Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शरीराला कमकूवत बनवते व्हिटामीन्सची कमतरता; घरातलेच १० पदार्थ खा, अशक्तपणा जातो लवकर

शरीराला कमकूवत बनवते व्हिटामीन्सची कमतरता; घरातलेच १० पदार्थ खा, अशक्तपणा जातो लवकर

Foods For Vitamin B-12 : डॉक्टर सांगतात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करण्यासाठी डाळी, अन्नधान्य, हिरव्या पालेभाज्या, अंडी, दूध आणि त्यापासून बनलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 10:38 AM2024-05-30T10:38:14+5:302024-05-30T15:23:31+5:30

Foods For Vitamin B-12 : डॉक्टर सांगतात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करण्यासाठी डाळी, अन्नधान्य, हिरव्या पालेभाज्या, अंडी, दूध आणि त्यापासून बनलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

Vitamin B Complex Foods 8 Times Powerful Than Vitamin B-12 Strength And Power | शरीराला कमकूवत बनवते व्हिटामीन्सची कमतरता; घरातलेच १० पदार्थ खा, अशक्तपणा जातो लवकर

शरीराला कमकूवत बनवते व्हिटामीन्सची कमतरता; घरातलेच १० पदार्थ खा, अशक्तपणा जातो लवकर

शरीराला ताकद येण्याासठी व्हिटामीन्सची आवश्यकता असते. (Health Tips) ज्यामुळे शरीर हेल्दी आणि निरोगी राहते. याशिवाय आजारांपासून दूर राहण्यासही मदत होते. व्हिटामीन १२ ची कमतरता अनेकांमध्ये दिसून येते. व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भरून काढण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या सप्लिमेंट्स घेतात.
व्हिटामीन एक असा पदार्थ आहे  जो बी-१२ पेक्षा जास्त ताकदवान आहे. (Foods For Vitamin B-12) हे व्हिटामीन घेतल्यानंतर  बी-१२ वेगळं घेण्याची गरज लागत नाही. याचे नाव बी-कॉम्पलेक्स असते. यात व्हिटामीन्सचे  ८ टाईप्स असतात. आयुर्वेदीक डॉक्टर रोबिन शर्मा यांनी कॅप्सूलऐवजी हे डाएट घेण्याचा सल्ला दिला आहे. ( Vitamin B Complex Foods 8 Times Powerful Than Vitamin B-12 Strength And Power)

मानसिक आरोग्य चांगले राहते

डॉक्टर रोबिन शर्मा यांच्यामते व्हिटामीन बी ६, व्हिटामीन बी ९, व्हिटामीन बी-१२  आपला मूड रेग्युलेट करण्यास मदत करतात. या व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे डिप्रेशन, एंग्जायटी होण्याचा धोका वाढतो. डिप्रेशन, एंग्जाटी यांसारखे मेंटल डिसॉर्डर्स संपूर्ण शरीरासाठी नुकसानकारक ठरतात.

फर्टिलीटीच्या समस्या

व्हिटामीन बी९ ची कमतरता महिलांमध्ये इन्फर्टिलीटीसाठी कारणीभूत ठरते. जर  कोणतीही महिला बाळ होण्यासाठी प्रयत्नात असेल तर काही आठवडे आधी बी९  म्हणजेच फॉलेटचे सेवन करायला हवे. 

डोळ्यांसाठी व्हिटामीन आवश्यक

आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत डोळ्यांवर खूपच दबाव येतो. छोटी छोटी मुलं मोबाईल घेऊन बसतात. यामुळे त्यांना लहान वयातच चष्मा लागतो. हे योग्य ठेवण्यासाठी व्हिटामीन बी२, बी३ समावेश करावा जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण ठरते.

संपूर्ण शरीरात नसा पसरलेल्या असतात. नसां मजबूत राहण्यासााठी व्हिटामीन बी-१२ तसंच व्हिटामीन बी१, बी६ आवश्यक असते. ज्यामुळे संपूर्ण सिस्टीम चांगली राहते. व्हिटामीन बी १२, बी६, बी९  आपल्या डिएनए सिंथेसिस आणि रिपेअरचे कार्य करतात.  ज्यामुळे डिएनए डॅमेज होण्याचा धोका वाढतो याशिवाय कॅन्सरचा धोकाही वाढतो.

तोंडी लावण्यासाठी रोज फक्त अर्धा चमचा आळशीची चटणी खा, कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर खास उपाय

डॉक्टर सांगतात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करण्यासाठी डाळी, अन्नधान्य, हिरव्या पालेभाज्या, अंडी, दूध आणि त्यापासून बनलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. ताजी फळं, भाज्या, नारळ पाणी, खजूर यांसारख्या पदार्थांचे सेवन करा. ज्यातून शरीराला भरपूर व्हिटामीन बी कॉम्पलेक्स मिळेल.
 

Web Title: Vitamin B Complex Foods 8 Times Powerful Than Vitamin B-12 Strength And Power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.