विसरभोळेपणा हा अनेकांच्या व्यक्तिमत्त्वाचा गुणधर्म असतो. असे लोक सतत काही ना काही विसरतत, त्यामुळे त्यांच्या कामात अडथळे येतात. काम करताना आपल्याला एखादी गोष्ट अजिबात आठवत नाही. काही वेळा घरातही काय कुठे ठेवलं हे विसरायला होतं. डोक्यात खूप विचार असतील तर असं होणं स्वाभाविक आहे. पण कमी वयात सतत असा विसरभोळेपणा चांगला नाही. यामुळे आपल्या खूप गोष्टींबाबत गोंधळाची परीस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते (Vitamins That Will Help Your Memory).
सतत काही ना काही विसरत असल्याने आपल्या आजुबाजूचे लोकही याचा फायदा घेऊ शकतात. म्हणूनच आपली स्मरणशक्ती शार्प असायला हवी. आता स्मरणशक्ती शार्प हवी तर नेमकं काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्यासाठी आहारात काही घटकांचा आवर्जून समावेश करायला हवा. या पदार्थांमुळे स्मरणशक्ती सुधारण्यास तर मदत होतेच. पाहूयात यासाठी आहारात कोणते घटक घ्यायलाच हवेत. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यासाठी काही खास टिप्स देतात.
१. व्हिटॅमिन सी
मोड आलेली कडधान्ये, आंबट फळे, स्ट्रॉबेरी, ब्रोकोली, बटाटा, किवी, कोबी, पालेभाज्या
२. व्हिटॅमिन इ
दाणे, बिया, गहू आणि इतर धान्ये
३. मॅग्नेशियम
सफरचंद, चेरी, अंजीर, पपई, मटार, बटाटा, पालेभाज्या, आक्रोड, मनुका
४. कॅरोटीनोइडस
गाजर, मोड आलेली कडधान्ये, रताळी, पालक, टोमॅटो, संत्री
५. फ्लेवोनाईडस
कांदा, ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर, केशरी रंगाची फळे
६. व्हिटॅमिन बी
बी कॉम्प्लेक्सच्या सप्लिमेंटसोबत व्हिटॅमिन बी ६ आणि व्हिटॅमिन सी घेणे
७. व्हिटॅमिन बी १२
दूध, अंडी, मासे, मांसाहार यांतून हे जास्त प्रमाणात मिळते. पण तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही यासाठी सप्लिमेंटस घ्यायला हवी.
८. लेसिथिन
अंड्यातील बलक, तीळ, बदाम, सोयाबिन, गहू आणि गव्हांकूर
९. फॉस्फोटीडाईलकोलीन
सोयाबिनमध्ये असणारा हा घटक सप्लिमेंटसच्या माध्यमातून जास्त प्रमाणात मिळतो.