रोजची दगदग आणि धावपळीच्या जीवनात स्वत:ला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आवश्यक असतात. व्हिटॅमिन ई शरीराला अनेक आवश्यक घटक देण्यासोबतच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. आहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, व्हिटॅमिन ई एक प्रकारचे जीवनसत्व आहे, जे चरबीमध्ये सहज विरघळते. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे स्नायू दुखणे, अशक्तपणा जाणवणतो. हे वनस्पती तेल, धान्य, मांस, अंडी, फळे, भाज्या आणि व्हीट जर्म ऑयलसह अनेक पदार्थांमध्ये आढळते. (Vitamin e deficiency diseases, causes, preventions)
व्हिटामीन ई च्या कमतरतेची लक्षणं
अचानक स्नायू कमकुवत होणे
कमी दृष्टी
शरीरात कमकुवतपणा जाणवणं
वेगानं केस गळणे
पचन समस्या असणे.
व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे होणारे आजार
myupchar नुसार, जेव्हा आपल्या शरीराला पुरेसे व्हिटॅमिन ई मिळत नाही, तेव्हा अनेक रोगांचा धोका वाढतो. त्यांच्याबद्दल खाली जाणून घ्या.
१) दीर्घकाळापर्यंत व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे कर्करोग होण्याचा धोका देखील वाढतो.
२) रक्तात व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी होऊ लागते, ज्यामुळे अॅनिमिया होऊ शकतो.
३) शरीरात व्हिटॅमिन ईची कमतरता असल्यास ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही.
४) शरीरात व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहत नाही.
५) व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे केस आणि त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात.
६) व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे मानसिक विकार होतात.
७) व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होते.
व्हिटामीन ई चे फायदे
व्हिटॅमिन ई व्यायामानंतर स्नायू दुरुस्त करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
व्हिटॅमिन ई आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.
व्हिटॅमिन ई पेशींचे संरक्षण करून हृदयरोग किंवा कर्करोग आणि स्मृतिभ्रंश इत्यादी अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण करते.
प्रोस्टॅग्लॅंडिन नावाच्या संप्रेरकांच्या निर्मितीमध्ये व्हिटॅमिन ई देखील महत्त्वाची भूमिका बजावते, हे हार्मोन्स रक्तदाब आणि स्नायू आकुंचन यासारख्या अनेक शारीरिक प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी जबाबदार असतात.
व्हिटामीन ई ची कमतरता भरून काढण्यासाठी काय खायला हवं?
बदाम
अक्रोड
शेंगदाणा
सूर्यफूल बिया
पालक
ब्रोकोली
सोयाबीन