उत्तम आरोग्यासाठी पौष्टीक पदार्थ खाणं गरजेचं आहे (Protein). व्हिटॅमिन आणि मिनरल्स ज्याप्रमाणे उपयुक्त आहेत (Health tips). त्याच प्रमाणे प्रोटीन्स देखील गरजेचं आहे. प्रोटीनचा उपयोग शरीरामध्ये अमीनो अॅसिड तयार करण्यासाठी होतो. शरीराची आणि स्नायूंची योग्य वाढ, लाल रक्तपेशींचे उत्पादन आणि मेटाबॉल्जिम सामान्य ठेवण्यासाठी प्रोटीन आवश्यक आहे (Vegetables). शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील प्रोटीनची मदत होते.
इंस्टीट्यूट ऑफ मेडिसिनमध्ये फूड आणि न्यूट्रीशन बोर्डनुसार, जर तुम्ही पुरूष आहात, तर तुम्हाला एका दिवसात ५६ ग्रॅम प्रोटीन घेणं गरजेचं असतं. तेच महिलांना एका दिवसात ४६ ग्रॅम प्रोटीन घेणं गरजेचं असतं. शरीरातील प्रोटीनची कमतरता भाज्या देखील पूर्ण करू शकतात. यासाठी आहारात कोणत्या भाज्यांचा समावेश करावा? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. या ६ प्रकारच्या भाज्या नियमित खा. यातून शरीराला प्रोटीन भरभरून मिळेल(Vegetables High in Protein: 5 Veggies and How to Eat More).
पालक
हिरव्यागार पालकामध्ये अनेक पौष्टीक घटक आढळते. त्यात आयर्नसह प्रोटीनचेही प्रमाण जास्त असते. १०० ग्रॅम पालकामध्ये ३ ग्रॅम प्रोटीन आढळते. यासह पालकामध्ये व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम देखील असते, जे स्नायूंच्या बळकटीसाठी मदत करते.
पोट साफच होत नाही, जोर लावावा लागतो? कॉफीत २ गोष्टी मिसळून प्या, सकाळी पोट होईल साफ
ब्रोकोली
ब्रोकोली हा केवळ व्हिटॅमिन सीचा खजिनाच नाही तर त्यात प्रोटीन देखील मुबलक प्रमाणात असते. ब्रोकोलीमध्ये असलेले फायबर स्नायू तयार करण्यासाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करण्याचे काम करते. त्यामुळे ब्रोकोलीचा आहारात समावेश करा.
मशरूम
मशरूममध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. १०० ग्रॅम प्रोटीनमध्ये ४ ग्रॅम प्रोटीन असते. यासह त्यात व्हिटॅमिन बी १२ देखील असते. ज्यामुळे दिवसभर आपल्याला एनर्जेटिक वाटते.
कडधान्य
कडधान्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. काळ्या चण्यांच्या तुलनेत काबुली चण्यांमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन्स असतात. १०० ग्राम पांढऱ्या चण्यांमध्ये १९ ग्राम प्रोटीन असतात. शिवाय यात फायबरही असते. ज्यामुळे पचनक्रियेत अडथळे येत नाही.
इवल्याश्या बियांतून मिळते भरपूर पोषण; कॅल्शियमचा आहे खजिना, वाढेल ताकद - दिसाल फिट
दोडका
दोडक्याची भाजी म्हटली की, अनेक जण नाकं मुरडतात. पण दोडक्यामध्ये अनेक गुणकारी गुणधर्म असतात. दोडक्यामध्ये बिटा कॅरेटीन, व्हिटॅमिन ए, आयर्न, प्रोटीन आणि कार्ब्स आढळते. विशेष म्हणजे यात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे आरोग्याला फायदाच होतो.