मेटाबॉलिज्म हा शब्द आपण अनेकदा ऐकला असेल (Metabolism). पण शरीराच्या उत्तम कार्यासाठी मेटाबॉलिज्म इतकं गरजेचं का? हे आपल्याला ठाऊक आहे का? मेटाबॉलिज्ममुळे अन्न व्यवस्थित पचते आणि शरीरात उर्जा निर्माण होते (Health Tips). चयापचय सक्रिया मंद झाल्यानंतर अन्न नीट पचत नाही, शरीराला पुरेशी उर्जा मिळत नाही, आणि चरबी देखील जमा होऊ लागते (Weight Loss Tips).
शरीराचा मेटाबॉलिक रेट चांगला असेल तर वजन कमी होण्यास खूप मदत होते. जर आपल्याला मेटाबॉलिक रेट बुस्ट करायचं असेल तर, आहारात काही बदल करून पाहा(Vitamin K Foods: 4 Tasty, Nutritious Options, to speed up metabolism).
चयापचय सुधारण्यासाठी व्हिटॅमिन के समृद्ध अन्न फायदेशीर ठरू शकते. जर आपल्याला मेटाबॉलिज्म वाढवायचं असेल तर, आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल यांनी सांगितलेल्या व्हिटॅमिन केयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करून पाहा. चयापचय बुस्ट करण्यास नक्कीच मदत होईल.
हिरव्या भाज्या
चयापचय सुधारण्यासाठी निरोगी आहार आवश्यक आहे. त्यामुळे आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. याचे नियमित सेवन करा. या भाज्यांना व्हिटॅमिन के चे उत्तम सोर्स मानले जाते. शिवाय यात विविध प्रकारचे पौष्टीक घटकही असतात.
५ भाज्या नियमित खा, प्रोटीन मिळेल भरपूर- पन्नाशीतही दुखणार नाहीत हाडं- प्रोटीन पॉवरहाऊसची कमाल
ब्रोकोली
ब्रोकोली खाण्याचे अनेक फायदे आहेत, कारण यात व्हिटॅमिन के १ मुबलक प्रमाणात आढळते. शिवाय यात फायबरचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी ब्रोकोलीचा आहारात नक्कीच समावेश करा.
डेअरी प्रॉडक्ट्स
दुग्धजन्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन के अधिक प्रमाणात आढळते. आपण नाश्त्यामध्ये चीजचा समावेश करू शकता. हे तुमच्या चयापचयाला एक किक स्टार्ट देईल. चीजमध्ये व्हिटॅमिन के २चे प्रमाण जास्त असते. चयापचय वाढवण्यासाठी याचे नियमित सेवन करणे आवश्यक आहे.
दात नीट घासले तरी दातांवर पिवळा थर येतो? घरच्याघरी खास टूथपावडर, अमेरिकन तज्ज्ञ सांगतात उपाय
फळे
फळे- फळांमध्ये सर्वाधिक जीवनसत्त्वे आढळतात. व्हिटॅमिन के च्या कमतरतेवर मात करण्यासाठी डाळिंब, सफरचंद, बीटरूट ही फळे खा. यात इतर पौष्टीक घटकांसोबत व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते.