Join us   

Top Fruits of Protein Source : शाकाहारींनी प्रोटीनसाठी खायलाच हवीत ५ फळे; प्रोटीन आहारात वाढविण्यासाठी सोपा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2022 11:32 AM

Top Fruits of Protein Source : काही फळांमध्ये प्रथिनांची मात्रा जास्त असल्याने या फळांचा आपण आहारात आवर्जून समावेश करायला हवा.

ठळक मुद्दे फळं आरोग्यासाठी सर्वार्थाने चांगली असतात, त्यामुळे शरीराला अनेक उपयुक्त घटक मिळण्यास मदत होते. शाकाहार घेऊनही आहारात प्रथिनांचे प्रमाण ठेऊ शकता चांगले

प्रथिने हा आपल्या आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक असतो. व्यक्तीला जन्मापासून शरीराची बांधणी उत्तम राहावी यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. हाडांच्या बळकटीसाठी, प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी, स्नाय़ूंच्या बांधणीसाठी आणि इतरही अनेक कार्यांसाठी शरीलाला पुरेशा प्रमाणात प्रथिनांची आवश्यकता असते. मात्र ही प्रथिने योग्य प्रमाणात न मिळाल्यास आपल्याला आरोग्याच्या विविध तक्रारींना सामोरे जावे लागते. चिकन, मटण, अंडी, मासे यांसारख्या प्राणीजन्य पदार्थांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे शाकाहारी लोकांना प्रथिनांसाठी दूग्धजन्य पदार्थ आणि डाळी असे ठराविकच पर्याय उपलब्ध असतात. पण काही फळांमध्ये प्रथिनांची मात्रा जास्त असल्याने या फळांचा आपण आहारात आवर्जून समावेश करायला हवा (Top Fruits of Protein Source). प्रथिनांसाठी हा सोपा पर्याय असून त्यामुळे तब्येत ठणठणीत राहण्यास निश्चितच मदत होईल. फळे आरोग्यासाठी सर्वच दृष्टीने उपयुक्त असून प्रथिने मिळण्यासाठी कोणती फळे खायला हवीत, पाहूया...

(Image : Google)

१. पेरु

पेरु या फळाला आपल्याकडे अमृत म्हटले जाते. चविला गोड असणारा हा पेरु अनेक आजारांवरील उत्तम उपाय आहे. त्यामुळे डॉक्टरही अनेकदा पेरु खाण्याचा सल्ला देतात. मध्यम आकाराच्य एका पेरुमध्ये ६ ते ७ ग्रॅम प्रोटीन्स असतात. बाजारात सहज उपलब्ध होणारे हे फळ प्रत्येकाने आवर्जून खायला हवे.

२. संत्री 

सी व्हिटॅमिनची जास्त मात्रा असलेले हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्याचप्रमाणे आंबट गोड असणाऱ्या संत्र्यामध्ये प्रथिनांचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे संत्री खाण्याबरोबरच आपण त्याचा ज्यूसही पिऊ शकतो. 

३. अननस 

अननस चिरणे काहीसे अवघड असल्याने हे फारसे न खाल्ले जाणारे फळ आहे. परंतु आबंट गोड असणाऱ्या अननसातही प्रथिने चांगल्या प्रमाणात असल्याने अननसाचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. हल्ली कापलेल्या फोडीही बाजारात मिळतात तसेच अननसाचा ज्यूसही चांगला लागत असल्याने या फळाचा तुम्ही आवर्जून विचार करायला हवा.

(Image : Google)

४. केळी 

आपल्याकडे कोणत्याही ऋतूमध्ये सर्रास खाल्ले जाणारे फळ म्हणजे केळं. स्वस्तात मस्त आणि सहज उपलब्ध होणारी केळी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. केळ्यामध्ये प्रथिने तर असतातच पण त्याबरोबरच फायबर, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, अ जीवनसत्त्व आणि बी ६ असे इतरही पोषक घटक असतात.  

५. सफरचंद 

दिवसाला एक सफरचंद खाल्ल्यास आपल्याला कधीच डॉक्टरकडे जाण्याची वेळ येत नाही असे म्हणतात. सफरचंदात आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक घटक असल्याने आजारी व्यक्तींनाही ताकद भरुन येण्यासाठी सफरचंद दिले जाते. यामध्येही प्रथिनांचे प्रमाण चांगले असल्याने नियमितपणे सफरचंद खाणे फायद्याचे ठरते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफळेअन्न