Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > फक्त १ ग्लास आवळ्याचा रस 'या' पद्धतीनं प्या; पोकळ हाडं होतील बळकट-हरवलेलं तारुण्य येईल परत

फक्त १ ग्लास आवळ्याचा रस 'या' पद्धतीनं प्या; पोकळ हाडं होतील बळकट-हरवलेलं तारुण्य येईल परत

Amla Juice Is Best To Drink Everyday : आवळ्याचा ज्यूस  सकाळी रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळी तुम्ही पिऊ शकता फक्त रात्री पिणं टाळायला हवं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 10:25 PM2024-10-09T22:25:08+5:302024-10-09T22:27:37+5:30

Amla Juice Is Best To Drink Everyday : आवळ्याचा ज्यूस  सकाळी रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळी तुम्ही पिऊ शकता फक्त रात्री पिणं टाळायला हवं

Vitamin C Vitamin A Calcium Rich Amla Juice Is Best To Drink Everyday | फक्त १ ग्लास आवळ्याचा रस 'या' पद्धतीनं प्या; पोकळ हाडं होतील बळकट-हरवलेलं तारुण्य येईल परत

फक्त १ ग्लास आवळ्याचा रस 'या' पद्धतीनं प्या; पोकळ हाडं होतील बळकट-हरवलेलं तारुण्य येईल परत

फळांचा ताज रस पिण्यासाठी फायदेशीर ठरतो. यात व्हिटामीन्स, मिनरल्स आणि हायड्रेशन एकत्र मिळते. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. रोज पिण्यासाठी आवळ्याचा ज्यूस हा उत्तम पर्याय आहे. आवळ्याचा ज्यूस तुम्ही रोज पिऊ शकता. आवळ्याचा ज्यूस  सकाळी रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळी तुम्ही पिऊ शकता फक्त रात्री पिणं टाळायला हवं. कारण हा ज्यूस थंड असतो. रात्रीच्यावेळेस प्यायल्यास घसा खराब होऊ शकतो.  आवळ्याचा रस पिण्याची खास रेसिपी पाहूया. ( Vitamin C Vitamin A Calcium Rich Amla Juice Is Best To Drink Everyday)

२ ते ३ आवळे कापून धुवून घ्या नंतर आवळ्याच्या बीया वेगळ्या करा. अर्धा ते एक ग्लास पाण्यासोबत व्यवस्थित ब्लेंड करा. जेव्हा व्यवस्थित मिक्स होईल तेव्हा गाळून वेगळं करा. जेव्हा व्यवस्थित मिसळं जाईल तेव्हा गर वेगळा करा. तुम्ही गरासकट आवळ्याचा रस पिऊ शकता यात काळी मिरी पावडर मिसळा आणि थोडं मध घालून सेवन करा. 

आवळ्यात व्हिटामीन सी भरपूर असते. पण लोकांना हे माहित नसते की आवळ्याच्या सेवनानं शरीराला कॅल्शियमसुद्धा मिळते, सायंस डायरेक्टच्या रिपोर्टनुसार आवळ्याचा रस ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका टाळण्यास मदत करतो. या आजारात सांध्याची ताकद कमी होते आणि तुटण्याच्या धोका वाढतो. 

वय वाढल्यानंतर त्वचेतील कोलोजन कमी होत जाते.  ज्यामुळे सुरकुत्या, डाग, ड्रायनेस, डार्क सर्कल्स आणि त्वचा निर्जीव होण्याची समस्या होत असते. आवळ्यात व्हिटामीन सी असते ज्यामुळे कोलेजनचे उत्पादन वाढते. यामुळे त्वचा चमकू लागते.आणि वयाचा अंदाज येत नाही. 

आवळ्याचा ज्यूस प्यायल्यानं गंभीर आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. याच्या सेवनानं कोलेस्ट्रेरॉल कंट्रोल राहते.  ज्यामुळे हृदय निरोगी राहते आणि हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. आवळ्यात व्हिटामीन सी असते जे एंटी ऑक्सिडेंटसप्रमाणे काम करते. यामुळे फ्री रॅडिकल्सपासून बचाव होतो. एंटी इंफ्लामेटरी आणि एंटी मायक्रोबिअल प्रॉपर्टीज वाढतात. ज्यामुळे इम्यून सिस्टिम चांगली राहते आणि आजारांपासून बचाव होतो. 

Web Title: Vitamin C Vitamin A Calcium Rich Amla Juice Is Best To Drink Everyday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.