Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > थंडीत हार्ट अटॅकचा धोका कमी करायचाय? ५ गोष्टी करायलाच हव्यात...

थंडीत हार्ट अटॅकचा धोका कमी करायचाय? ५ गोष्टी करायलाच हव्यात...

जीवनशैलीतील छोटे बदल वाचवू शकतात आपलं आयुष्य, मात्र त्यासाठी वेळीच जागे होण्याची गरज आहे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2022 10:41 AM2022-01-23T10:41:40+5:302022-01-23T11:30:06+5:30

जीवनशैलीतील छोटे बदल वाचवू शकतात आपलं आयुष्य, मात्र त्यासाठी वेळीच जागे होण्याची गरज आहे....

Want to reduce the risk of a cold heart attack? 5 things to do ... | थंडीत हार्ट अटॅकचा धोका कमी करायचाय? ५ गोष्टी करायलाच हव्यात...

थंडीत हार्ट अटॅकचा धोका कमी करायचाय? ५ गोष्टी करायलाच हव्यात...

Highlightsहार्ट अटॅकपासून वाचायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी...रोजच्या जगण्यातील लहानसे बदलही घडवून आणतील मोठा फरक

हार्ट अटॅक (Heart Attack) ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. जीवघेणी असलेली ही समस्या थंडीच्या दिवसांत वाढते. सध्या कमी वयात हार्ट अटॅकचा धोका उद्भवण्याची समस्या वाढली आहे. वाढते ताण, चुकीची जीवनशैली ही याची मुख्य कारणे असल्याचे म्हटले जात आहे. थंडीच्या दिवसांत समस्या हृदयाला रक्तपुरवठा कमी होणे, रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होणे, शरीरातील अतिरिक्त चरबी, कोलेस्टेरॉलची वाढ यांमुळे जास्त प्रमाणात उद्भवते. जीवनशैलीतील काही गोष्टींवर नियंत्रण आणल्यास आपल्याला उद्भवणारा हार्ट अटॅकचा धोका (Avoid Heart Attack) कमी होऊ शकतो. पाहूयात हा धोका कमी होण्यासाठी नेमके काय करायला हवे....

१. ज्यांना खूप जास्त प्रमाणात अल्कोहोल घेणे आणि धूम्रपान करण्याची सवय आहे अशांनी या दोन्ही व्यसनांवर नियंत्रण आणायला हवे. त्यामुळे थंडीच्या दिवसांत हार्ट अटॅक येण्याची भिती कमी होते. 

२. ताणावर नियंत्रण आणणे ही हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. सध्या आपल्यातील अनेकांना कामाचे, कौटुंबिक किंवा वैयक्तिक स्वरुपाचे वेगवेगळे ताण असतात. सतत अशाप्रकारचे ताण घेतल्यामुळे हृदयाच्या धमन्यांना सूज आल्यासारखे होते, त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात आणि त्याचा परिणाम म्हणजे हार्ट अटॅक येतो. बागकाम, चित्रकला, वाचन, गाणी ऐकणे यांसारख्या छंदांमुळे ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या कामातून वेळ काढून हे छंद जोपासायला हवे. 

३. आरोग्याच्या कोणत्याही समस्येवर उत्तम उपाय म्हणजे रात्रीची गाढ झोप घेणे. रात्रीच्या वेळी सलग ७ ते ८ तासांची झोप घेणे उत्तम आरोग्यासाठी गरजेचे असते. त्यामुळे नियमितपणे गाठ झोप होईल याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. व्यवस्थित झोप झाली तर हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

४. घरातील कामे, ऑफीस, इतर कौटुंबिक जबाबदाऱ्यां यांमध्ये नियमित व्यायाम करणे आपल्याला जमतेच असे नाही. पण तुम्हाला आवडेल असा कोणत्याही स्वरुपाचा व्यायाम ३० मिनिटांसाठी करणे हृदयाच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र थंडीच्या दिवसांत सकाळच्या किंवा संध्याकाळच्या गारठ्यात व्यायाम करणे टाळा. अशावेळी घरात किंवा इमारतीच्या आवारात चालणे, योगा, स्ट्रेचिंग अशा पद्धतीचे व्यायामप्रकार करा. 

५. आहारात मीठ आणि साखर कमीत कमी प्रमाणात वापरणे आवश्यक असते. मीठाच्या जास्त वापरामुळे उच्च रक्तदाब आणि साखरेमुळे शुगरची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे शुगर, कोलेस्टेरॉल, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातील सर्व गोष्टींचे प्रमाण योग्य ठेवा. उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार गरजेचा असतो, त्याप्रमाणे जंक फूड, मसालेदार पदार्थ टाळून भाज्या, फळे, डाळी, कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ आहारात योग्य प्रमाणात असतील याची काळजी घ्या.  
 

Web Title: Want to reduce the risk of a cold heart attack? 5 things to do ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.