पावसाने जोर धरला आणि एकदम घराघरातलं चित्रच बदलून गेलं. एरवी उत्साहाने खेळणारी, सगळीकडे बागडणारी लहान मुलं आजारी (illness in children) पडू लागली. आता सध्या तर सर्दी, खोकला आणि ताप (cough, cold and fever) असणारे रुग्ण घराघरांत दिसून येत आहेत. यात लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे सध्या शाळांमध्येही मुलांची उपस्थिती एकदमच खालावली आहे. एकदा ताप आला की तो काही ३- ४ दिवस पिच्छा सोडत नाही. त्यानंतर मग मुलांमध्ये विलक्षण अशक्तपणा (weakness) दिसून येतोय. त्यामुळेच एकतर आजाराचा संसर्ग (viral infection) होऊ नये आणि झालाच तरी तो लवकर आटोक्यात यावा, यासाठी पालकांनी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
डॉक्टर सांगतात, बदलत्या वातावरणामुळे तापमान कमी- अधिक होत आहे. मागचे काही दिवस तर सतत पाऊस होता. त्यामुळे हवामान अतिशय ढगाळ आणि रोगट झालेले होते. दुपारच्या वेळी कधी गरमी तर कधी पाऊस आणि रात्री पुन्हा थंडी असं विचित्र वातावरण सध्या झालेलं आहे. त्यामुळे आजार बळावत असून रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले सगळेच जण त्याला बळी पडत आहेत. त्यामुळे कोणत्याही दवाखान्यात सध्या सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी या आजारांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यात लहान बालकांचे प्रमाणही लक्षणीय आहे. संसर्ग लवकर आटोक्यात यावा, यासाठी कोणताही त्रास अंगावर काढू नका. लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा.
अशी घ्या मुलांची काळजी 1. स्वच्छतेच्या आणि राहणीमानाच्या सवयी बदलल्यास संसर्गजन्य आजार नक्कीच टाळता येऊ शकतो. 2. त्यामुळे या दिवसांमध्ये उघड्यावरचे पदार्थ खाणे, बाहेरचे पाणी पिणे पुर्णपणे टाळले पाहिजे. घरचे सकस अन्न घेण्यास प्राधान्य द्या. 3. बाहेरून आल्यानंतर लहान मुलांना आधी हात- पाय- चेहरा स्वच्छ धुवायला लावा आणि त्यानंतरच काहीतरी खायला- प्यायला द्या. 4. आईस्क्रीम किंवा अतिथंड पदार्थ, ज्यूस पिणे टाळा.
सतत स्क्रिनसमोर बसता, डोळ्यांवर ताण आला? ११ उपाय, शिणलेल्या डोळ्यांचा त्रास कमी 5. आजारी व्यक्तींच्या संपर्कात लहान मुलांना येऊ- देऊ नका. 6. मुलांचा शाळेत नेण्याचा रुमाल, नॅपकीन रोजच्या रोज धुवून टाका. 7. ताप आलेला असेल तरी मुलांना थोड्या थोड्या वेळाने पाणी देत रहा. जेवण जात नसेल तर सूप किंवा अगदी पातळ आहार द्या. 8. व्हिटॅमिन सी असणारी फळं खायला दिल्यानेही रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल.
मास्कचा वापरही गरजेचा
औरंगाबादचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे सांगतात.. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा त्रासांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या वाढलेली आहे. त्यामुळे प्रत्येकानेच अगदी लहान मुलांनीही काेरोनाकाळात करायचो त्याप्रमाणे सॅनिटायझरचा, मास्कचा वापर करावा. एकमेकांपासून योग्य अंतर पाळावे. घसादुखी, सर्दी असा त्रास सुरु होतो आहे, हे लक्षात येताच कोमट पाणी प्यावे तसेच दिवसांतून एक- दोनदा पाण्याची वाफ घ्यावी.