व्यक्तीच्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या पोषक तत्वांपैकी एक आहे व्हिटामीन बी-१२ शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास चक्कर येणं, कमकुवतपणा, त्वचा पिवळी पडणं. डोक्यात वेदना, डिप्रेशन आणि पचनाच्या संबंधित समस्या उद्भवतात. (Health Tips) काही पोषक पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केल्यास व्हिटामीन बी-१२ भरपूर मिळेल. व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. (Vitamin B-12 Deficiency 4 Foods Overcome The Deficiency Of Vitamin B-12)
व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. थकवा येणं, विकनेस जाणवणं ही लक्षणं जाणवतात. ज्यामुळे रेड ब्लड सेल्सवर परिणाम होतो. (Vitamin B-12 4 Foods) मशरूमच्या सेवनाने व्हिटामीन डी आणि व्हिटामीन बी-१२सुद्धा मिळते. ५० ग्रॅम सुकवलेल्या मशरूम्समध्ये व्हिटामीन्स भरपूर असतात. मशरूमध्ये बी-१२ असते. ज्यामुळे व्हिटामीन्सचे प्रमाण बुस्ट होण्यास मदत होते.
पालक
नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन्सच्या रिपोर्टनुसार व्हिटामीन बी-१२ शरीराला हवे असल्यास पालकाचा आहारात समावेश करा. तुम्ही पालकाची भाजी किंवा सूपमध्ये खाऊ शकता. (Ref)किंवा सॅलेड सॅण्डविचमध्येही मिसळून खाऊ शकता. पालकात व्हिटामीन बी-१२ व्यतिरिक्त आयर्नसुद्धा असते. जे शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असते.
दुग्धजन्य पदार्थ
तुम्हाला व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करायची असेल तर आपल्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. रोज १ ग्लास दूध आणि दुधापासून बनलेल्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा. दही, चीझ, पनीर, व्हिटामीन बी१२ प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटामीन ए आणि डी बरोबरच पोटॅशियम सारख्या खनिजांचा चांगला स्त्रोत आहेत.
शेंगा
शेंगांमध्ये फॉलेटचे प्रमाण जास्त असते. यात नियासिन, थायमिन, रायबोफ्लेविन, पँटोथेनिक एसिड आणि बी-६ असते. या खाद्यपदार्थांमध्ये काळ्या बीया, हिरवे मटार, राजमा, भाजलेले सोया नट्स, डाळी यांचा समावेश आहे.
दही
दही अनेकांच्या फेव्हरेट फूडपैकी एक आहे. व्हिटामीन बी१२ आणि रायबोफ्लेविन असते. रायत्यामध्ये दह्याचा वापर केला जातो. शेंगा किंवा डाळीसुद्धा खाऊ शकता. एक कप दह्याचे प्रमाण पुरेसे आहे. आहारात अशा पदार्थांचे सेवन करा जे सामान्य आणि नियमित असतील.