शरीराला प्रोटीनप्रमाणेच व्हिटामीनही आवश्यक असते. या व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.या व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे थकवा येणं, कमकुवतपणा, सूज येणं, स्मरणशक्ती कमी होणं, रक्ताची कमतरता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात (Health Tips). भारतीयांच्या आहारात डाळींचे खास महत्व आहे. डाळींना प्रोटीनचे भांडार मानले जाते. ठराविक डाळीचे पाणी प्यायल्यानं २१ दिवसांत व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करता येते. या डाळीबाबत अधिक समजून घेऊया. (Vitamin B-12 Foods Healthy Vegetarian Daal Moong Beans Benefits)
शरीरातलं व्हिटामीन बी-१२ कमी झाल्यास कोणती लक्षणं दिसतात?
१) थकवा, कमकुवतपणा येणं,
२) त्वचा पिवळी पडणं,
३) जीभेत वेदना जाणवणं,
४) हातापायांमध्ये झिणझिण्या येणं,
५) श्वास घ्यायला त्रास होणं,
व्हिटामीन बी-१२ वाढवण्यासाठी कोणती डाळ खावी?
ही डाळ आपल्या स्वंयपाकघरातील मूगाची डाळ आहे. जी खाल्ल्यानं व्हिटामीन बी-१२ शरीराला मिळते. न्युट्रिशनिस्ट नमानी अग्रवाल यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी हिरव्या मुगाच्या डाळीचं पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. या डाळीत व्हिटामीन बी-१२ मोठ्या प्रमाणात असते. याचे रोज सेवन केल्यानं व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दूर होण्यास मदत होते.
मूग डाळीचे फायदे
मूग डाळ प्रोटीनचा आणि व्हिटामीन्सचा चांगला स्त्रोत आहे. या डाळीतील एंटी ऑक्सिडेंट्स शरीरातील फ्री रॅडीकल्सना कमी करतात. ही डाळ फायबर्सचा चांगला स्त्रोत आहे ज्यामुळे वजनही नियंत्रणात राहते. मूग डाळीत मिनरल्सही असतात (Ref). हिरवी मूगाची डाळ खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य चांगले राहते, फायबर्सचा चांगला स्त्रोत आहे. या डाळीत साखरेचे प्रमाणही कमी असते. ज्यामुळे ब्लड शुगर वाढण्याचा धोका नसतो.
डोक्यावरचे केस फारच पांढरे झाले? डाय न लावता हा घरगुती हेअर कलर लावा, काळेभोर होतील केस
मुगाची डाळ कशी खावी?
आहारातज्ज्ञ सांगतात की रात्री झोपण्याच्याआधी १ कप मूग डाळ व्यवस्थित धुवून घ्या. नंतर त्यात १ कप पाणी घालून ठेवा. सकाळी मूग व्यवस्थित भिजले असतील तर रिकाम्या पोटी याचे सेवन करा. डाळ तुम्ही शिजवून तुम्ही भात किंवा चपातीबरोबर खाऊ शकता.