेकरून पायाला नीट रक्तपुरवठा होईल.

३. हाई हिल्स घालणे टाळणे, आणि घातलेच तर जास्त वेळ उभे राहू नये.

४. नियमित व्यायाम सुरु करणे, पायाचे व्यायाम रोज करणे, रोज सकाळी चालायला जाणे अतिउत्तम.

५. जेवणात मिठाचा वापर कमी प्रमाणात करावा.

६. एकाच जागेवर जास्त बसून राहणे किंवा जास्त वेळ उभे राहणे टाळणे. यामुळे पायांवर ताण येऊन व्हेरिकोज व्हेन्स चा त्रास होऊ शकतो.

७. वजनावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे.

८. त्वचा मोईस्चराईज्ड ठेवावी ती कोरडी होऊ नये याची काळजी घ्यावी.

९. दिवसातून ४-५ वेळा पाय वरील दिशेला उंचावून ठेवावेत.

१०. कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज- यामुळे पायावरील सूज कमी होते, म्हणजे होतं असं की दाब येऊन नसा दाबल्या जातात व रक्त साठत नाही, आणि साठलेलं रक्त हृदयाच्या दिशेने जाण्यासही मदत होते.

११. एबलेशन थेरपी, रेडिओ फ्रिक्वेन्सी एबलेशन लेझर एबलेशन या सर्वांचा वापर करूनही व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास कमी होऊ शकतो.  एंडोव्हीनस ही प्रक्रिया शिरांच्या आतमध्ये केली जाते. 

वरील लेखात दिलेले कुठलेही लक्षण आपल्यामध्ये आढळल्यास जवळच्या डॉक्टरांची भेट घेऊन योग्य ती काळजी घ्यावी.

(डॉक्टर व्हेरिकोज व्हेन्स स्पेशालिस्ट आहेत.) 

Dr. Jathin's - Best Varicose Veins & Vascular Surgeon In Mumbai, India

 

 

Web Title: Varicose Veins Problem In Women : Why do women suffer from varicose veins? What do the black-blue symptoms on the legs mean?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.