Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उपाशीपोटी ३० मिनिटं रोज करा मॉर्निंग वॉक, ४ बदल - आयुष्यभरासाठी तब्येतीची तक्रारच संपेल

उपाशीपोटी ३० मिनिटं रोज करा मॉर्निंग वॉक, ४ बदल - आयुष्यभरासाठी तब्येतीची तक्रारच संपेल

Wake Up And Walk! 4 Benefits Of Taking A Morning Stroll : उपाशी पोटी सकाळी चालण्याचे जबरदस्त फायदे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2024 05:42 PM2024-05-06T17:42:33+5:302024-05-06T17:58:11+5:30

Wake Up And Walk! 4 Benefits Of Taking A Morning Stroll : उपाशी पोटी सकाळी चालण्याचे जबरदस्त फायदे..

Wake Up And Walk! 4 Benefits Of Taking A Morning Stroll | उपाशीपोटी ३० मिनिटं रोज करा मॉर्निंग वॉक, ४ बदल - आयुष्यभरासाठी तब्येतीची तक्रारच संपेल

उपाशीपोटी ३० मिनिटं रोज करा मॉर्निंग वॉक, ४ बदल - आयुष्यभरासाठी तब्येतीची तक्रारच संपेल

सकाळी आपल्याला अनेक जण मॉर्निंग वॉक (Morning Walk) करताना दिसतात. मात्र, अनेकदा सकाळच्या घाईत वॉक करण्यासाठी वेळ काढणं शक्य होत नाही. पण निरोगी आयुष्य हवं असेल तर, सकाळी वॉक करणं गरजेचं आहे (Weight Loss). मॉर्निंग वॉक केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात (Fitness). पण सकाळी चालण्याचे फायदे किती? सकाळी चालल्याने शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्वरूपात फायदा होतो.

वेबएमडीने दिलेल्या माहितीनुसार, 'सकाळी उपाशीपोटी वॉक केल्याने आरोग्याला फायदाच होतो. किमान अर्धा तास चालल्याने ताणतणाव, नैराश्य, अनिद्रा या सर्व समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते. शिवाय शारीरिकही फायदे मिळतात. यामुळे वेट लॉस, ब्लड शुगरवर नियंत्रण आणि रोगप्रतिकार शक्तीही वाढते(Wake Up And Walk! 4 Benefits Of Taking A Morning Stroll).'

मॉर्निंग वॉकचे फायदे

शारीरिक तंदुरुस्त

मॉर्निंग वॉक केल्याने शारीरिक फायदा होतो. यामुळे चयापचय क्रिया सुधारते. शिवाय रक्त प्रवाहही वाढतो. नियमित मॉर्निंग वॉक केल्याने कॅलरीज बर्न, स्नायूंना बळकटी, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत यासह फुफ्फुसाचे कार्य सुधारण्यास मदत करते. मुख्य म्हणजे वेट लॉससाठी मदत करते. ज्यामुळे लठ्ठपणा-संबंधित रोगांचा धोका कमी होतो.

न वाफवता करा क्रिस्पी अळूवडी, गुजराथी पद्धतीच्या आंबट-गोड अळूवडीची खास पारंपरिक रेसिप

मानसिक आरोग्य सुधारते

उपाशीपोटी किमान अर्धा तास चालल्याने मानसिक आजारापासून दूर राहण्यास मदत मिळते. सकाळच्या ताज्या हवेमुळे मन प्रसन्न राहते. ताण, चिंता आणि नैराश्यापासून दूर राहते. शारीरिक हालचाल आणि सूर्यप्रकाशच्या कॉम्बिनेशनमुळे एंडोर्फिनचे प्रकाशन वाढते, ज्याला "फील गुड" हार्मोन्स देखील म्हणतात. यामुळे तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होते.

झोपेची गुणवत्ता वाढते

मॉर्निंग वॉक आणि नियमित व्यायाम केल्याने झोपेची गुणवत्ता चांगली होते. पहाटेच्या वेळी नैसर्गिक प्रकाश घेतल्याने सर्काडियन रिदम कंट्रोल करण्यास मदत मिळते. ज्यामुळे अपुऱ्या झोपेची समस्या सुटते. शिवाय सकाळी फ्रेश वाटते.

दात स्वच्छ घासले तरी पिवळेच दिसतात? चमचाभर हळदीत मिसळून लावा '१' खास तेल, दात चमकतील

प्रतिकारशक्ती वाढते

नियमित मॉर्निंग वॉक केल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. मॉर्निंग वॉकमुळे पांढऱ्या रक्त पेशी, अँटीबॉडीज आणि इतर रोगप्रतिकारक घटकांचे उत्पादन वाढते, ज्यामुळे संक्रमण आणि रोगांपासून शरीराच्या संरक्षणास चालना मिळते.

Web Title: Wake Up And Walk! 4 Benefits Of Taking A Morning Stroll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.