Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सकाळी झोपेतून उठलं की मळमळतं, डोकं दुखतं? सकाळी उठल्या उठल्या करा ५ गोष्टी, मॉर्निंग नॉशिया होईल कमी

सकाळी झोपेतून उठलं की मळमळतं, डोकं दुखतं? सकाळी उठल्या उठल्या करा ५ गोष्टी, मॉर्निंग नॉशिया होईल कमी

For Quick Relief for Acidity Follow Healthy Morning Routine : ज्यांना वारंवार अॅसिडीटीचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे उपाय नक्कीच उपयुक्त ठरु शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2022 09:36 AM2022-07-19T09:36:42+5:302022-07-19T09:40:02+5:30

For Quick Relief for Acidity Follow Healthy Morning Routine : ज्यांना वारंवार अॅसिडीटीचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे उपाय नक्कीच उपयुक्त ठरु शकतात

Waking up in the morning feeling nauseous, headache? Do 5 things when you wake up in the morning, morning sickness will be less | सकाळी झोपेतून उठलं की मळमळतं, डोकं दुखतं? सकाळी उठल्या उठल्या करा ५ गोष्टी, मॉर्निंग नॉशिया होईल कमी

सकाळी झोपेतून उठलं की मळमळतं, डोकं दुखतं? सकाळी उठल्या उठल्या करा ५ गोष्टी, मॉर्निंग नॉशिया होईल कमी

Highlightsसकाळी उठल्यावर मळमळत असेल तर फॉलो करा हे मॉर्निंग रुटीन...चुकीच्या जीवनशैलीमुळे सारखी अॅसिडीटी होत असेल तर सकाळी उठल्यावर काही गोष्टी आवर्जून करा

अॅसिडीटी ही आताच्या काळात अगदी सामान्यपणे भेडसावणारी समस्या आहे. रोजची धावपळ, त्यामुळे होणारी अपुरी झोप, ताणतणाव, खाण्याच्या चुकीच्या पद्धती यांमुळे खाल्लेले घशाशी येते किंवा कधी खूप अॅसिडीटी होतेय यामुळे डोके दुखणे, उलट्या, मळमळ यांसारख्या समस्या उद्भवतात. कधी जेवणाच्या वेळा बदलल्या तरी अनेकांना छातीत जळजळल्यासारखं आणि अस्वस्थ व्हायला होतं. एकदा अॅसिडीटी झाली की काही सुधरत नाही, अशावेळी नेमके कोणते उपाय करायला हवेत आपल्याला माहित नसतं. काहींना जास्त जेवण झाल्यावर अॅसिडीटीचा त्रास होतो तर काहींना सकाळी झोपेतून उठल्यावर खूप जळजळल्यासारखं होतं. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र (Dr. Hansaji Yogendra) या समस्येवरील काही सोपे उपाय आपल्याला सांगणार आहेत. ज्यांना वारंवार अॅसिडीटीचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे उपाय नक्कीच उपयुक्त ठरु शकतात (For Quick Relief for Acidity Follow Healthy Morning Routine). 

(Image : Google)
(Image : Google)

१. बेड स्ट्रेचेस 

झोपेतून उठल्या उठल्या काही ठराविक स्ट्रेचिंगचे व्यायाम केल्यास शरीरातील काही भागांना नकळत मसाज होतो आणि अॅसिडीटीच्या समस्येपासून आपली सुटका होण्याची शक्यता असते. एक-एक पायाने आणि दोन्ही पायांनी पवनमुक्तासन तसेच हस्तदंगुस्त, सुप्त कपोतासन ही आसने अवश्य करावीत. तसेच पाय कंबरेतीन सरळ करुन ५ मिनीटे भिंतीला चिकटून ठेवावेतय या आसनांमुळे सकाळी होणाऱ्या अॅसिडीटीचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

२. बोटाने जीभ साफ करणे 

योगअभ्यासानुसार आपल्या तोंडाचे आरोग्य उत्तम असणे आपली तब्येत चांगली राहण्यासाठी अतिशय आवश्यक असते. त्यामुळे झोपेतून उठल्याउठल्या ग्लासभर कोमट पाणी प्यायला हवे. त्यानंतर दात, हिरड्या, जीभ साफ करावी. हे झाल्यावर आपल्या जीभेच्या मध्यभागी दोन बोटे घालून प्यायलेले पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपल्या शरीरातील अॅसिडीक घटक या पाण्यासोबत बाहेर पडतात आणि अॅसिडीटी कमी होते. 

३. धणे आणि तुळशीचे पाणी प्या

धणे हे अॅसिडीटीसाठी अतिशय उपयुक्त असून पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी धण्यांचा वापर केला जातो. तसेच धण्यामध्ये शरीराला थंडावा देणारे घटक असल्याने अॅसिडीटीचा त्रास असणाऱ्यांसाठी धणे अतिशय फायदेशीर असतात. रात्री ३ ग्लास पाण्यात १ चमचा धणे घालून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळा. त्यानंतर हे पाणी रात्रभर तसेच ठेवा. सकाळी ते गाळून प्या, त्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात काही थेंब तुळशीचे थेंब घालून तेही प्या. यामुळे पोटातील अॅसिडीट घटकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. 

(Image : Google)
(Image : Google)

४. ब्रिस्क वॉक

पाणी प्यायल्यानंतर वॉकींगला जा. चालण्याचे अनेक फायदे आहेत हे आपल्याला माहित आहेच. साधारणपणे ३० मिनीटे चाला, यामुळे आपल्या पोटातील गॅस बाहेर पडण्यास मदत होईल, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होईल. इतकेच नाही तर चालण्यामुळे आपल्या शरीरावरील जास्तीची चरबी कमी होण्यासही मदत होईल. अनेकांना अतिरिक्त वजनामुळेही अॅसिडीटीचा त्रास सतावतो. पण वजन कमी झाल्यास हा त्रास कमी होण्यास मदत होते.

५. शवासन आणि प्राणायाम

३० मिनीटे चालून आल्यानतंर शवासन करा. शवासनामुळे शरीरातील सगळ्या अवयवांना आराम मिळतो आणि त्यांचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. शवासनामुळे आपली एनर्जी लेव्हल टिकून राहण्यास मदत होते. १० मिनीटे शवासन झाल्यानंतर काही वेळ आवर्जून प्राणायाम करायला हवे. त्यामुळे शरीरातील श्वसनक्रिया सुरळीत होते आणि अॅसिडीटीसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. 

Web Title: Waking up in the morning feeling nauseous, headache? Do 5 things when you wake up in the morning, morning sickness will be less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.