हाय कोलेस्टेरॉलसारखे (High Cholesterol) गंभीर आजार वाढू नयेत म्हणून वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. या आजाराची लक्षणं दिसताच खाण्यापिण्यात बेसिक बदल करायला हवेत. हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारखे आजार हल्ली वेगाने वाढत आहे. अशा स्थितीत पूर्णपणे औषधांवर अवलंबून न राहता काही सोपे घरगुती उपाय करून म्हणजेच खाण्यापिण्यात बदल करून कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवू शकता. (Cholesterol Control Tips)
रोजच्या आहारातील काही भाज्या, बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. जर तुमच्या कुटूंबात कोणीही व्यक्ती बॅड कोलेस्टेरॉचा पेशंट असेल तर हा उपाय प्रभावी ठरेल. कोलेस्टेरॉल वाढू नये यासाठी ही भाजी गुणकारी ठरते. (Best Vegetable Leaves to Chew That Help Lower Cholesterol in body)
शरीरात हाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मुळ्याची पानं गुणकारी ठरतात. मुळ्याची पानं कोमट पाण्यासह चावून खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. मूळ्याची भाजीही तुम्ही खाऊ शकता. कोमट पाण्यासह मुळ्याच्या पानांचे सेवन केल्याने मेटाबॉलिझ्म वाढतो आणि डायजेशन सुधारते आणि बॅड कोलेस्टेरॉल आतड्यांमध्ये जमा होत नाही.
किचन सिंकमध्ये कचरा अडकून पाणी तुंबतं? ५ टिप्स, सिंक साफ-स्वच्छ राहील, पाणी तुंबणार नाही
दुपारच्यावेळी ही पानं खा
कोमट पाण्याबरोबर मुळ्याचे पाण्याचे सेवन तुम्ही रिकाम्या पोटीसुद्धा करू शकता. पण अनेकदा रिकाम्या पोटी सेवन केल्याने छातीत जळजळ होणं, एसिडीटी अशा समस्या उद्भवू शकतात. म्हणून दुपारच्या जेवणाच्या १ तास आधी किंवा १ तास नंतर कोमट पाण्यासह मुळ्याची पानं चावून खा. मुळ्याच्या ताज्या पानांचे सेवन उत्तम ठरेल.
आठवड्यातून एकदा तुम्ही मुळ्याची भाजीसुद्धा खाऊ शकता. मूळ्याच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न आणि फॉस्फरस असते. जे शरीराला इम्यूनिटी वाढवण्यात मदत करते. यामुळे एनिमिया आणि हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते. मुळाच्या पानांमध्ये रक्त डिटॉक्स करणारे गुण असतात.
चेहऱ्यावर अजिबात तेज नाहीये? शहनाज हुसैनने सांगितला खास उपाय करा-सुंदर दिसेल चेहरा
ज्यामुळे त्वचेवर दाणे येणं, खाज, पुळ्या, पिंपल्स रोखण्यास मदत होते. सगळ्यात आधी मुळ्याची पानं २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नंतर ही पानं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या ही पानं मिक्सरमध्ये वाटून यात काळं मीठ, एक चिमूट काळी मिरी पावडर आणि लिंबाचा रस मिसळून प्या.