चालणं हा व्यायामाचा सर्वात सोपा आणि प्रभावी प्रकार आहे. ज्याचे असंख्य फायदे आहेत. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यापासून मानसिक आरोग्यापर्यंत त्याचा खूप फायदा होतो. हा व्यायाम सोपा आहे, सोयीचा आहे. चालणं ही सर्व वयोगटांसाठी उपयुक्त अशी क्रिया आहे, जी प्रत्येक व्यक्तीला त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत करते. जीवनातील टप्पे बदलत असताना सर्व वयोगटातील लोकांना निरोगी, अधिक सक्रिय जीवन जगण्यास हे मदत करते. दैनंदिन चालण्याचं आदर्श प्रमाण वयानुसार बदलतं, कारण प्रत्येक वयोगटाच्या शारीरिक गरजा आणि क्षमता वेगवेगळ्या असतात.
१८-३० वर्षे : दिवसातून ३०-६० मिनिटं
तरुणांमध्ये सामान्यत: उर्जा पातळी आणि स्नायूंची ताकद जास्त असते, म्हणून ते दररोज ३०-६० मिनिटं वेगाने चालण्याचं टार्गेट ठेवू शकतात. आयुष्याच्या या टप्प्यावर चालणं हे वजन व्यवस्थापित करण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि निरोगी हृदय ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आता बैठी कामं जास्त असतात. दीर्घकाळ बसण टाळून चालण्याचा सल्ला दिला जातो.
३१-५० वर्षे : दिवसातून ३०-४५ मिनिटं
या वयोगटातील लोकांना दररोज ३०-४५ मिनिटं चालण्यामुळे फायदा होऊ शकतो. नियमित चालणं हे वजन नियंत्रित ठेवण्यास, स्नायूंचा टोन उत्तम ठेवण्यास, जुन्या आजारांना प्रतिबंध करण्यास आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यास मदत करू शकतं, ज्याची वयानुसार गरज असते. कामावर चालणे, जेवणाच्या विश्रांती चालणे किंवा पायऱ्या चढणे अशा गोष्टी नियमित करा.
५१-६५ वर्षे : दिवसातून ३०-४० मिनिटं
मध्यमवयीन लोकांसाठी, दिवसातून ३०-४० मिनिटं चालणं योग्य असेल. या वयात शरीरातील नैसर्गिक बदलांमुळे, लोकांना स्नायूमध्ये आणि चयापचय दरात घट जाणवते आणि यासाठी व्यायाम महत्त्वपूर्ण बनतो. चालणं तुमची हाडं निरोगी ठेवतं आणि सांधे हलवण्यास मदत होते.
६६-७५ वर्षे : दिवसातून २०-३० मिनिटं
वृद्धांसाठी दिवसातून २०-३० मिनिटं मध्यम वेगाने चालणं अत्यंत उपयुक्त ठरतं आणि ते सहज साध्य करता येतं. त्या वयात चालण्याने वयोवृद्धांचा बॅलन्स राहतो आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालींशी संबंधित आजारांपासून बचाव होतो. पडण्याची शक्यता कमी होते. विविध संशोधनं असं दर्शवतात की, नियमित चालण्याचा चांगला प्रभाव पडतो.
दीर्घकालीन आरोग्य स्थिती किंवा सांधे समस्या असलेल्यांना ताण कमी करण्यासाठी ही गोष्ट १५ मिनिटांनी एक छोटा ब्रेक घेऊन दोन सेशनमध्ये करा. एखाद्या ग्रुपसह किंवा मित्रांसह चालण्याने आपली सामाजिक बांधिलकी चांगली राहते आणि मानसिक आरोग्य सुधारतं.
ज्येष्ठ व्यक्ती : दिवसातून १५-२० मिनिटं
दररोज १५ ते २० मिनिटं हळूहळू चालण्याचा फायदा ज्येष्ठांना होऊ शकतो. नियमित चालणं हे सांधे लवचिक, स्नायूंची ताकद आणि समतोल यासाठी उपयुक्त ठरतं.
चालण्यासाठी सपाट परिसर, चांगले शूज आणि सुरक्षित मार्ग निवडा. ज्यांना हालचाल करण्यास अडचण येत असेल त्यांनी वॉकर अथवा चालण्यासाठी इतर गोष्टींची मदत घ्यावी. चालण्यामुळे आपला मूड चांगला होतो. थकवा दूर होता आणि एकंदरीत आयुष्यात सकारात्मक बदल होतात.
दैनंदिन चालण्याचा कालावधी वय, फिटनेस लेव्हल, हेल्थ कंडिशन्स आणि पर्सनल गोल्स यासारख्या घटकांवर बदलू शकतो. सामान्य मार्गदर्शक तत्त्व दररोज २०-६० मिनिटं सुचवत असताना, तुमच्या शरीराच्या गरजेनुसार हे करणं आवश्यक आहे. काही परिस्थितीत जसं की, सांधे आणि त्यासंबंधित समस्या किंवा जुने आजार असतात. अशा वेळी आपल्या शरीराचं ऐकणं महत्वाचं आहे. तुम्हाला वेदना किंवा अस्वस्थता वाटत असल्यास, तुमचा दिनक्रम बदला किंवा ब्रेक घ्या.