Join us

शरीरातलं व्हिटॅमिन D नैसर्गिकपणे वाढविण्याचे ३ उपाय- कॅल्शियम, व्हिटॅमिन B12 सुद्धा वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2025 16:21 IST

How To Get Rid Of Vitamin D Deficiency: अनेकांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता दिसून येते. ती दूर करण्यासाठी तुम्ही हे काही उपाय नक्कीच करू शकता...(vitamin D rich veg food)

ठळक मुद्दे ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असते त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ आणि कॅल्शियम यांचीही कमतरता असते.

हाडं मजबूत ठेवायची असतील तर शरीरात कॅल्शियमसोबतच व्हिटॅमिन डी असणं अतिशय गरजेचं आहे. पण बऱ्याच जणांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता दिसून येते. यामध्ये महिलांचे प्रमाण तर पुरुषांपेक्षा जास्त आहे. सुर्य हा व्हिटॅमिन डी चा नैसर्गिक स्त्रोत मानला जातो. पण हल्ली कामाच्या गडबडीमुळे बऱ्याच जणांचं योग्यवेळी, योग्य प्रमाणात घराबाहेर सुर्यप्रकाशात जाणं होत नाही. त्यामुळे त्यांना नैसर्गिकपणे सुर्यप्रकाशाद्वारे व्हिटॅमिन डी मिळत नाही (vitamin D rich veg food). म्हणूनच शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होते (how to get rid of vitamin D deficiency?). ती भरून काढण्यासाठी काय उपाय करता येतील, ते आता पाहूया..(how to improve vitamin D level naturally?)

शरीरातली व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी उपाय

शरीरातली व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी काय उपाय करता येऊ शकतात, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ the_cooking_scoop या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

Women's Day 2025: तुमच्या आयुष्यातल्या स्पेशल महिलांना द्या ५ प्रकारचं गिफ्ट- मनापासून आनंदी होतील

यामधे तज्ज्ञ असं सांगत आहेत की सांगत आहेत की ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असते त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ आणि कॅल्शियम यांचीही कमतरता असते.

ही कमतरता भरून काढण्यासाठी आठवड्यातून एक दिवस जेवण करणे टाळा आणि त्याऐवजी भरपूर प्रमाणात सलाड किंवा फळं खा. यामुळे शरीरातली व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून निघण्यास मदत होईल. जर हे शक्य नसेल तर रोजच्या आहारात फळं आणि सलाडचे प्रमाण वाढवा. 

 

हे उपायही करता येतील

१. इंटरनॅशनल सेंटर फॉर कॉस्मेटिक मेडिसिन यांनी मांडलेल्या अभ्यासानुसार शरीरातली व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर करण्यासाठी मशरूम खाणे खूप फायदेशीर ठरते. त्यासाठी मशरूमचे वेगवेगळे पदार्थ आठवड्यातून दोन दिवस तरी नियमितपणे खायलाच पाहिजेत.

नवा माठ घेण्यासाठी कशाला पैसे घालवता? १ उपाय- जुन्या माठातच होईल फ्रिजसारखे थंडगार पाणी 

२. याशिवाय चीज आणि दुग्धजन्य पदार्थांमधूनही चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते.

३. व्हिटॅमिन डी मिळविण्याचा तिसरा सगळ्यात सोपा आणि अतिशय उत्तम पर्याय म्हणजे सकाळच्या कोवळ्या उन्हात ८ ते १० मिनिटे जाऊन बसा. यावेळी तुमच्या मानेला, पाठीला ऊन लागेल या पद्धतीने बसावे. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न