Join us   

Vegetarian Source of Vitamin B 12 : शरीरात B12 कमी, सतत इंजेक्शन घ्यावी लागतात? खा ४ व्हेज पदार्थ, B 12 भरपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 3:43 PM

Vegetarian Source of Vitamin B 12 : शाकाहारातूनही मिळते व्हिटॅमीन बी १२, पाहूया हा घटक मिळणारे पदार्थ कोणते...

ठळक मुद्दे दह्यामध्ये व्हिटॅमिन बी १२ चे प्रमाण जास्त असल्याने दह्याचा आहारात समावेश करायला हवा. शाकाहारी पदार्थांमध्येही व्हिटॅमिन बी जास्त प्रमाणात असते, असे पदार्थ आपल्याला माहित असायला हवेत.

व्हिटॅमिन बी १२ हा आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. साधारणपणे बी १२ हे मांस किंवा मांसाहारी पदार्थांतून मिळत असल्याने मांसाहार करणाऱ्या लोकांच्या शरीरात याचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे मासे, अंडी हे पदार्थही जे खात नाहीत त्यांना बी १२ ची कमतरता जाणवते. पण जे पूर्णपणे शाकाहारी आहेत त्यांना अनेकदा बी १२ ची कमतरता भासते. प्राणीजन्य पदार्थांमधून बी १२ मिळत असल्याने दूध आणि दुधाचे पदार्थ इतकाच पर्याय शाकाहार करणाऱ्यांसमोर राहतो (Vegetarian Source of Vitamin B 12). मात्र शाकाहारामध्येही असे काही पदार्थ आहेत ज्यातून आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात बी १२ मिळू शकते. पाहूयात असे पदार्थ कोणते आणि त्यांचा आहारात नियमीत समावेश करण्याचा प्रयत्न करुया.

(Image : Google)

बीट 

बीटामध्ये लोह आणि इतर सगळेच व्हिटॅमिन्स जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे आहारात बीटाचा आवर्जून समावेश करायला हवा. बीट खाल्ल्याने रक्त आणि पर्यायाने हिमोग्लोबिन वाढण्यासही मदत होते. व्हिटॅमिन बी वाढण्यासाठी आहारात बीटाचा आवर्जून समावेश करायला हवा. उकडलेले बीट, बीटाचे कटलेट, कोशिंबीर, थालिपीठ, हलवा असे अनेक पदार्थ करता येतात.

(Image : Google)

पालक 

पालक आरोग्यासाठी फायदेशीर असतो हे आपल्याला माहित आहे. पण तरीही काही ना काही कारणाने आपण ही पालेभाजी खाणे टाळतो. पालकातूनही आपल्याला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी मिळते. याशिवाय पालकात इतरही खनिजे, व्हिटॅमिन्स असतात त्यामुळे आहारात पालकाचा आवर्जून समावेश करायला हवा. भाजीशिवाय आपण पालकाचे पालक सूप, पालक भजी, पालक राईस, पालक पुरी असे बरेच प्रकार करु शकतो. 

छोले

छोला बटुरा ही आपल्या सगळ्यांच्याच आवडीची डीश. छोल्याची मसालेदार भाजी आणि गरमागरम पुऱ्या हा मेनू तर लाजवाब. छोल्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी असल्याने छोल्यांचा आहारात समावेश करायला हवा. आपण इतर भाज्या, डाळी, कडधान्ये खातो त्याचप्रमाणे छोल्याची उसळही आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून आवर्जून करायला हवी. त्यामुळे शरीराला अतिशय आवश्यक असे घटक मिळण्यास मदत होते. 

(Image : Google)

दही 

उन्हाळ्याच्या दिवसांत दही किंवा ताक म्हणजे आपल्यासाठी पर्वणीच. गारेगार गोड दही किंवा ताक प्यायल्यावर उन्हामुळे होणारी शरीराची लाहीलाही कमी होण्यास मदत होते. दह्याचा वापर आपण कोशिंबीर, भात यामध्ये घालण्यासाठी किंवा नुसते खाण्यासाठीही करु शकतो. नाश्त्याला थालिपीठ, धिरडे किंवा इतरही काही पदार्थांबरोबर आपण आवर्जून दही खाऊ शकतो. दह्यामध्ये व्हिटॅमिन बी १२ चे प्रमाण जास्त असल्याने दह्याचा आहारात समावेश करायला हवा.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना