Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कोण म्हणतं प्रोटीनसाठी खूप खर्च लागतो? 20 रुपयांत भरपूर प्रोटीन देतील ५ पदार्थ, मजबूत होतील हाडं

कोण म्हणतं प्रोटीनसाठी खूप खर्च लागतो? 20 रुपयांत भरपूर प्रोटीन देतील ५ पदार्थ, मजबूत होतील हाडं

Veg Protein Food : प्रोटीन मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी फार महत्वाचे असते. शरीरात प्रोटीन्स नसतील तर हाडांचे विकारही उद्भवू शकतात. (Veg Protein Source)

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 02:31 PM2023-12-13T14:31:06+5:302023-12-13T20:58:58+5:30

Veg Protein Food : प्रोटीन मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी फार महत्वाचे असते. शरीरात प्रोटीन्स नसतील तर हाडांचे विकारही उद्भवू शकतात. (Veg Protein Source)

Veg Protein Food : Top Five Vegetarian Protein Sources list of Veg Protein Foods | कोण म्हणतं प्रोटीनसाठी खूप खर्च लागतो? 20 रुपयांत भरपूर प्रोटीन देतील ५ पदार्थ, मजबूत होतील हाडं

कोण म्हणतं प्रोटीनसाठी खूप खर्च लागतो? 20 रुपयांत भरपूर प्रोटीन देतील ५ पदार्थ, मजबूत होतील हाडं

प्रोटीन्स फार महत्वाचे मानले जातात कारण यात इसेंशियल एमिनो एसिड असते. यामुळे शरीराच्या प्रत्येक पेशींना पोषण मिळते. प्रोटीन्स लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्यात वाढीसाठी महत्वाचे असते. (Protein sathi kay khave) प्रोटीन्सच्या कमतरतमुळे थकवा, अशक्तपणा येणं अशी लक्षणं जाणवतात. प्रोटीन मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी फार महत्वाचे असते. शरीरात प्रोटीन्स नसतील तर हाडांचे विकारही उद्भवू शकतात. (Veg Protein Sources)

रोज एका वयस्कर व्यक्तीला ५० ते ६० ग्राम प्रोटीन्सची गरज असते. भारतात प्रोटीनऐवजी कार्बोहायड्रेट्स जास्त खाल्ले जातात. भारतात बऱ्याच लोकांच्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता भासते. प्रोटीन फक्त मांसाहारातून मिळतं असा अनेकांचा गैरसमज असतो. व्हेजिटेरियन आयटम्समधून जास्तीत जास्त प्रोटीन्स मिळतात.  काही व्हेज पदार्थ प्रोटीन्सचा खजिना आहेत. (Top Vegetarian Protein Sources)

पालक

पालक हिवाळ्यात सर्वत्र पाहायला मिळते. वेब एमडी च्या रिपोर्टनुसार यात अनेक प्रकारचे अमिनो एसिड्स असतात, हे एमिनो एसिड्स प्रोटीन तयार करतात. पालकात प्रोटीन्स व्यतिरिक्त व्हिटामीन ए, व्हिटामीन के आणि व्हिटामीन सी असते. ज्यामुळे इम्यूनिटी वाढण्यास मदत होते आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो.

सोया बीन

सोया बीन्समध्ये भरपूर प्रोटीन असते.  ८० ग्राम सोयाबीनमधून जवळपास ८.७ ग्राम पोटीन मिळते. सोयाबीनचे सेवन आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. तुम्ही इतर भाज्यांबरोबर सोयाबीनचे सेवन करू शकता. 

पोट सुटण्याच्या भितीने भात कमी खाता? या पद्धतीने हवा तितका भात खा-१ किलोही वजन वाढणार नाही

टोफू

टोफू हा सोया मिल्कपासून तयार झालेला पदार्थ आहे. टोफू खूप कमी प्रमाणात मिळतो. टोफू प्रोटीन्सचा खजिना आहे १०० ग्राम टोफूमध्ये ८.१ ग्राम प्रोटीन असते. मसल्स बनवण्यासाठी टोफू हा उत्तम पर्याय आहे. टोफूचा वापर करून तुम्ही पॅन केक्स, जपानी सॅलेड असे पदार्थ बनवू शकता.

शेंगदाणे

शेंगदाणे प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. शेंगदाण्यांचे सेवन केल्याने शरीराला उर्जा मिळते. पिनट बटरमध्ये जवळपास ८ ग्राम प्रोटीन असते. यासाठी शेंगदाण्यांना प्रोटीन्सचा खजिना म्हटलं जातं. हिवाळ्याच्या दिवसात गुळाबरोबर शेंगदाणे खाल्ल्यने तब्येतीला बरेच फायदे मिळतात. 

कोण सांगतं रात्री भात खाल्ला की पोट सुटतं? तांदूळ शिजवताना ३ गोष्टी लक्षात ठेवा-वजन वाढणार नाही

ड्राय फ्रुट्स

बदाम महागे असतात पण प्रोटीन्ससाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही मसल्सना मजबूत बनवण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रुट्स पावडर तयार करू शकता. अनेक प्रोटीन पावडर्स बदाम आणि पिस्त्याच्या मिश्रणाने  तयार केल्या जातात. यात सुर्यफुलाच्या बीया, भोपळ्याच्या बीया, टरबुजाच्या बीया घालून रोस्ट करा नंतर बारीक वाटून घ्या. या पद्धतीने तुम्ही प्रोटीन्सयुक्त पावडर बनवू शकता. 

Web Title: Veg Protein Food : Top Five Vegetarian Protein Sources list of Veg Protein Foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.