Join us   

दूध-दही नको पण कॅल्शियम हवंय? रस्त्यावर १० रूपयांना मिळणारे ८ पदार्थ खा, पोकळ हाडांना मिळेल ताकद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 11:43 AM

Top 5 Veg Foods For Calcium : आपलं संपूर्ण शरीर हे हाडांच्या आधारावरच चांगले कार्य करते. जर हाडं पोकळ झालीत किंवा दुखू लागली तर आपण कोणतंही काम व्यवस्थित करू शकणार नाही.

शरीर निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी प्रोटीन, आयर्न तसंच कॅल्शियमचीही आवश्यकता असते. (Calcium sathi kay khave) कॅल्शियम कमी पडल्यास कमी वयातच हाड कमकुवत होतात (How to get Strong Bones) आणि शरीर आतून पोकळ होते. कॅल्शियम पुरेपूर असेल तर हाडांचे विकार उद्भवत नाहीत आणि मसल्सच्या वाढीस मदत होते. (Vegetarian Calcium Food Sources) आपलं संपूर्ण शरीर हे हाडांच्या आधारावरच चांगले कार्य करते. जर हाडं पोकळ झालीत किंवा दुखू लागली तर आपण कोणतंही काम व्यवस्थित करू शकणार नाही. (Top 5 Veg Foods For Calcium)

कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी काय खायचं (What Should You eat For Calcium)

डेअरी उत्पादनं कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहेत. पण ज्यांना लॅक्टोजची एलर्जी आहे, डेअरी उत्पादनं जराही आवडत नाहीत.  ते इतर पदार्थ खाऊन कॅल्शियम वाढवू शकतात. भारतातील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांच्या म्हणण्यानुसार फक्त डेअरी उत्पादनं हाडांना मजबूत करण्याचा उत्तम मार्ग नाही तुम्ही आहारात  वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करू शकता.

शेंगदाणे

शेंगदाणे १० ते १५ रूपयांत आरामात मिळतील. शेंगदाणे कॅल्शियमचा उत्तम पर्याय आहे. युनायडेट  स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चरच्या रिपोर्टनुसार १०० ग्राम रॉ पिनट्समध्ये  ९२ ग्रॅम कॅल्शियम असते. यात कमीत कमी कार्बोहायड्रेस असतात. 

गाजराचा ज्यूस

एक ग्लास गाजराच्या रसात जवळपास ५० ग्राम  गाजरात म्हणजेच जवळपास  ६ गाजरांमध्ये  ३०० मिलीग्रॅम कॅल्शियम असते. तर एक ग्लास दुधात फक्त २४० ग्राम कॅल्शियम असते. 

बीन्स आणि कडधान्य

राजमा, काबुली चणे, काळी डाळ, कुळीथ, कडधान्य कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहेत. १०० ग्राम डाळींमध्ये जवळपास २०० मिलीग्राम कॅल्शियम असते. तुम्ही उकळून किंवा सॅलेड्सच्या स्वरूपातही खाऊ शकता.

केस वर काळे आतून पांढरे झाले? शहनाज सांगतात किचनमधल्या ३ वस्तू लावा; काळे-शायनी होतील केस

काळे आणि पांढरे तीळ

पांढऱ्या आणि काळ्या तिळाच्या बिया कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहेत. १० ग्राम तिळाच्या बियांमध्ये जवळपास १४० ग्राम कॅल्शियम असते. तुम्ही रोज २ ते ३ तिळाच्या बिया खाऊ शकता.

पोट फार सुटलंय-मांड्या जाड दिसतात? जेवणाच्या ताटात ४ भाज्यांचा समावेश करा, झरझर घटेल वजन

हिरव्या भाज्या

हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात हिरव्या भाज्या दिसायला सुरूवात होते. शरीरात कॅल्शियम लेव्हल वाढवण्यासाठी पालक, केल, ब्रोकोली अशा भाज्यांचे सेवन करा. भेंडीसु्दधा कॅल्शियमचा खजिना आहे.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स