Join us   

मध्यरात्री एकदम जाग येते, कधीकधी दचकून उठता? तज्ज्ञ सांगतात, हा कशाचा त्रास..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2023 6:19 PM

Waking up in the middle of the night: Causes and remedies मध्यरात्री झोपमोड होऊन अचानक जाग येते, नंतर झोप लागत नाही हा त्रास की आजाराची लक्षणं?

दिवसभर काम करून थकल्यानंतर, रात्री पडल्या - पडल्या झोप यावी अशी अनेकांची इच्छा असते. निरोगी आरोग्यासाठी शरीराला ८ तासांची झोप हवीच. काहींना गाढ झोप लागल्यानंतर मध्येच लघवीला येते, किंवा तहान लागते. त्यामुळे आपण जागे होतो. पण आपल्याल्या कधी झोपेच्या मध्येच झोपमोड होऊन जाग आली आहे का? मग त्यानंतर कितीही झोपण्याचा प्रयत्न केला तर, झोपच आली नाही आहे का? असे नेमके का होते? ही बाब तुमच्यासोबत वारंवार होत असेल तर, वेळीच आरोग्याकडे लक्ष द्या.

यासंदर्भात, आरोग्य तज्ज्ञ निखिल वत्स सांगतात, ''या लक्षणामागील प्रमुख कारण म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स. यात प्रॉब्लेम एड्रेनालाईन किंवा ग्लायकोजेनमध्ये होते. ज्याला स्टोर्ड शुगर देखील म्हणतात. सामान्यत: शरीरात, हार्मोन्स सर्कॅडियन रिदममधून जातात. कोर्टिसोल सकाळी २:३०च्या दरम्यान, सर्वात कमी बिंदूवर असतो, व सकाळी ८च्या दरम्यान त्याच्या सर्वोच्च पातळीवर असतो. परंतु एड्रेनालाईन फटीग दरम्यान, २:३०च्या दरम्यान, कोर्टिसोलकडून एक स्पाइक मिळतो. ज्यामुळे मध्यरात्री आपल्याला जाग येते''(Waking up in the middle of the night: Causes and remedies).

हार्मोन्सवर होतो परिणाम

अशा स्थितीत शरीर खूप थकते. झोप घेण्याची तीव्र इच्छा होते. काही केल्या डोळे उघडत नाही, अशा वेळी आपले हार्मोन्स असंतुलित होते.

कुणाचं नाव चटकन आठवत नाही, कामांचा विसर पडतो? ४ गोष्टी खा, स्मरणशक्ती वाढेल

झोपेचं होईल खोबरं

साधारणपणे, यकृताद्वारे साखर साठवली जाते. व ती रात्रभर हळू - हळू रिलीज केली जाते. जर असे होत नसेल तर, साखरेच्या पातळीतील स्थिरता वर - खाली होते. ज्यामुळे झोपेच्या मध्येच जाग येते. ज्याला इन्शुलिन रेझिस्टन्स असे म्हणतात. ब्लड शुगरचे लेव्हल कमी होते, ज्यामुळे लघवीला जाण्यासाठी वारंवार जाग येते.

मुझे नींद ना आये..रात्र रात्र झोपेसाठी तळमळता? ४ टिप्स, स्ट्रेस होईल कमी-गाढ झोप लागेल

आहारात करा हे बदल

निखिल वत्स यांच्या मते, ''झोपमोड टाळण्यासाठी आपल्याला आहारात काही बदल करावे लागतील. यासाठी, अन्नामध्ये इलेक्ट्रोलाइट्स (पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम) या गोष्टींचा आहारात समावेश करा. यासोबतच कॅफीनसारख्या अतिउत्तेजक पदार्थ टाळा. म्हणजेच रात्रीच्या वेळी चहा - कॉफी पिणे टाळा. जेवल्यानंतर शतपावली करा. चालणे हा उत्तम व्यायाम आहे. त्यासोबतच जास्त स्ट्रेस घेऊ नका. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य