Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आराम केल्यानंतरही वाटतो थकवा; ड जीवनसत्वाची कमतरता तर नाही? ५ समस्या, वेळीच लक्षणं ओळखा

आराम केल्यानंतरही वाटतो थकवा; ड जीवनसत्वाची कमतरता तर नाही? ५ समस्या, वेळीच लक्षणं ओळखा

जगभरात 1 बिलियन म्हणजे 100 कोटी लोकांमध्ये ड जीवनसत्वाची (Vitamin D deficinecy) कमतरता आहे. या कमतरतेमुळे 5 प्रकारच्या समस्या ( Vitamin d deficiency cause to health problems) जाणवतात. या समस्या म्हणजेच ड जीवनसत्वाच्या कमतरतेची लक्षणं होयं. ही लक्षणं वेळीच ओळखून उपाय करणं सुदृढ आरोग्यासाठी (Vitamin D for healthy living) आवश्यक बाब आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2022 05:43 PM2022-09-06T17:43:06+5:302022-09-06T17:55:00+5:30

जगभरात 1 बिलियन म्हणजे 100 कोटी लोकांमध्ये ड जीवनसत्वाची (Vitamin D deficinecy) कमतरता आहे. या कमतरतेमुळे 5 प्रकारच्या समस्या ( Vitamin d deficiency cause to health problems) जाणवतात. या समस्या म्हणजेच ड जीवनसत्वाच्या कमतरतेची लक्षणं होयं. ही लक्षणं वेळीच ओळखून उपाय करणं सुदृढ आरोग्यासाठी (Vitamin D for healthy living) आवश्यक बाब आहे.

Vitamin D deficiency how affects on health | आराम केल्यानंतरही वाटतो थकवा; ड जीवनसत्वाची कमतरता तर नाही? ५ समस्या, वेळीच लक्षणं ओळखा

आराम केल्यानंतरही वाटतो थकवा; ड जीवनसत्वाची कमतरता तर नाही? ५ समस्या, वेळीच लक्षणं ओळखा

Highlightsड जीवनसत्वामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. शरीरात ड जीवनसत्वाचा अभाव असल्यास रोगप्रतिकारशक्ती कमी होते. ड जीवनसत्वाच्या अभावाचा परिणाम त्वचेवरही जाणवतो. 

सुदृढ आरोग्यासाठी शरीराला सर्व प्रकारच्या पोषक घटकांची आवश्यकता असते. हाडं, दात आणि स्नायू निरोगी आणि मजबूत राहाण्यासाठी ड जीवनसत्वाची ( Vitamin D for health_  आवश्यकता असते. सूर्यप्रकाश हे ड जीवनसत्वाचं प्रमुख स्त्रोत आहे. ड जीवनस्त्व शरीराला पुरेसं मिळावं यासाठी तज्ज्ञ रोज 15 ते 20 मिनिटं कोवळ्या उन्हात बसण्याचा सल्ला देतात. पण तज्ज्ञांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्याचा परिणाम म्हणजे शरीरात ड जीवनसत्वाची कमतरता (Vitamin D deficiency)  निर्माण होते.  याबाबतचा अभ्यास सांगतो की जगभरात 1 बिलियन म्हणजे 100 कोटी लोकांमध्ये ड जीवनसत्वाची कमतरता आहे. या कमतरतेमुळे 5  प्रकारच्या समस्या जाणवतात. या समस्या म्हणजेच ड जीवनसत्वाच्या (symptoms of Vitamin D deficiency)  कमतरतेची लक्षणं होयं.

Image: Google

ड जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास

1.पुरेशी झोप घेतल्यानंतर, आराम केल्यानंतरही थकल्यासारखं वाटतं. ड जीवनसत्वामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर ड जीवनसत्व शरीरात कमी असल्यास ही ऊर्जा मिळत नाही आणि म्हणून झोप घेतल्यानंतर आणि आराम केल्यानंतरही थकल्यासारखं वाटतं. 

2. केस गळणे हे ड जीवनसत्वाच्या कमतरतेचं मुख्य लक्षण मानलं जातं. केशतंतूच्या विकासासाठी ड जीवनसत्वाची गरज असते. त्यामुळे ड जीवनसत्वाची कमतरता जाणवल्यास त्याचा केसांवर परिणाम होतो आणि केस गळायला लागतात. 

3. हाडं मजबूत करण्यासाठी ड जीवनसत्वाची आवश्यकता असते. ड जीवनसत्व पुरेश्या प्रमाणात नसेल तर मात्र हाडं कमजोर होतात. हाडांमध्ये असह्य वेदना होतात. आहारातून शरीराला मिळणाऱ्या कॅल्शियमचं शोषण करण्यासाठीही ड जीवनसत्वाची आवश्यकता असते. या जीवनसत्वाच्या अभावी पाठ दुखते, हाता पायाचे स्नायू दुखावतात.

Image: Google

4. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते. त्यामुळे सारखी आजारपणं मागे लागतात. ड जीवनसत्वाच्या कमतरतेचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येतात. ड जीवनसत्व हे पुरेशा प्रमाणात शरीरात असलं तर ते जिवाणुंना नष्ट करतं. जिवाणुंच्या वाढीला रोखतं. त्वचा निरोगी राखतं. त्वचेची जळजळ दूर करतं. ड जीवनसत्वात जिवाणुविरोधी आणि ॲण्टिऑक्सिडण्ट गुणधर्म असतात. म्हणूनच ड जीवनस्त्वाची कमतरता निर्माण झाल्यास चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येतात. 

5. तज्ज्ञांच्या मते मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यातही ड जीवनसत्वाची भूमिका मोठी असते. मूड चांगला आणि उत्साही ठेवण्यासाठी शरीरात पुरेशा प्रमाणात ड जीवनसत्वाची गरज असते. ते जर नसेल तर मूड जाणं, दुखी वाटणं, निराश  वाटणं, औदासिन्य येणं अशा मानसिक समस्या जाणवू लागतात.

Image: Google

ड जीवनसत्वाची कमतरता दूर करण्यासाठी

1. संत्र्यांच्या ज्यूसमध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असलं तरी ड जीवनसत्वाची कमतरताही संत्र्यांचं ज्यूस प्यायल्यानं दूर होते. घरीच संत्रीचं ज्यूस करुन पिणं हा आरोग्यदायी पर्याय आहे. 

2. गायीच्या दुधात ड जीवनसत्व विपुल प्रमाणात असतं. तज्ज्ञांच्या मते लो फॅट दुधापेक्षा सायीचं दूध ( फुल क्रीम दूध) प्यायल्यानं शरीराला ड जीवनसत्व आणि कॅल्शियमही मिळतं. 

3. दह्यामध्ये ड जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं. रोज दही खाण्याचा कंटाळा येत असल्यास ताक पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. 

4. याशिवाय मश्रुम, बदाम, ब्रोकोली, पनीर, सोयाबीन, लोणी, दलिया यातून ड जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळतं. \

5. ड जीवनसत्वाचा नैसर्गिक स्त्रोत असलेल्या सूर्यप्रकाशाकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. शरीराला ड जीवनसत्व पुरेसं मिळण्यासाठी रोज 15 ते 20 मिनिटं कोवळ्या उन्हात बसणं अनिवार्य आहे. 
 

Web Title: Vitamin D deficiency how affects on health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.