थंडीचा महिना सुरु झाला आहे. ही गुलाबी थंडी काहींना आवडते तर, काहींना आवडत नाही. कारण या दिवसात बरेच जण आजारी पडतात. या ऋतूत रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप, फ्लू, त्वचाविकार, संसर्ग इत्यादींचा धोका वाढतो. हे आजार टाळण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणं गरजेचं आहे. यासाठी शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता होता कामा नये.
शरीरात व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. आहारात व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा समावेश केल्याने शरीरात उर्जा वाढते. ज्यामुळे इतर आजारांचा धोका कमी होतो. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असावा, याची माहिती पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल यांनी दिली आहे(Vitamin C Rich Foods for Cold).
पेरू आणि किवी
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. नियमित पेरू खाल्ल्याने शरीराला इतर पदार्थांच्या तुलनेत २०० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते. शिवाय किवीमध्ये देखील व्हिटॅमिन सी असते. एका मध्यम आकाराच्या किवीमध्ये ७१ मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे हिवाळ्यात पेरू आणि किवी जरूर खा.
रोज सकाळी ग्लासभर गुळाचे पाणी पिण्याचे ५ जबरदस्त फायदे, वजन कमी करण्यासाठी होते मदत-पचनही सुधारते
बेल पेपर
बेल मिरची ही लाल किंवा पिवळ्या रंगाची असते. बेल पेपर व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. एका मध्यम आकाराच्या लाल मिरचीमध्ये सुमारे १५२ मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. याशिवाय यात इतरही पौष्टीक घटक आढळतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
स्ट्रॉबेरी आणि अननस
स्ट्रॉबेरी फक्त चवीला उत्कृष्ट नसून, त्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. एक कप स्ट्रॉबेरीमध्ये ९७ मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. अननसात देखील व्हिटॅमिन सी आढळते. एक कप अननसाच्या तुकड्यात सुमारे ७९ मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळते. या दोन फळांचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
संत्री आणि खरबूज
संत्री, लिंबू, द्राक्षे हे फळं व्हिटॅमिन सीचे उत्तम स्त्रोत मानले जाते. मध्यम आकाराच्या संत्र्यामध्ये सुमारे ७० मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. तर, खरबूज या फळामध्ये देखील व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते. एक कप क्युब्समध्ये सुमारे ५८ मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते.
पपई आणि आंबा
बरेच जण पपई खाणं टाळतात. पण पपईमध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त इतरही पौष्टीक घटक आढळतात. त्यात ८८ मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. तर, आंब्यात देखील व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. एक कप आंब्याच्या फोडींमध्ये ६० मिलीग्राम व्हिटॅमिन-सी असते.
स्वयंपाकासाठी-फराळासाठी कोणते खाद्यतेल वापरता? ‘हे’ ५ वापरत असाल तर बॅड कोलेस्टेरॉल नक्की वाढेल..
ब्रोकोली
बरेच जण ब्रोकोली खाताना नाक मुरडतात. पण ब्रोकोलीमध्ये ५१ मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळते. ज्याचा सकारात्मक फायदा आरोग्याला होतो. यामुळे रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. शिवाय इतर आजारांचा धोका कमी होतो.