जर तुम्ही व्हिटामीन बी (Vitamin B-12 Deficiency) ने परीपूर्ण पदार्थांचे सेवन करत नसाल तर तुम्हाला गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शरीरात व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे हार्ट अटॅक, नर्व्हस सिस्टीम खराब होणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. व्हिटामीन बी-१२ (Vitamin b-12) च्या कमतरतेला हलक्यात घेतल्यास व्यक्ती गंभीर आजारीसुद्धा पडू शकतो. (Vitamin B-12 Deficiency Tips)
व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेच्या लक्षणांना वेळीच ओळखून त्यावर उपाय करणं फार गरजेचं आहे. व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर लक्षणं दिसू शकतात. ५ संकेतांवरून ओळखा की तुमच्या शरीरात व्हिटामीन्सची कमतरता आहे का. (Vitamin B-12 Deficiency Will Turn Body Into Skeleton)
जॉन हॉप्किन्स मेडिसिनच्या रिपोर्टनुसार जर कौटुबिंक इतिहास, ऑटोइम्यून आजार, टाईप १ डायबिटीस, क्रोनिक डिसिज, एचआयव्ही, काही मेडिसिन्स, फक्त शाहाकारी आहार घेणं, वय वाढणं यामुळे व्हिटामीन बी-१२ ची कमतरता वाढते (Ref). व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमनं मांसपेशी कमकुवत होणं, हाता-पायांना मुंग्या येणं, हात पाय सुन्न होणं, उलट्या होणं, भूक वाढणं, वजन कमी होणं, डायरिया, हार्ट रेट फास्ट होणं अशा समस्या उद्भवू शकतात. संत्र्याचा रस, पालकाचा रस, भात, बारली, कडधान्य, सोया बिन्स, ब्रोक्रोली, शेंगदाणे, वाटाणे, कडधान्य, चिकपिस, दूध या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेची लक्षणं (व्हिटामीन बी-१२ कमतरतेची लक्षणं)
१) झोपेची कमतरता असल्यास थकवा येणं, शारीरिक मांसपेशींमध्ये वेदना उद्भवतात. जर तुमच्या मसल्समध्ये रोज कमतकुवतपणा जाणवत असेल तर व्हिटामीन बी-१२ ची कमतरता असू शकते.
२) रात्रीच्यावेळी तुम्हाला पचनासंबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता असू शकते. उलट्या होणं, गॅस होणं, गॅस्ट्रोइंटेस्टायलन लक्षणं व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेनं उद्भवतात.
चेहऱ्यावर बारीक रेषा-सुरकुत्या आल्यात? 2 रूपयांच्या तुरटीची कमाल, सुरकुत्या गायब-तेज येईल
३) डोकेदुखीची समस्या ही खूपच सामान्य आहे. रात्रीच्यावेळी डोकेदुखीच्या वेदना तीव्रतेनं उद्भवतात. हे व्हिटामीन बी १२ च्या कमतरेची लक्षणं असू शकतात.
४) झोप न येण्याच्या समस्येमुळे अनेक लोक त्रस्त असतात. अशा स्थितीत शरीरात व्हिटामीन बी१२ ची कमतरता उद्भवू शकते. अनेक आठवडे तुम्ही झोपू शकत नसाल तर डॉक्टरांकडून चेकअप करून घ्या.
सोन्यांच्या कानातल्यांचे १० खास डिजाईन्स; पाहा फक्त १ ग्रॅम सोन्याचे नाजूक- आकर्षक कानातले
५) पडल्या पडल्या तुमच्या पायाच्या नसा ताणल्या जात असतील तर या कडे दुर्लक्ष करणं गंभीर समस्येचं कारण ठरू शकते. कारण हे व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेचे सायलेंट संकेत आहे.